कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा’ संपन्न झाली. सकाळी ७:३० पासून दसरा चौक याठिकाणी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत ही पदयात्रा मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचंड उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात सुरवात झाली. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का. सदस्य राहूल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवाजी पेठ येथील हिंद प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाड्याच्या वतीने दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी सादर केली. तिरंगा ध्वज घेऊन या एकता पदयात्रेला सुरवात झाली. दसरा चौक आईसाहेब महाराज पुतळा – बिंदू चौक – छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्गे हि पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोचली. यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या एकता पदयात्रेत भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सर्वांनी एकजुटीने देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी अमर साठे, विराज चिखलीकर, हेमंत आराध्ये, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, विजय खाडे, माधुरी नकाते, भरत काळे, अप्पा लाड, विजय अगरवाल, गिरीश साळोखे, हेमंत कांदेकर, अमोल पालोजी, विश्वजित पवार, आजम जमादार, अतुल चव्हान, दिग्विजय कालेकर, दीपक काटकर, संतोष भिवटे, संतोष माळी, रविकिरण गवळी, विनय खोपडे, सचिन कुलकर्णी, राजगणेश पोळ, प्रीतम यादव, विशाल शिराळकर, महेश यादव, संजय जासूद, सचिन सुराणा, रविंद्र मुतगी, संदीप पोवार, अरविंद वडगांवकर, सयाजी आळवेकर, किरण नकाते, प्रणोती पाटील, सुजाता पाटील, संतोष जाधव, राजेश कोगनुळकर, अविनाश कुंभार, शाहरुख गडवाले, योगेश ओटवकर, वंदना बंबलवाड, सुनीता घोडके, समयश्री अय्यर, प्रशांत आवघडे, संजय सावंत, सुहास सदलगे, शिवप्रसाद घोडके, किरण कुलकर्णी, सचिन घाटगे, महेश चौगले, विवेक कोरडे, सुनील वाडकर, प्रवीणचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पना
जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी देशहिताच्या महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेणारे सरदार वल्लभभाई पेटल हे लोहपुरुष असून अखंड भारत निर्माण करण्याचे श्रेय सरदार वल्लभाई पटेल यांना जात असल्याचे नमूद करत त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाला वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.






