कोरेगाव : कोरेगावला हायटेक शहर बनवत असताना, या शहराचे व्यवस्थापन पाहणार्या नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी पावले टाकली आहेत. त्यांनी उर्जा बचतीसह नगरपंचायतीच्या वीज बिलाच्या खर्चाला कात्री लावण्यासाठी सोलर ग्रीड उभारणीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून, त्यासाठी तब्बल ४ कोटी १३ लाख ३८ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सोलर ग्रीड उभारणीचा शुभारंभ शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसीतील पंप हाऊस येथे आमदार महेश शिंदे यांच्याहस्ते होणार आहे.
कोरेगाव शहराला सध्या कृष्णा, वसना, वांगणा या नद्यांसह स्थानिक आड व विहिरीवरुन पाणी पुरवठा केला जातो. अहोरात्र पाण्याचा उपसा नदीपात्रातून केला जात असल्याने मोठ्याप्रमाणावर त्यासाठी वीज खर्च होत असून, लाखो रुपयांचे वीज बील दरमहा नगरपंचायत गेली अनेक वर्षे भरत आली आहे. नगरपंचायतीला स्वत:चे उत्पन्नाचे साधन नसल्याने ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असून, कर्मचारी पगार करणे देखील मुश्किल बनले आहे. कर्मचार्यांदचा अनेक वर्षांचा पगाराचा प्रश्नस, उत्पन्नवाढ आणि वीज बिलामध्ये कपात हा त्रिसुत्री कार्यक्रम आमदार महेश शिंदे यांनी हातात घेतला होता.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा करुन नगरपंचायतीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांमधून निधीची तरतूद करुन घेतलेलीच आहे, त्याचबरोबर विजेच्या बाबतीत नगरपंचायतीला स्वयंपूर्ण बनविणे, पाणीपुरवठ्यावरील खर्चामध्ये कपात करणे यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न होता. केंद्र सरकारने सौर ऊर्जेला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने त्यांनी अपारंपारिक ऊर्जा विभागाच्या माध्यमातून नगरपंचायतीसाठी सोलर ग्रीड प्रकल्प मंजूर करुन घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे त्यासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.
सोलर ग्रीड उभारणीसाठी राज्य सरकारने ४ कोटी १३ लाख ३८ हजार रुपये मंजूर केले असून, त्यामध्ये अपारंपारिक ऊर्जा विकास योजना सन २०२२-२३ अंतर्गत नगरपंचायतीच्या एमआयडीसीतील पंपहाऊस येथे ११४ किलोवॅट क्षमतेचा आणि बाजारपेठेतील नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयाच्या छतावर २० किलोवॅट क्षमतेचा असा एकूण १३४ किलोवॅट क्षमतेचे दोन पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प नेट मीटर उपकरणासह आस्थापित करण्यासाठी ६३ लाख ५५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन २०२२-२३ मध्ये नगरपंचायतीच्या कठापूर येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या पंपहाऊस येथे सौरप्रकल्प बसविण्यासाठी ३ कोटी ३ लाख ३९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नगरपंचायत हद्दीत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कंट्रोल रुमचे बांधकाम करण्यासाठी ४६ लाख ४४ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
सौरऊर्जा प्रकल्पामुळे नगरपंचायतीच्या मुख्य कार्यालयातील महावितरण कंपनीकडून केला जाणारा वीज पुरवठा हा कमीत कमी वापरला जाणार असून, सौरऊर्जेद्वारे सर्व प्रशासकीय कामकाज चालणार आहे. त्यामुळे दरमहा वीज बिलामध्ये मोठी बचत होणार आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा विभागामध्ये पाणी उपसा आणि पाणी वितरण, पाणी शुध्दीकरण यासाठी लागणारा वीज पुरवठा देखील आता कमी प्रमाणात वापरला जाणार असून, सौरऊर्जेद्वारे दोन्ही कामे होणार आहेत. कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी देेखभाल असलेल्या या प्रकल्पामुळे मोठी बचत होणार आहे.
नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा
कोरेगाव नगरपंचायतीच्या कर्मचार्यांदचे शासन सेवेत समावेशन आणि दरमहा लांबत जाणारा पगाराचा विषय कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला होता. नगरपंचायत कर्मचार्यांरनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते, त्यावेळी चर्चा करत असताना आ. महेश शिंदे यांनी वीज बिल बचत, सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचा शब्द दिला होता, त्यानुसार त्यांनी राज्य सरकारकडून योजना मंजूर करुन घेत नगरपंचायतीचे दरमहा ९ ते १० लाख रुपये वीज बिलावर होणारा खर्च वाचवला आहे. या पैशातून कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्नच मिटणार असून, शासन सेवेतील समावेशनाचा विषय देखील अंतिम टप्प्यात आला आहे. एकूणच आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाववासियांसह नगरपंचायत कर्मचार्यांतना दिवाळीच्या पार्श्वएभूमीवर मोठा दिलासा दिला आहे.