मुंबई : मुख्मंत्री उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) कोर्लई अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्याच्या जनहित याचिके संदर्भात आज अलिबाग येथे अॅड किरण कोसमकर, अॅड अंकित बंगेरा सह १२ वकिलांशी चर्चा केली. पुढील १० दिवसांत या याचिकेचं काम पूर्ण होऊन मे महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी दिली.
किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचा दावा केला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरुड कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान हा वाद अद्यापही शमला नसून या संदर्भात मे महिन्यात किरीट सोमैया मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.
[read_also content=”कॅप्टन गुजरकर यांची पर्वतारोहन मोहीम फत्ते, थुकला-पास पर्यंत ४८०० मीटर केली चढाई https://www.navarashtra.com/maharashtra/captain-gujarkars-mountaineering-expedition-climbs-4800-meters-to-fateh-thukla-pass-nraa-275932.html”]
रश्मी उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडुन कोर्लई येथे ९.५ एकर जमिन १९ बंगल्यांसह विकत घेतली. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीय या रु. ५.४२ कोटी किंमत असलेल्या १९ बंगल्यांसाठी १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कर भरत होते/ कर भरला. पण इन्कम टॅक्स रिटर्न्स मध्ये हे बंगले दाखवले गेले नाही आणि आता ठाकरे म्हणत आहेत की बंगले गायब झालेत. असा आरोपही त्यांनी केला आहे.
[read_also content=”राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं दिला निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/rana-couple-granted-bail-mumbai-sessions-court-rules-nrps-275878.html”]