प्रतिकात्मक फोटो
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिकस्थळे आणि प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांना प्रवेशास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी (Senior Citizens, Pregnant Women Allowed in Religious Places) दिली आहे.
या ठिकाणी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. यापूर्वी कोविड-19 व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.