महापालिका निवडणुकांसाठी तयार रहा (Photo Credit- Social Media)
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यापासून या निवडणुकांबद्दल अनेक बातम्या समोर येत आहे. सुरावातीला या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकतात, असे सांगितले जात होते. पण आता पुन्हा एकदा यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवडणुकांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास, म्हणजेच नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता तटकरेंनी वर्तवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या “सशक्त संघटन” कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी सहभाग घेतला आणि विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता न आल्याची कबुली दिली. तसेच अजितदादा यांच्या नेतृत्वावर झालेल्या टीकेबाबत आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. तटकरे म्हणाले, “महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले जाणार नाही, असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. पण कार्यकर्त्यांना मात्र अजितदादांबद्दल खूप विश्वास होता. आपण आपण विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, तरी विधानसभेत घवघवीत यश मिळवलं,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कॅनडात भीषण दुर्घटना; व्हँकुव्हरमध्ये स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान एका भरधाव कारने अनेकांना चिरडले
सुनील तटकरेंनी योजनेवर करण्यात आलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. ‘लाडकी बहीण’ आणि ‘लेक योजना’ या उपक्रमांवर टीका झाली होती. मात्र, अजितदादांनी या दोन्ही योजना प्रभावीपणे राबवून त्यांना यशस्वी केलं.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ” मागील तीन-चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात या निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकांपूर्वी जनतेच्या मनात आपल्यासंबंधी विश्वास निर्माण होईल, यावर पक्षाने भर द्यायचा आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के महिलांना संधी देण्याचा निर्धारही कऱण्यात आल्याचं तटकरेनी म्हटलं आहे.
BSNL ने Jio आणि Airtel ची उडवली झोप, 336 दिवसांसाठी मिळणार भरपूर बेनिफिट्स
निवडणुकीतील मुख्य मुद्द्यांबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, “जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे पक्षाने लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करायच्या आहेत. आगामी निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढणार आहोत. अजितदादांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने पुढे येऊन आगामी निवडणुकांसाठी काम करावे,” असे आवाहन करत तटकऱ्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबलही वाढवलं.