घाटकोपरमध्ये रेल्वे प्रवाशाचा मृत्यू (फोटो- istovkphoto)
घाटकोपर: Train Accident: घाटकोपरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकल ट्रेनमधून उतरताना या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. लोकलमधून उतरताना लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.
घाटकोपरमध्ये चालत्या रेल्वेतून उतरणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. फलाट क्रमांक 1 वर ही दुर्दैवी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केल्याने तो प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला. थोड्या वेळाने त्याला आरपीएफच्या जवानांनी बाहेर काढून रूग्णालयात नेले. मात्र त्यावर त्याचा मृत्यू झाला होता.
मुंब्रा लोकल अपघाताला २४ तास पूर्णहोताच दिसले भयावह दृश्य
सोमवारी मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ १३ प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊजण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मध्य रेल्वेच्या उशिरा धावणाऱ्या लोकल ट्रेन आणि कोलमडलेल्या नियोजनामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे.
आता या दुर्घटनेला काही दिवस झाले असतानाच दिवा रेल्वे स्थानकात भयावह दृश्य दिसून आले आहे. दिवा स्थानकात एसी लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी होती, की एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. त्यामुळे एसी लोकल बराचवेळ दिवा स्थानकात थांबून राहिली. प्रवासी लोकल ट्रेनप्रमाणे एसी ट्रेनच्या दरवाजात लटकले होते. दारात लटकलेले प्रवासी काही खेळूया खाली उतरायला तयार नव्हते. या सगळ्या गोंधळामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दिवा- मुंब्रा लोकल दुर्घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ठाणे रेल्वे पोलिस दलातील कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्याद हेही मृत्यूमुखी पडले आहेत. धावत्या लोकलमधून १० ते १२ जण खाली पडल्याने सकाळी हा दुर्दैवी अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि अनेक प्रवासी दारांवर लटकून प्रवास करत होते.