इचलकरंजी : कोल्हापुरातील आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयासाठी आवश्यक इष्टांक मंजुरी मिळाली असतानाही पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभमिळत नसल्याचा आरोप करीत नितेश पोवार आणि सतीश मुळीक यांनी रेशनधारकांनी पुरवठा निरिक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
जवाहरनगर परिसरातील 117, तर गणपती कट्टा परिसरातील 55 रेशनकार्डधारकांना मागील अनेक महिन्यांपासून धान्य मिळत नव्हते. संबंधितांचा फेरसर्व्हे करून प्रशासनाने त्यांना59 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला दिला होता. लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे पुरवठा कार्यालयात जमा करूनही त्यांच्या नावांची पात्र यादी जाहीर होत नव्हती. नऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेत लाभार्थी सहा महिन्यांपूर्वीच पात्र ठरले असतानाही प्रत्यक्षात त्यांना धान्य मिळत नसल्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे पुरवठा कार्यालयात जमा करूनही त्यांच्या नावांची पात्र यादी जाहीर होत नव्हती.
नऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेत लाभार्थी सहा महिन्यांपूर्वीच पात्र ठरले असतानाही प्रत्यक्षात त्यांना धान्य मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.वारंवार हेलपाटे मारूनही धान्य मिळत नसल्याने सतीश मुळीक व नितेश पोवार यांनी या प्रश्नी पुरवठा निरीक्षकांच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत यादी जाहीर होत नाही, तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी या आंदोलनाची दखल घेत पुरवठा निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत सोमवारपर्यंत पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी यादी जाहीर न झाल्यास सर्व लाभार्थ्यांसह पुरवठा कार्यालयातच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात भागातील नागरिक सहभागी झाले होते.
Ans: फेरसर्व्हे करून प्रशासनाने लाभार्थ्यांना 59,000 रुपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला दिला होता.
Ans: लाभार्थ्यांची नावे पात्र यादीत समाविष्ट होत नव्हती. दाद मागितल्यानंतरही यादी जाहीर करण्यात विलंब होत होता.
Ans: “यादी जाहीर होईपर्यंत हलणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती.






