महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट(फोटो-सोशल मीडिया)
वाराणसीमध्ये शाळकरी मुली तिरंगा घेऊन एकत्र जमल्या आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात भारताच्या विजयासाठी प्रार्थना देखील केली. आयएएनएसशी बोलताना देवेशी आनंद म्हणाल्या की, “भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये जेमिमा रॉड्रिग्जच्या संस्मरणीय अशा फलंदाजी कामगिरीने आम्हाला अंतिम फेरीत पोहोचवले आहे. आम्ही अंतिम फेरी जिंकू, यावेळी विश्वचषक आपलाच असणार आहे.”
हेही वाचा : IND W vs SA W: महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीला बॉलिवूडची फोडणी! मैदानात ‘या’ गायिकेचा घुमणार आवाज
तसेच सिद्रा फातिमा म्हणाल्या की, “आम्ही खूप उत्सुक आहोत. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत पोहोचला आहे. आम्हाला आशा आहे की आम्ही यावेळी चॅम्पियन होऊ.” सृष्टी जयस्वाल म्हणाली की ऑस्ट्रेलिया सातत्याने महिला विश्वचषक जिंकत आला आहे. यावेळी, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आम्हाला आशा आहे की भारतीय संघ चॅम्पियन होणार आहे. आम्ही टीम इंडियाचा जयजयकार करणार आहोत.”
बेंगळुरूची तरुण क्रिकेटपटू आकांक्षाने सांगितले की, “सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या पद्धतीने विजय पटकवला तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असाच आहे.” तिला आशा आहे की भारतीय संघ अंतिम फेरीत देखील तीच कामगिरी पुन्हा करेल आणि विजयी होईल.
अन्या म्हणाली की, “भारतीय संघ खूप चांगला खेळताना दिसत आहे आणि अंतिम फेरीत संघाला पूर्ण पाठिंबा देणार आहे. ती पुढे म्हणाली की, “भारतीय संघाला अंतिम फेरीत आपल्या क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मोठ्या सामन्यांमध्ये थोडी चिंता असते, त्यामुळे संघाला संयम बाळगावा लागणार आहे. उपांत्य फेरीत आपण ३३९ धावांचे लक्ष्य गाठले आहे. जर आपण अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना ३०० पेक्षा जास्त धावा काढल्या तर ते पुरेसे होणार आहे.
हेही वाचा : IND vs AUS: तिसऱ्या T20I पूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर; भारतीय संघ करणार आनंद साजरा






