कल्याण-डोंबिवली : कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाने ई आफिस द्वारे कामामध्ये गतीमानाता आण्यासाठी भर दिला आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कल्याण डोंबिवली मनपाच्या नगररचना विभागाने विकासकामांना बी पी एम् एस् प्रणाली अंतर्गत आँनलाईन प्रक्रिया द्वारे बिल्डिंग परवानगी, पार्ट परवानगी, (सी सी), पूर्णत्व दाखला, सुधारित परवानग्या (रिव्हाईज्) अशा तब्बल १०६ परवानग्या आँनलाईन माध्यमातून दिल्या आहेत. कल्याण डोंबिवली मनपाच्या मुख्यालयातील नगररचना विभागात वास्तू विशारद, विकासक, यांचा परवानग्यासाठी राबता दिसत असे. आँनलाईन पद्धतीत यानिमित्ताने परवानग्या साठी टेबल टु टेबल पाठ पुरावा करावा लागत आहे. फाईलच्या या कारभारात गतीमानाता दिसून येत नसल्याने वास्तूविशारद, विकासक, फेऱ्या मारण्याची वेळ येत असल्याचे समजते.
कल्याण डोंबिवली मनपाने विकासक, वास्तुविशारद यांच्या सोयीसाठी तसेच नगर रचना विभागाशी निगडित परवानग्या बाबत बी पी एस प्रणाली राबवित ऑनलाईन प्रक्रिया द्वारे परवानगी प्रणाली राबवित आहे. कल्याण डोंबिवली मनपा नगरचना विभागात कल्याण पश्चिम सेक्टर १, ३, ६, ७ तसेच कल्याण पूर्व सेक्टर ४, डोंबिवली सेक्टर २, ५ अंतर्गत १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान विकासाकडून आलेल्या आँनलाईन प्रक्रिया नुसार, सेक्टर १ (कल्याण, चिकणघर) यात १७ बिल्डिंग परवानग्या, पार्ट परवानगी (सी सी) ५ ,सुधारित परवानग्या (रिव्हाईज्) ६ देण्यात आल्या. सेक्टर -२ ( जी बी पाथर्ली, ठाकुर्ली, चोळे, डोंबिवली नवागाव, आयरे गाव) या क्षेत्रातील विकासकांना आँनलाईन द्वारे ३ बिल्डिंग परवानग्या, पार्ट परवानगी (सी सी) १ पूर्णत्व दाखला २, अशा आँनलाईन परवानग्या देण्यात आल्या. आँनलाईन परवानगी प्रक्रियेत १ परवानगी प्रकरण रिजेक्ट करण्यात आले.
सेक्टर -३ (कल्याण पश्चिम, चिकणघर, बारावे, वाडेघर, गंधारी, सपार्डे, ऊभार्डे, कोळवली, शहाड गौरीपाडा) याक्षेत्रातील १२ बिल्डिंग परवानग्या, पार्ट परवानग्या (सी सी) १०, पूर्णत्व दाखला ९ सुधारित ८ परवानग्या आँनलाईन प्रक्रिया देण्यात आल्या. तसेच सेक्टर -४ ( खडे गोळवली, काटेमानेवली, नेतेवली, कचोरे, तीसगाव) बिल्डिंग परवानगी, पार्ट परवानग्या, पूर्णत्व दाखला २, सुधारित परवानग्या १ अशा आँनलाईन प्रक्रियेत देण्यात आल्या.
सेक्टर – ५ (जी बी पाथर्ली, चोळे, काचंनगाव, गावदेवी, आयरे, कोपर, नवागाव, शिवाजी नगर, जुनी डोंबिवली) या क्षेत्रात बिल्डिंग परवानग्या ४, पार्ट परवानग्या, पूर्णत्व दाखला सुधारित परवानग्या २ अशा परवानग्या विकासकांना आँनलाईन प्रक्रियेत देण्यात आल्या. सेक्टर – ६ (बल्याणी, उंभर्णी, मोहने, गाळेगाव, वडवली, अटाळी, आंबिवली) याक्षेत्रात बिल्डिंग परवानग्या ०, पार्ट परवानग्या (सी सी) ३, पूर्णत्व दाखला १, सुधारित ०, अशा परवानग्या नगररचना विभागाकडून आँनलाईन प्रक्रियेत देण्यात आल्या. सेक्टर – ७ ( टिटवाळा, मांडा) बिल्डिंग परवानगी २ , पार्ट परमिशन ( सी सी)१, पूर्णत्व दाखला २, सुधारित २ अशा परवानग्या नगररचना विभागाकडून आँनलाईन प्रक्रियेत देण्यात आल्या.
२७ गावे ( ग्रामीण) ( अडवली, ढोकाळी, निळजे, घेसर, निळजे, उसरघर,भोपर, नांदवली, गोळवली, पिसवली, मानवली ऊ़ंर्बेली , चिंचपाडा, द्वारली भाल, ओशळे, वसार, घारवली, सहागाव काट ई, मन्यारे, हेदुटणे दावडी ) क्षेत्रातील ७ बिल्डिंग परवानग्या, पार्ट परवानग्या (सी सी) १, पूर्णत्व दाखला ४, सुधारित परवानग्या २ अशा आँनलाईन प्रक्रियेत नगररचना विभागाकडून देण्यात आल्या आहेत. एकंदरीत परवानग्या साठी विकासकांनी कल्याण विभागाकडे आँनलाईन प्रक्रियेत सहभाग घेऊन आपल्या परवानग्या आँनलाईन स्तरावर प्राप्त केल्याचे चित्र दिसत असून डोंबिवली विभागात अघाप देखील आँफ लाईनला प्र क्रिया परवानग्या संदर्भात मार्ग अवलंबवित असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.नगररचना विभागातील परवानग्या संदर्भात मनपा मुख्यालयात होणारा वाढता राबता आणि आँफ लाईन प्रक्रियेत फाईलचा पाठ पुरावा करण्यासाठी वणवण थांबविण्यासाठी आता आँनलाईन प्रक्रिया परवानगीची अमंलबजावणी प्रभावी पणे प्रशासनाने राबविण्यावर तसेच विकासकांनी देखील आँनलाईन प्रक्रिया प्रक्रियेवर भर देणे गरजेचे आहे. जिणेकरून परवानग्या निपटरा गतीमानातेने होईल. अशा चर्चा पालिका वुर्तळात रंगल्या आहेत.
नव्याने मनपा आयुक्त पदाचा कारभार स्वीकरलेल्या आयुक्त इंदू राणी जाखड यांनी कामकाज गतीमान होण्याबाबत तसेच ई आँफिस प्रणाली द्वारे नागरिकांना सुविधा, परवानग्या बाबत आग्रही असल्याच्या त्यांच्या कामकाज पध्दतीनुसार आधिकारी मिटिंग घेत आढावा घेत प्रभावी अंमलबजावणी दुष्टीकोन दिसून येत आहे.
“आधिकारी सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी पासून आँनलाईन प्रक्रिया पध्दती अमंलबजावणी व्यापक पणे होणे बाबत शासन निर्णय असून जिणेकरून जलदगतीने निपटरा होत असल्याने काही त्रुटी असल्यास घरीबसून देखील विकासकाला परवानगी बाबत कळू शकणार असून फेर्या माराव्या लागणार नाहीत.”