मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, या आजारामुळे पशुपालक धास्तावले आहेत. दरम्यान, सध्या ४० गायी लंपी आजाराने बाधित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.
वातावरणातील तपमान वाढत चालल्यामुळे लंपी आजार ही वाढत चालला आहे. हा आजार जून महिन्यात कमी झाला होता. परिणामी कमी आजारामुळे पशुपालकांचा जीवही भांड्यात पडला होता. मात्र पुन्हा या आजाराने जोर धरल्याने जनावराच्या अंगावर बारिक गाठी उद्भवत असून, पायांना सूज येत असल्याचे चित्र आहे.
गावनिहाय लम्पी आजारांची संख्या पुढीलप्रमाणे
शेलेवाडी -२, डोंगरगाव -१, हिवरगांव-१, मारोळी -१, लक्ष्मी दहिवडी-२, नंदेश्वर-३, हुलजंती-२, सोड्डी-२, पाटखळ-२, बठाण-१, माचणूर-५, मुंढेवाडी-१, सिध्दापूर-३, अरळी-४, तामदर्डी-५, तांडोर-४, नंदूर-१ अशी गावनिहाय ४० बाधित गायींची संख्या आहे. दरम्यान मध्यंतरी लम्पीग्रस्त ४९ हजार ४३४ गायी व वासरांना लसीकरण करण्यात आले हाेते.
[blockquote content=”बाधित जनावरे बाजूला बांधावीत. त्यांची स्वच्छता राखावी. चारा व पाणी वेगळे करावे. गोचीड, गोमाशी यांचे निर्मुलन करावे.” pic=”” name=”- डाॅ. तानाजी भोसले, पशूधन विकास अधिकारी, मंगळवेढा”]