काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतल्या ‘सत्याचा मोर्चा’वर बोलताना निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. मतदार याद्यांतील घोळ हा बोगस मतदार तयार करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत त्यांनी आयोग सरकारचा ‘पार्टनर’ झाल्याचा सवाल उपस्थित केला. “एका घरात चारशे मतदार कसे असू शकतात? निवडणुका पारदर्शक हव्यात, नाहीतर लोकशाही धोक्यात येईल,” असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. तसेच, “राज ठाकरेपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनाच मतदार याद्यांतील गडबडीबाबत एकमत झालं आहे,” असंही ते म्हणाले.