police (फोटो सौजन्य- pinterest )
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणी पोलिसांतून बडतर्फ केलेला वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. साथीदार कुंदन भंडारी, महेश पाटील दोषी ठरले आहेत. तर राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींना ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
संतापजनक चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक
आरोपी नंबर १ अभय कुरुंदकर याला कलम ३०२ अंतर्गत खून प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी नंबर २ राजू, पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी नंबर ३ कुंदन भंडारी आणि आरोपी नंबर ४ महेश फळणीकर या दोघांना कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील अश्विनी बिद्रे यांचे अपहरण करून हत्या प्रकरणात अभय कुरूंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. राजू पाटील याची पुराव्याअभावी निदर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाचा म्हणजेच ३०२ चा गुन्हा कुरुंदकर याने केल्याचे निकालातून निष्पन्न झाले. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभाग होता. त्यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकले
दरम्यान, मयत अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाने जिल्हा हळहळला होता. अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी त्याच्या मीरा रोड येथील पलॅटवर बिद्वेचा अमानुष खून केला, त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे वृड़कटरने तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले. खुनात कुरूंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती. ७डिसेंबर २०१७ ०१७ रोजी ठाणे जिल्ह्यात वरिक्ष पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुरूंदकरला या प्रकरणात अटक झाली.
११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार
अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आज न्यायालयात हजर होते. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार असून यावेळी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
राष्ट्रपतीपदक शिफारस; न्यायाधीश संतापले
या निकालाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील पोलिसांचे लक्ष लागून राहिले होते. सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप घरत यांनी काम पाहिले. पनवेलच्या सहायक पोलिस उपायुक्त तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते, तब्बल १९ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागत असून अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरूंदकर दोषी ठरला आहे. दरम्यान, अभय कुरुंदकरवर अनेक आरोप असताना त्याची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते, हे भयंकर असून राष्ट्रपतीपदक शिफारस करणाऱ्या कमिटीवर न्यायाधीश संतापले.