लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाला येण्याची शक्यता आहे (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Ladki Bahin Yojana july installment : मुंबई : महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून ही वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे देखील समोर आले आहे. या योजनेंतर्गत दरमहा महिन्यांना 1500 रुपये दिले जातात. मात्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता देणे अजून बाकी आहे. जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आल्यानंतर देखील पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा अजूनही सुरु आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2 कोटीहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. यानंतर आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या योजनेच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. मात्र आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी देखील पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. मात्र याच जुलैच्या हप्त्याबबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला खास भेट मिळणार आहे. जुलै-ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित मिळून 3000 रुपये एकत्रच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याचे मीडिया रिपोर्टनुसार सोमर आले आहेत. मात्र योजनेचे पैसे नेमके कधी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झाल्यास महिलांना 3000 रुपये एकत्र मिळाल्याने त्यांचा राखीचा सणाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीच्या तीन भावांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणानिमित्त एकत्रित पैसे मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारकडून निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमधून आता लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. सुरुवातीला सर्व महिलांना पात्र केल्यामुळे राज्याच्या तिजोरी ओझे आले. यामध्ये सरकारी नोकरदार तसेच जास्त उप्तन्न असलेल्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला असल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर आणखी एक मोठा घोटाळा झाल्याचे आत्तापर्यंत उघड झाले आहे. लाडकी बहीण योजनेचा 14 हजारांपेक्षा जास्तच पुरूषांनी या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपये लाटल्याचे काही दिवसांपूर्व उघड झाले आहे. या सर्व दोडक्या भावांकडून पैशांची वसूली केली जाणार असल्याचे सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व पुरुषांनी मागील 10 महिन्यांपर्यंत 1500 रुपये लाटले असून वाटप करण्यात आलेल्या या रकमेचा आकडा 21 कोटींपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची छाननी झाल्यावर त्यातूनच ही माहिती समोर आली होती. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा देखील घेतला होता.