• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Leopards Have Created Fear Among Farmers In Purandar Taluka

Leopard : पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी

पुरंदर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर लक्षणीय प्रमाणात वाढल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 12:30 AM
पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर; शेतकऱ्यांची वन विभागाकडे मोठी मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुरंदर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर
  • शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
  • वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी
सासवड : पुरंदर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर लक्षणीय प्रमाणात वाढल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थंडीचे दिवस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना विजेच्या उपलब्धतेनुसार लवकर किंवा उशिरा शेतात जावे लागते. मात्र याच काळात बिबट्यांचे दिवसा ढवळ्या शेतात आणि रस्त्यावर दर्शन अधिकाधिक होऊ लागल्याने शेतकऱ्यांचे दैनंदिन शेतीकाम धोक्यात आले आहे. तालुक्यात कुठल्याही गावात गेल्यास बिबट्याचाच विषय चर्चेत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

पूर्वी किल्ले पुरंदर परिसरातील काळदरी, पानवडी, चीव्हेवाडी आणि दक्षिण भागातील काही गावांपर्यंतच बिबट्यांचे अस्तित्व होते. त्या भागातील शेतकरी त्यामुळेच त्रस्त झाले होते. परंतु आता ही हालचाल दिवे घाट, बोपदेव घाट ओलांडून सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी या गावांपर्यंत पोहोचली आहे. या परिसरात कोल्हे, लांडगे, तरस, मोर, हरीण, ससे, रानडुक्कर यांची संख्या मोठी असल्याने बिबट्यांना शिकारीसाठी अनुकूल परिस्थिती मिळू लागली आहे.

उसाच्या क्षेत्रवाढीमुळे बिबट्यांना सुरक्षितता

पुरंदरचा पूर्व भाग पारंपरिकरीत्या दुष्काळी मानला जात होता. फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती होत होती. पुरंदर उपसा योजनेंनंतर मात्र विविध पिकांसह अलीकडे उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या भागात उसाच्या दाट शेतीमुळे बिबट्यांना लपून बसण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या सर्वच गावांमध्ये शेतकऱ्यांना बिबट्याचा वारंवार सामना करावा लागत आहे.

प्रजनन वाढीचा गंभीर धोका

या परिसरात सातत्याने बिबट्यांचा वावर दिसत असून, तेच त्यांचे स्थायी ठिकाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी वनपुरी येथे गाभण असलेली वाघीण शेतकऱ्यांच्या नजरेस पडली. तिच्या वीण झाल्यानंतर किमान सात–आठ पिल्लांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या असलेली बिबट्यांची संख्या पाहता आगामी काळात त्यांच्या प्रजननात वाढ होणे हा स्थानिकांसाठी गंभीर धोका ठरू शकतो. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

वन विभागाने तातडीने पावले उचलावीत

बिबट्यांच्या वाढत्या उपस्थितीमुळे शेतकरी सतत भयभीत आहेत. काही दिवसांपूर्वी वनपुरी येथे वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पाहणी केली, मात्र त्यांना कोणताही ठसा किंवा हालचाल आढळली नाही. तरीदेखील इतर भागातील माहिती मिळूनही विभागाने मोठा ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या नेमकं काय?

  • बिबट्यांची नियमित वावरणारी ठिकाणे शोधून तेथे पिंजरे बसवावेत
  • उसाच्या दाट शेतांची ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करावी
  • बिबट्यांचा शोधमोहीम तातडीने राबवावी
वन विभागाचा प्रतिसाद

सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, सासवड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वनपुरीत आमच्या रेस्क्यू टीमने पाहणी केली; मात्र कोणतेही ठसे किंवा बिबट्याचे हालचालीचे चिन्ह दिसले नाही. तरीही जिथे बिबट्यांचा वावर आहे, तेथील मागणीनुसार आवश्यक ठिकाणी पिंजरे बसवले जातील. आमचे कर्मचारी सतत त्यांचा मागोवा घेत आहेत. शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि फेक फोटो पुढे पाठवू नयेत.”

Web Title: Leopards have created fear among farmers in purandar taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Farmers
  • Leopard
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

Nashik News : निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
1

Nashik News : निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

खेड तालुक्यात बटाटा काढणीला वेग; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत
2

खेड तालुक्यात बटाटा काढणीला वेग; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अडचणीत

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत
3

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत

Gondia News: गोंदियात बिबट्याचा धुमाकूळ! चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून ठार, जंगलव्याप्त गावांमध्ये दहशतीचे वातावरण
4

Gondia News: गोंदियात बिबट्याचा धुमाकूळ! चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून ठार, जंगलव्याप्त गावांमध्ये दहशतीचे वातावरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; पण तरीही उमेदवारांना ‘असा’ करता येणार प्रचार

महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; पण तरीही उमेदवारांना ‘असा’ करता येणार प्रचार

Jan 14, 2026 | 07:15 AM
Tech Tips: लॅपटॉप चार्जिंगला लावून कधीही करू नका ही कामं! नाहीतर होईल अनर्थ, तात्काळ बदला तुमची सवयी

Tech Tips: लॅपटॉप चार्जिंगला लावून कधीही करू नका ही कामं! नाहीतर होईल अनर्थ, तात्काळ बदला तुमची सवयी

Jan 14, 2026 | 07:06 AM
OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

OnePlus Freedom Sale: एवढा स्वस्त कधीच नव्हता! ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय आतापर्यंतचं सर्वात माठं डिस्काऊंट, वाचा फीचर्स

Jan 14, 2026 | 06:30 AM
तिळगुळासारखा गोडवा आयुष्यात टिकून राहो…!  मकर संक्रांतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या गोड शुभेच्छा

तिळगुळासारखा गोडवा आयुष्यात टिकून राहो…! मकर संक्रांतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या गोड शुभेच्छा

Jan 14, 2026 | 05:30 AM
शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता

शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता

Jan 14, 2026 | 04:15 AM
“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद

“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद

Jan 14, 2026 | 02:35 AM
India’s rabies vaccine : भारताच्या रेबीज लसीमध्ये असे आहे तरी काय? ज्यामुळे परदेशात होतोय विरोध

India’s rabies vaccine : भारताच्या रेबीज लसीमध्ये असे आहे तरी काय? ज्यामुळे परदेशात होतोय विरोध

Jan 14, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM
Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Jan 13, 2026 | 07:27 PM
Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Jan 13, 2026 | 07:19 PM
Nashik Election :  महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Nashik Election : महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Jan 13, 2026 | 07:13 PM
Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Jan 13, 2026 | 01:43 PM
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.