शत्रू आता समुद्रातही लपू शकणार नाही! भारताचा 'CMS-03' उपग्रह अंतराळातून ठेवणार नजर (Photo Credit - X)
भारत आपल्या सीमा सुरक्षा आणि शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांना सातत्याने अपग्रेड करत आहे. याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, भारताचे प्रसिद्ध लॉन्च व्हेईकल LVM3 (लाँच व्हेईकल मार्क-३) रॉकेट आपल्या पाचव्या उड्डाणासाठी म्हणजेच LVM3-M5 मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. या प्रक्षेपणाचा उद्देश देशातील सर्वात वजनी संचार उपग्रह CMS-03 (कम्युनिकेशन सॅटेलाइट मिशन-०३) अंतराळात स्थापित करणे आहे, जो भारतीय नौदलासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
भारताचे LVM3 रॉकेट हे सर्वात शक्तिशाली स्पेस लोडर रॉकेट असून, ते जड उपग्रह अंतराळात पोहोचवण्याची क्षमता ठेवते. मिळालेले्या माहितीनुसार, व्हीकल LVM3 २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५:२६ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित केले जाईल. CMS-03 पूर्वी या रॉकेटने चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण केले होते, ज्यात भारताला पहिल्यांदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उपग्रह उतरवण्यात यश मिळाले होते. हे प्रक्षेपण इंडियन स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) च्या यूट्यूब चॅनलवर थेट पाहता येईल.
🚨 WE HAVE AN OFFICIAL LAUNCH DATE The LVM3-M5 mission carrying the CMS-03 satellite into GTO is scheduled to lift off on 2 November! 🗓 Weighing in at 4,400 kg, CMS-03 will be the heaviest communications satellite ever launched by ISRO! 🚀 LVM3-M5 vehicle at SLP 👇 pic.twitter.com/Xl7OI9pwkn — ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) October 26, 2025
Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीत महिला मतदार ‘किंगमेकर’;मग उमेदवारी मर्यादित का?
कम्युनिकेशन सॅटेलाइट मिशन-०३ (CMS-03) हा एक अत्यंत प्रगत मल्टी-बँड संचार उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन ४,४०० किलोग्राम आहे. LVM3 रॉकेट या वजनी उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. GTO मध्ये इतका जड उपग्रह पाठवण्याची ही पहिलीच वेळ असेल. GTO ही अशी जागा आहे, जिथून उपग्रह जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये (Geostationary Orbit) पोहोचतो आणि तिथून तो पृथ्वीभोवती फिरतो, ज्यामुळे स्पेस सेंटरशी त्याचा सतत संपर्क राहतो.
मीडिया रिपोर्टनुसार, जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये पोहोचल्यानंतर CMS-03 पुढील सात वर्षांपर्यंत भारताच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान देईल. या उपग्रहाचा वापर देशाच्या समुद्री भागांवर आणि अत्यंत संवेदनशील जमिनीच्या भागांवर (Sensitive Terrestrial Areas) नजर ठेवण्यासाठी केला जाईल. CMS-03 ला देशाचा सर्वाधिक संचार क्षमता असलेला उपग्रह म्हटले जात आहे. यातून नौदलाला सुरक्षित आणि वेगवान दळणवळण मिळेल.
या उपग्रहामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि सुरक्षित डेटा ट्रान्समिशन (Safe Data Transmission) सारख्या सुविधांना बळ मिळेल. एक्सपर्ट्सच्या मते, या उपग्रहामुळे केवळ समुद्री क्षेत्रातील दळणवळण मजबूत होणार नाही, तर ‘ऑपरेशन सिंधू’ सारख्या ऑपरेशनला अधिक अचूकता आणि वेगाने पूर्ण करण्यात यश मिळेल. या प्रक्षेपणामुळे आता शत्रूच्या (विशेषतः पाकिस्तानच्या) प्रत्येक हालचालीवर भारताची अंतराळातून नजर असेल.






