धक्कादायक! कोल्हापुरात नवदांपत्यांचा गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू, महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यांचा घरात गुदमरून मृत्यू झाला आहे. घरातील गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सागर करमळकर आणि सुषमा करमळकर असं मृत दांपत्याचं नाव असून मे महिन्यातच दोघांच लग्न झालं होतं. दरम्यान या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
कुंडमळा दुर्घटनेची सखोल चौकशी; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, करमळकर दांम्पत्य काल आंबोलीला फिरायला गेलं होतं. दरम्यान आज सकाळी त्यांच्या मित्रांनी त्यांना फोन केला मात्र त्यांनी उचलला नाही. मित्र त्यांना फोन करत होते, पण त्यांनी फोन उचलला नाही. मात्र काही वेळानंतर फोन स्वीच ऑफ येत होता. त्यामुळे मित्रांना काळजी वाटली. त्यांनी थेट करमळकर यांचं घर गाठलं. मात्र दरवाजा आतून बंद होता. आवाज दिला तरी आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ झाला, शेवटी त्यांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला.
घरात सगळीकडे पाहिलं. कोणीही दिसलं नाही. मात्र बाथरूममधून दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सागर करमळकर आणि सुषमा दोघंही बेशुद्धावस्थेत पललेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषीत केलं.
प्रेयसीच्या घरासमोर गेला आणि स्वतःवर टाकला पेट्रोल; नंतर जे घडलं ते हादरवणारं
सागर आणि सुषमा अवघ्या महिन्याभरापूर्वीच विवाहबंधनात अडकले होते. गेल्या रविवारी आंबोली येथे फिरायलाही गेले होते. दरम्यान बाथरूममधील गॅस गिझरमधून वायू गळती होऊन कार्बन मोनॉक्साईड वायू जमा झाला असावा आणि यातच श्वास कोंडून या दोघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेने करमळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच नवीन आयुष्य सुरू केलेल्या या तरुण जोडप्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.