• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Kolhapur Pink Village Shelkewadi 100 Percent Solar Energy In Village Latest Marathi News

Pink Village : कोल्हापुरातील ‘पिंक व्हिलेज’; डोंगरदऱ्यातील शेळकेवाडी गाव झळकलं जगाच्या नकाशावर

केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यधर योजनेच्या माध्यमातून जिल्हयात पहिलं १०० टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून शेळकेवाडी गावानं जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 01, 2025 | 09:49 PM
कोल्हापुरातील 'पिंक व्हिलेज'; डोंगरदऱ्यातील शेळकेवाडी आले जगाच्या नकाशावर

कोल्हापुरातील 'पिंक व्हिलेज'; डोंगरदऱ्यातील शेळकेवाडी आले जगाच्या नकाशावर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं छोटसं गाव शेळकेवाडी. गावची लोकसंख्या जेमतेम हजाराच्या घरात. लोकसंख्या कमी असल्याने ग्रामपंचायतीला दोन ते तीन लाखांच्या आकड्यातच महसूलही मिळायचा. केवळ १०० घरांचं गाव असल्यामुळे राजकीय नेत्यांचाही या वाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र, ग्रामस्थांनी गावाचा कायापालट करायचं ठरवलं. त्यानंतर २००४ पासून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये गावाचा समावेश होत गेला.

Mumbai News : अक्षय्य तृतीयेला मुंबईत १४०१ घरांची विक्री, २४ तासांत सरकारला मिळाले इतके कोटी रुपये

राज्यस्तरीय कोणत्याही स्पर्धेत शेळकेवाडी पहिल्या क्रमांकावर राहिली. बक्षिसांच्या मिळालेल्या रकमेतून गावात हागणदारीमुक्त मोहिम राबविण्यात आली. तर, बायोगॅस प्रकल्प राबवणारं आणि १०० टक्के सौर उर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शेळकेवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. गावची एकजूट दर्शवणारा गुलाबी रंग सर्व घरांना देण्यात आल्यामुळे ‘पिंक व्हिलेज’ म्हणूनही या गावाचा गौरव होत आहे.

सौरग्रामचा मिळाला मान

केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यधर योजनेच्या माध्यमातून जिल्हयात पहिलं १०० टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून शेळकेवाडी गावानं जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केली आहे. शेळकेवाडी ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या मदतीतून सौरऊर्जेचा प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्यातील पहिलं सौरऊर्जेवरील गाव होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरातून सोलर सिस्टिमसाठी लागणा-या ६७ हजारांपैकी केवळ ५ हजार रुपये घेण्यात आले.

मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतूनगावाला सौरऊर्जेत स्वयंपूर्ण करण्यासाठी सोलरसाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं वाटा उचलला, गावातील कुटुंबांची एकूण संख्या १०२ आहे. १ कि. व्हॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ६७ हजार ६०० इतका खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर योजनेतून लाभार्थ्यांना ३० हजारांचं अनुदान मिळतं. या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा ५ हजार आहे. या योजनेसाठी ल्हा परिषदेकडून १४ हजार ३०० रुपये मिळतात, तर ग्रामपंचायतीकडून १९ हजार ३०० रुपये दिले जातात.

सोलरसाठी विशेष निधी प्राप्त

विविध शासकीय योजनांमध्ये घेतलेल्या सहभागातून मिळालेल्या रक्कमेच्या आधारावर प्रत्येक कुटुंबाचा पाच हजारांचा हिस्सा ग्रामपंचायतीनं भरला, गावातील १०० घरांमध्ये १ कि. व्हॅट प्रकल्प बसविण्यात आले. तर २ घरांत २ कि. व्हॅट प्रकल्प बसविण्यात आले. विशेष म्हणजे नावीन्यपूर्णमधून सोलस्साठी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, पथदिवे, पाणी पुरवठा योजना यांना विशेष निधी सुद्धा मिळवण्यात ग्रामपंचायत शेळकेवाडीला यश मिळाले आहे.

विद्युत उपकरणं वापरुनही शून्यबील

गावानं आज अखेर १०० टक्के बायोगॅसला जोडणारी शौचालय बांधली आहेत. सर्व ओला कचरा गॅससाठी टाकला जातो. सर्वांच्या परसबागा आहेत. सांडपाणी व्यवस्थापन शेतीसाठी केलं जातं. सांडपाणी वाहून नेऊन ते मोठ्या शोष खड्चात सोडलं जातं. शोषखनुधाच्या आजूबाजूला केळीची लागवड करण्यात आली आहे. संपूर्ण गावातील गटारी बंदिस्त आहेत. लोकसहभागातून गावात बंधारा बांधला आहे. गावातील सुका कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अवनी संस्थेमार्फत केलं जातं. विद्युत उपकरणं वापरूनही शून्य लाईट बिल येत असल्यामुळे गावातील महिलांनी याबाबत आनंद व्यक्त केला.

सर्वेक्षणासाठी गावात येणार टीम गावातील महसूल उत्पन्न कमी असल्यामुळं यंदाही केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये गावानं सहभाग नोंदवला आहे. येत्या काही दिवसात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची टीम सर्वेक्षणासाठी शेळकेवाडीत येणार आहे.

Pune News : कोट्यवधींचा खर्च करुन शाळांमध्ये बसवलेली ‘ई-लर्निंग’ यंत्रणा ठप्प; नेमके कारण येईना लक्षात

शंभर टक्के होतो सौरऊर्जेचा वापर

एकीकडं देशभरात सिमेंट, विटांच्या जंगलात शहर भकास होत असताना शेळकेवाडी पर्यावरण पूरक गावाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शंभर टक्के सौरऊर्जेचा वापर करणारं गाव म्हणून या गावानं बहुमान मिळवला आहे. शिवाय प्रत्येक घर गुलाबी बनवत संपूर्ण महाराष्ट्राला एकतेचा संदेश देखील दिला आहे. केंद्र, राज्य सरकारच्या मदतीतून आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं गावाचा कायापालट होऊ शकतो, असं भक्कम उदाहरण शेळकेवाडीच्या निमित्तानं पुन्हा पुढे आले आहे.

Web Title: Kolhapur pink village shelkewadi 100 percent solar energy in village latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Kolhapur News update
  • Solar Project

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…
2

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

‘तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात’; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरात तीव्र आंदोलन
3

‘तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात’; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरात तीव्र आंदोलन

Kolhapur News : पंचगंगेतील गणेश मूर्ती विसर्जनावरुन वाद; प्रशासनाचा नकार तर हिंदुत्ववादी ठाम
4

Kolhapur News : पंचगंगेतील गणेश मूर्ती विसर्जनावरुन वाद; प्रशासनाचा नकार तर हिंदुत्ववादी ठाम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.