अजित पवारांचे शक्तीपीठबाबत विधान (फोटो- सोशल मिडिया)
कोल्हापूर: आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत देखील वक्तव्य केले आहे. सुशील केडीया यांच्या विधानावर देखील भाष्य केले आहे. अजित पवार नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करून काय मार्गदर्शन काढायचा याबाबत सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. समृद्धी महामार्ग बनवताना देखील मोठा विरोध झाला होता. पण त्यामध्ये बागायतदार वर्ग नव्हता. मात्र यामध्ये यामध्ये अल्पभूधारक वर्ग देखील आहे.”
पुण्यात कोंढवा येथे झालेल्या अत्याचार प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्यात कायदा या सुव्यवस्थेचा धाक असला पाहिजे. आपल्या देशात प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटलं पाहिजे.”
शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन
जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या…देत नाही देत नाही जीव गेला तरी देणार नाही .अशी आरोळी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोंब मारत आज नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आज कोल्हापुर येथील पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले .या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी ,माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
सुमारे दोन तास या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही एका शेतकऱ्यांने थेट पंचगंगा फुलावरून नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले आंदोलनानंतर पोलिसांनी विजयी देवणे, राजू शेट्टी यांच्यासह महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेत्यांना ताब्यात घेतले नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
Shaktipeeth Expressway: “जीव गेला तरी….”; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात चक्काजाम आंदोलन
काल रात्री संघर्ष समितीच्या नेत्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून आंदोलन करू नये असा इशारा दिला होता. मात्र पोलिसांची नोटीस धुडकावून आज हे नेते रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेला हा शक्तीपीठ महामार्ग यामध्ये हजारो हेक्टर सुपीक शेती जमिनी नष्ट होणार आहेत. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठवून आंदोलनाचे हत्यार उपसून विधानसभा निवडणुकीवेळी हा वादग्रस्त महामार्ग रद्द करण्याची घोषणा त्या वेळच्या सरकारने केली होती. पण राज्यात पुन्हा सरकार येताच हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे .