Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Marathi news Live Blog- विशेषतः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 23, 2026 | 06:54 PM
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra to World Breaking News:  

कल्याण-डोंबिवलीत शिंदे गट-मनसे युतीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया

  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेसाठी दौऱ्यावर असताना महाराष्ट्रात मात्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) शिवसेना शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दावोसमध्ये पत्रकारांनी कल्याण-डोंबिवलीतील या संभाव्य युतीबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. “सध्या मी दावोसमधील गुंतवणुकीवर आणि जागतिक करारांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतात परतल्यानंतर मुंबईत जे करार झाले आहेत आणि जी राजकीय परिस्थिती आहे, त्यासंदर्भात सविस्तर उत्तरे देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही या विषयावर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

The liveblog has ended.
  • 23 Jan 2026 08:20 PM (IST)

    23 Jan 2026 08:20 PM (IST)

    मोठी बातमी! छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा, मनी लाँड्रिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त

    महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील एका न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने ईडी प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींची नावे वगळली होती. हा खटला २००५ चा आहे, जेव्हा राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते.

  • 23 Jan 2026 08:12 PM (IST)

    23 Jan 2026 08:12 PM (IST)

    Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !

    कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथानक अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर पोहोचत आहे. या कालावधीत स्वामी समर्थ अचानक एका रात्री स्थानावरून नजरेआड होतात आणि सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत दिसतात. सुंदरा हादरून त्यांना प्रश्न विचारते, तेव्हा स्वामी म्हणतात की, “वेळ आली आहे. आता आम्हाला उंच जायचं आहे” असे सूचक शब्द बोलतात. हे शब्द स्वामींच्या महानिर्वाणाचे संकेत आहेत का, या विचाराने सेवेकरी अस्वस्थ होतात आणि स्वामींना नजरेआड होऊ न देण्याचा निर्णय घेतात. मात्र स्वामी आपल्या मर्जीनुसार वागतात आणि “हमने हमारा नया ठिकाना बना लिया है” असे सांगून सगळ्यांची उत्सुकता आणखी वाढवतात.

  • 23 Jan 2026 06:52 PM (IST)

    23 Jan 2026 06:52 PM (IST)

    20 मिनिटात 80% चार्ज आणि 810 किमीची तुफान रेंज! ‘या’ देशात नवीन Volvo EX60 सादर

    Volvo ने युरोपियन मार्केटसाठी आपली नवी इलेक्ट्रिक SUV EX60 सादर केली आहे. ही Volvo ची नवीन EV-डेडिकेटेड SPA3 प्लॅटफॉर्मवर आधारित पहिली कार आहे. यामुळे ब्रँडने लक्झरी इलेक्ट्रिक मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये अधिकृत एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, EX60 ही पेट्रोल/डिझेलवर चालणाऱ्या Volvo XC60 ची पूर्णपणे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. युरोपनंतर ही SUV अमेरिकेतही लाँच केली जाणार आहे.

  • 23 Jan 2026 06:40 PM (IST)

    23 Jan 2026 06:40 PM (IST)

    Maharashtra Politics : मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात महायुतीचाच महापौर; एकनाथ शिंदे यांची उबाठावर घणाघाती टीका

    मुंबई: मुंबईकरांना २५ वर्ष खड्ड्यात घालणारे, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराने मुंबईची दुर्देशा केल्यामुळेच त्यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना भाजप युती मजबूत असून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथे महायुतीचाच महापौर बसेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

  • 23 Jan 2026 06:25 PM (IST)

    23 Jan 2026 06:25 PM (IST)

    …आणि बाळासाहेब ठाकरेंनी चक्क मुस्लिम लीगसोबत युती केली! गोष्ट शिवसेनेच्या पहिल्या महापौरपदाच्या रस्सीखेचाची

    आज 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिन. महाराष्ट्राचे राजकारण बाळासाहेब ठाकरेंशिवाय अपूर्ण आहे. मात्र, आजही स्थिती वेगळी आहे. आज शिवसेनेचे दोन भाग झाले असून खरी शिवसेना कोणाची? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे.

    नुकतेच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच मुंबईत ठाकरेंचा महापौर न बसता महायुतीचा पहिला महापौर बसणार आहे. मात्र, मुंबईत ठाकरेंचा पहिला महापौर कसा बसला यामागची बाळासाहेब ठाकरेंची राजकीय खेळी तुम्हाला ठाऊक आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • 23 Jan 2026 06:15 PM (IST)

    23 Jan 2026 06:15 PM (IST)

    विठ्ठल-रुक्मिणी शाही विवाह साजरा

    पंढरपूर: दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही वसंत पंचमीचे औचित्य साधून मंदिर समितीच्यावतीने विठ्ठल- रखुमाई शाही विवाह सोहळा साजरा करण्यात अाला. दुपारी १२ वाजता मंदिरातील मुख्य सभा मंडपात हा साेहळा भाविक-भक्तांनी अनुभवला. या सोहळयासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक, वऱ्हाडी मंडळी उपस्थित हाेती.

  • 23 Jan 2026 06:05 PM (IST)

    23 Jan 2026 06:05 PM (IST)

    Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?

    पुणे: पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात चांगलीच गाळणी लागली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत तब्बल ७१ उमेदवारांचे एकूण ८६ अर्ज बाद झाल्याने अनेकांचे निवडणूक स्वप्न अधांतरीच राहिले. यात पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतील २४ आणि पंचायत समिती निवडणुकीतील ४७ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे इच्छुकांच्या संख्येने फुगलेले निवडणूक रिंगण आता थोडेसे मोकळे झाले आहे.

  • 23 Jan 2026 05:45 PM (IST)

    23 Jan 2026 05:45 PM (IST)

    मोठी बातमी! छगन भुजबळ यांना न्यायालयाकडून दिलासा

    महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील एका न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने ईडी प्रकरणातील दोन प्रमुख आरोपींची नावे वगळली होती. हा खटला २००५ चा आहे, जेव्हा राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते.

     

  • 23 Jan 2026 05:34 PM (IST)

    23 Jan 2026 05:34 PM (IST)

    स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली

    प्रयागराजमधील माघ मेळाव्यादरम्यान मोठा वाद निर्माण झाला (Uttar Pradesh News) आहे. मौनी अमावस्येला संगमावर भाविकांची मोठी गर्दी जमली होती. मौनी अमावस्येपासून (१८ जानेवारी) माघ मेळाव्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे शंकराचार्य हे आंदोलनावर बसले आहेत. मागील सहा दिवसांपासून त्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र आता अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची प्रकृती खालावली आहे.

  • 23 Jan 2026 05:14 PM (IST)

    23 Jan 2026 05:14 PM (IST)

    कोल्हापूर महापौर पदावर इच्छुकांची संख्या वाढली

    कोल्हापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. अनेकांनी या पदावर आपला हक्क सांगितला असून त्यामुळे महापौर पदाच्या उमेदवाराची निवड आणि इच्छुकांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान भाजप नेत्यांवर आले आहे. यामध्ये विशेषता: सोशल मीडियावर उमेदवार समर्थकांनी आपला हक्क साकारण्यासाठी पोस्ट व्हायरल करण्याचा सपाटा चालविला आहे. यामुळे नेत्यांमध्ये एक गोंधळ उभा राहिला असून एकाच वेळी अनेक जण महापौर पदासाठी स्वतःचे नाव घेत आहेत.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 23 Jan 2026 04:50 PM (IST)

    23 Jan 2026 04:50 PM (IST)

    व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी ‘शिवतेज व्यापारी असोसिएशन’ची स्थापना

    उरण शहरातील व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण व एकजूट साधण्यासाठी ‘शिवतेज व्यापारी असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवारी राजपलानाका आणि गणपती चौक येथे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते झाले. माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कार्यरत राहणार असून व्यापाऱ्यांच्या समस्या व हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्यात येणार आहे. कार्यक्रमास व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 23 Jan 2026 04:45 PM (IST)

    23 Jan 2026 04:45 PM (IST)

    ‘टी२० विश्वचषकासाठी तयारी

    दक्षिण आफ्रिकेतील एसए२० लीग दरम्यान संथ खेळपट्टीवरुन वाद निर्माण झालाम असून त्यावर टीका होताना दिसत आहे. यावर आता प्रिटोरिया कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शॉन पोलॉक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.माजी दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू पोलॉकचा असा विश्वास आहे की खेळपट्ट्या पाहता, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त आयोजनात २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दल काळजी करण्याची गरज नाही, कारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळपट्ट्या तयार करण्यासाठी अजूनही भरपूर वेळ आहे. पोलॉकने सौरव गांगुलीसोबत त्याचा ड्रेसिंग रूम शेअर केला.पोलॉक म्हणाला, “त्या टप्प्यावर खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या असतील. तुमच्याकडे त्या तयार करण्यासाठी अधिक वेळ आहे. मला काळजी नाही.”

  • 23 Jan 2026 04:40 PM (IST)

    23 Jan 2026 04:40 PM (IST)

    रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाची कारवाई तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टरचा पर्दाफाश

    रेल्वेच्या व्हिजिलन्स विभागाने कारवाई करत तोतया व्हिजिलन्स इन्स्पेक्टर हरीश कांबळे याला कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात घेतलं.बुकिंग क्लार्कचे रेल्वे DRM कार्यालयात अडकलेले पैसे काढून देण्याचे आमीष दाखवत  60 हजारांची मागणी केली होती.बुकिंग क्लार्ककडून 20 हजार रुपये स्वीकारताच पथकाने हरिश कांबळेला रंगेहाथ पकडलं.

  • 23 Jan 2026 04:25 PM (IST)

    23 Jan 2026 04:25 PM (IST)

    व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी ‘शिवतेज व्यापारी असोसिएशन’ची स्थापना

    उरण शहरातील व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण व एकजूट साधण्यासाठी ‘शिवतेज व्यापारी असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या नामफलकाचे अनावरण शुक्रवारी राजपलानाका आणि गणपती चौक येथे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते झाले. माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना कार्यरत राहणार असून व्यापाऱ्यांच्या समस्या व हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्यात येणार आहे. कार्यक्रमास व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 23 Jan 2026 04:20 PM (IST)

    23 Jan 2026 04:20 PM (IST)

    घराणेशाही मोडीत काढणार एडवोकेट नयना पवार

    शिरगाव..शिरगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात शिवसेना भाजप रिपाई युतीच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ दिशा दत्ता कांबळी व पंचायत समितीच्या उमेदवार एडवोकेट नयना पवार यांनी डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात केले आहे प्रचारादरम्यान निशाणी बरोबर आपलं नेमकं व्हिजन काय हे मतदारांना सांगताना दिसून येत आहेत त्यामुळे एक अगळा वेगळा प्रचार पाहायला मिळत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात तिरंगी लढत होत आहे त्यामध्ये युतीचे उमेदवार यांनी डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात केली आहे शिरगाव गावातून प्रचार आरंभ करण्यात आला आहे दोन्ही उमेदवार चिन्हाबरोबर आपला व्हिजन मतदारांना सांगत आहेत त्यामुळे वेगळा प्रचार पाहायला मिळत आहे शिरगाव पंचायत समिती गणातील घराणेशाही जनता मोडीत काढील त्यासाठीच नागरिकांनी मला उभे केले आहे अशी प्रतिक्रिया पंचायत समिती गणाचे उमेदवार एडवोकेट नयना पवार यांनी दिली तसेच रस्ते पाखाड्या पाणी योजना ही कामे होतच राहतील मात्र तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग महिलांना उपलब्ध करून देण्याचे काम आपण करणार असल्याचे एडवोकेट नयना पवार यांनी सांगितले .

  • 23 Jan 2026 04:15 PM (IST)

    23 Jan 2026 04:15 PM (IST)

    शेमडी गावाच्या ग्रामदेवताचे दर्शन घेऊन फोडला प्रचाराचा नारळ.

    खालापूर तालुक्यातील आत्करगाव जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणासाठी परिवर्तन विकास आघाडी तर्फे राष्ट्रवादीच्या जिल्हापरिषद च्या उमेदवार श्रद्धा अंकित साखरे व पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी अजित देशमुख यांचा प्रचाराचा नारळ फोडला व प्रचाराचा शुभारंभ केला.खालापूर तालुक्याचे टोक असणारे शेमडी या गावात हा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शेमडी गावाच्या ग्रामदेवताचे श्रद्धा साखरे व देवयानी देशमुख यांनी पूजा केली. व प्रचाराचा नारळ फोडला.

  • 23 Jan 2026 04:14 PM (IST)

    23 Jan 2026 04:14 PM (IST)

    बदलापूरमध्ये ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न प्रकरण

    बदलापूरमध्ये  चिमुकलीवर अत्याचार झालेल्या प्रकरणात आरोपी इमरान पटेल याला बदलापूर पाेलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी  आरोपीला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीची स्कूल व्हॅन केली जप्त केली असून २४ हजाराचा दंड सुनावण्यात आला.

     

  • 23 Jan 2026 03:52 PM (IST)

    23 Jan 2026 03:52 PM (IST)

    हिवाळ्यात घसा खराब झालाय? मग अशाप्रकारे घरी बनवा

    हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उब देणारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी नैसर्गिक पेये अधिक उपयुक्त ठरतात. अद्रक आणि मध ही दोन्ही घटक पोषक तत्त्वांनी समृद्ध असून सर्दी-खोकला, घशातील खवखव आणि थकवा कमी करण्यासाठी ओळखले जातात. या दोन्हींच्या संगमातून तयार होणारी अद्रक -मधाची चहा चवीला स्वादिष्ट तर आहेच, पण शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते. आल्याचा तिखटपणा आणि मधाचा दाहक-विरोधी गुणधर्म घशातील जळजळ आणि कफ कमी करतात. यात असणाऱ्या अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे स्नायूंच्या वेदना आणि सांधेदुखीत आराम मिळतो. ही चहा तयार करण्यासाठी फारशी गुंतागुंत नसते. निवडक साहित्यापासून हा चहा तयार केला जातो.

  • 23 Jan 2026 03:45 PM (IST)

    23 Jan 2026 03:45 PM (IST)

    संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाची चमकदार कामगिरी!

    भारतीय विद्यापीठ संघाच्या (AIU) वतीने आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सव ‘अन्वेषण’मध्ये मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने २ सुवर्ण आणि २ कांस्य अशी एकूण ४ पदके पटकावत आपली संशोधनातील गुणवत्ता अधोरेखित केली. २० आणि २१ जानेवारी रोजी गुजरातमधील सरदार पटेल विद्यापीठ येथे या संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यांतील एकूण ३२ विद्यापीठांचा सहभाग होता. विविध विद्यापीठांतील संशोधक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प पोस्टर व मौखिक सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केले.

  • 23 Jan 2026 03:30 PM (IST)

    23 Jan 2026 03:30 PM (IST)

    Chandrapur News: डिजिटल युग तरीही बँकेत रांगा!

    Chimur: देशाने डिजीटल, ऑनलाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रवेश केला तरी आजही ग्राहकांना बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी तासंतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. डिजीटल इंडियाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात असला तरी प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना अजूनही पारंपरिक पद्धतींनी बँकिंगचे काम करावे लागत आहे. आधार लिंकिंग, केवायसी अपडेट, पेन्शन काढणे, सरकारी योजनांमधून निधी प्राप्त करणे, खाते उघडणे किंवा पैसे जमा करणे आणि काढणे, प्रत्येक लहान किंवा मोठ्या कामासाठी ग्राहकांना बँकेच्या काउंटरवर रांगेत उभे राहावे लागत आहे.

  • 23 Jan 2026 02:50 PM (IST)

    23 Jan 2026 02:50 PM (IST)

    50 दिवसांपासून बेपत्ता झालेले मंत्र्यांचे सुपुत्र अखेर पोलिसांना शरण!

    Vikas Gogawale appears on police : रायगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी महाडमधील (Mahad News) वाद टोकाला गेल्याचे दिसून आले. यामध्ये मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे पुत्र विकास गोगावले वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी वाद घातला होता. यानंतर विकास गोगावले हे बेपत्ता होते. मागील 50 दिवसांपासून ते बेपत्ता होते. यामुळे पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर अखेर 50 दिवसांनी विकास गोगावले हे पोलिसांना शरण आले आहे.

  • 23 Jan 2026 02:45 PM (IST)

    23 Jan 2026 02:45 PM (IST)

    सान्या मल्होत्रा टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यासाठी सज्ज, नकार बदलला होकारात

    बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने तिच्या दमदार अभिनयाने आणि सहजतेने नेहमीच लोकांची मने जिंकली आहेत आणि पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहते भावूक, जिज्ञासू आणि तितकेच उत्साही झाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ सान्याला एका लोकप्रिय डान्स रिॲलिटी शोच्या सेटवरील आहे. जिथे ती तिच्या भूतकाळातील एक अत्यंत वैयक्तिक आठवण पुन्हा सांगताना दिसत आहे.

  • 23 Jan 2026 02:40 PM (IST)

    23 Jan 2026 02:40 PM (IST)

    पूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, हा स्टार वेगवान गोलंदाज बाहेर; कोणाचे नशीब चमकणार?

    २०२६ चा टी२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडसाठी वाईट बातमी येत आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अॅडम मिल्नेला एसए२० लीग दरम्यान ही दुखापत झाली. सध्या भारतात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणाऱ्या काइल जेमिसनला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. जेमिसन आधीच न्यूझीलंडच्या प्रवासी राखीव संघाचा भाग होता.

  • 23 Jan 2026 02:35 PM (IST)

    23 Jan 2026 02:35 PM (IST)

    पुण्यात जुन्यांना संधी की नवा चेहरा…? महापौरपदासाठी ‘या’ मोठ्या नावांची जोरदार चर्चा

    पुणे महापौर पदाचे आरक्षण पडले ! पुण्याच्या महापौरपदी महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपकडे रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, स्मिता वस्ते, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे या वरिष्ठ नगरसेविकांपैकी कोणाला संधी द्यावी, की नवीन चेहऱ्याला समोर आणायचे असे पर्याय आहेत. पुणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांची महापौर आरक्षण सोडत आज गुरुवारी (दि.२२) काढण्यात आली. पुण्यात नेमके कोणते आरक्षण पडणार याविषयी उत्सुकता लागली होती.

  • 23 Jan 2026 02:30 PM (IST)

    23 Jan 2026 02:30 PM (IST)

    वसंत पंचमीपासून शुभ कार्याची करा सुरुवात, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

    २३ जानेवारी रोजी वसंत पंचमीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वसंत पंचमीचा दिवस हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते, या शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव पाच राशींवर पडणार असून त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत.

  • 23 Jan 2026 02:25 PM (IST)

    23 Jan 2026 02:25 PM (IST)

    16 वर्षांच्या खालील मुलांना सोशल मीडिया बंदी; आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

    AP Social media ban : हैदराबाद : सध्या इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर तुफान वाढला आहे. सोशल मी़डियाचा लहान मुले देखील ही सर्रास वापर करत असल्यामुळे नको त्या गोष्टी लहान मुलांसमोर येत आहे. अनेकदा यामधून गुन्हेगारी प्रवृत्तीचा कंटेंट देखील पाहिला जात आहे. यावर आंध्र प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे.

  • 23 Jan 2026 02:20 PM (IST)

    23 Jan 2026 02:20 PM (IST)

    सरफराज खानने ठोकले भारतीय संघाचे दरवाजे! रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावत नावावर केला मोठा विक्रम

    स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मुंबईचा सरफराज खान भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने उत्कृष्ट स्ट्राईक रेटसह अनेक वादळी डाव खेळले आणि फॉरमॅट बदलताच त्याने आपल्या खेळण्याच्या शैलीत बदल केला. रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत हैदराबादविरुद्ध मुंबईचा सामना सुरू आहे. या सामन्यात सरफराज खानने मॅरेथॉन इनिंग खेळली आणि द्विशतक झळकावले. संघासाठी जलद धावा काढण्याचा प्रयत्न करताना तो २२७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. या डावात त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले.

  • 23 Jan 2026 02:15 PM (IST)

    23 Jan 2026 02:15 PM (IST)

    मुंबईत तब्बल 106 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस; कारणही आलं समोर…

    बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरु असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’ अर्थात ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ कार्यान्वित करणे, यापूर्वीच बंधनकारक करण्यात आले आहे. तर, 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ‘रेफरन्स ग्रेड एअर क्वालिटी मॉनिटर’ बसविण्याचे आदेशही यापूर्वीच देण्यात आले आहेत. मात्र, काही बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी संबंधित आदेशांनुसार अत्यावश्यक असणारी ‘वायू गुणवत्ता मापन प्रणाली’ बसविण्यात आली नसल्याचे आढळून येत असल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत १०६ बांधकामांना ‘कार्य स्थगिती’ नोटीस देण्यात आल्या आहेत. अशा सर्व प्रकल्पांना काम बंद करण्याच्या नोटीस तातडीने देण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

  • 23 Jan 2026 02:10 PM (IST)

    23 Jan 2026 02:10 PM (IST)

    कोकणकरांसाठी खुशखबर! दावोसमध्ये तब्बल ३ लाख कोटींचे करार

    दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३७ कोटी २७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली असून कोकणात ३ लाख कोटींचे ११ करार झाले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहे. पहिल्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे करार झाले होते. मागील दोन दिवसात ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटींची करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.

  • 23 Jan 2026 02:05 PM (IST)

    23 Jan 2026 02:05 PM (IST)

    सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा; अभिनेत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वडील बांधणार चित्रपट संस्था

    “छिछोरे” आणि अनेक बॉलीवूड चित्रपटातील अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनाला सहा वर्षे उलटून गेली आहेत आणि त्याची आठवण अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. अजूनही त्याचे चाहते त्याच्या आठवणीत रमतात. २१ जानेवारी रोजी त्याच्या जयंतीदिनी एक घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये “सुशांत सिंग राजपूत मेमोरियल क्लब अँड फिल्म डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट” असे नाव असलेली एक संस्था स्थापन केली जाणार असल्याचे समोर आले आहे. तसेच आता अभिनेत्याच्या वडिलांनी याबद्दल अनके गोष्टी शेअर केल्या आहेत.

  • 23 Jan 2026 02:00 PM (IST)

    23 Jan 2026 02:00 PM (IST)

    लोणी काळभोर गटात राजकीय रणधुमाळी; उमेदवारी अर्जानंतर निवडणूक पूर्णपणे रंगात

    कदमवाकवस्ती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवार (दि.२१) रोजी संपताच लोणी काळभोर गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) या प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करून निवडणूक रिंगणात थेट ताकद लावली आहे. त्यामुळे या गटात अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

  • 23 Jan 2026 02:00 PM (IST)

    23 Jan 2026 02:00 PM (IST)

    पुण्यात महापौरपदासाठी ‘या’ मोठ्या नावांची जोरदार चर्चा

    पुणे महापौर पदाचे आरक्षण पडले ! पुण्याच्या महापौरपदी महिला विराजमान होणार आहे. सत्ताधारी भाजपकडे रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, स्मिता वस्ते, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे या वरिष्ठ नगरसेविकांपैकी कोणाला संधी द्यावी, की नवीन चेहऱ्याला समोर आणायचे असे पर्याय आहेत. पुणे महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांची महापौर आरक्षण सोडत आज गुरुवारी (दि.२२) काढण्यात आली. पुण्यात नेमके कोणते आरक्षण पडणार याविषयी उत्सुकता लागली होती.

  • 23 Jan 2026 01:50 PM (IST)

    23 Jan 2026 01:50 PM (IST)

    पूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, हा स्टार वेगवान गोलंदाज बाहेर

    २०२६ चा टी२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडसाठी वाईट बातमी येत आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अॅडम मिल्नेला एसए२० लीग दरम्यान ही दुखापत झाली. सध्या भारतात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणाऱ्या काइल जेमिसनला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. जेमिसन आधीच न्यूझीलंडच्या प्रवासी राखीव संघाचा भाग होता.

  • 23 Jan 2026 01:40 PM (IST)

    23 Jan 2026 01:40 PM (IST)

    सान्या मल्होत्रा टेलिव्हिजनवर पदार्पण करण्यासाठी सज्ज

    बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राने तिच्या दमदार अभिनयाने आणि सहजतेने नेहमीच लोकांची मने जिंकली आहेत आणि पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहते भावूक, जिज्ञासू आणि तितकेच उत्साही झाले आहेत. हा व्हायरल व्हिडिओ सान्याला एका लोकप्रिय डान्स रिॲलिटी शोच्या सेटवरील आहे. जिथे ती तिच्या भूतकाळातील एक अत्यंत वैयक्तिक आठवण पुन्हा सांगताना दिसत आहे.

  • 23 Jan 2026 01:30 PM (IST)

    23 Jan 2026 01:30 PM (IST)

    देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज

    देवगडमध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या ७जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. असे एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाच्यावतीने सर्वाधिक १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापाठोपाठ ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर मनसेच्यावतीने दोन, काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

  • 23 Jan 2026 01:20 PM (IST)

    23 Jan 2026 01:20 PM (IST)

    मसूरीत ‘प्लिंथ सर्टिफिकेट’चा गैरवापर

    डोंगरांची राणी मसूरी सध्या आपल्या सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी जागतिक पातळीवर ओळखली जाणारी ही शहर आता झपाट्याने कंक्रीटच्या जंगलात रुपांतरित होत आहे. या परिस्थितीचे मुख्य कारण म्हणजे ‘प्लिंथ सर्टिफिकेट च्या नावाखाली चालणारा मोठा खेळ, ज्याने संपूर्ण बांधकाम व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. मसूरीत सध्या बांधकामाची पायाभरणी जमीनवर नव्हे, तर कागदावरच केली जात आहे. नगरपालिकेकडून धडाकेबाजपणे प्लिंथ सर्टिफिकेट दिले जात आहेत आणि या सर्टिफिकेटच्या आधारावर डोंगर तोडून बहुमंजिली इमारती माजी नगरपालिकेच्या कार्यकाळात नियमांना दुर्लक्ष करून प्लिंथ सर्टिफिकेट दिले गेले. स्थानिक लोकांचा असा दावा आहे की अधिसूचित आणि संवेदनशील क्षेत्रांमध्ये, अगदी उभ्या उतारांवरही सर्टिफिकेट जारी केले गेले.

  • 23 Jan 2026 01:10 PM (IST)

    23 Jan 2026 01:10 PM (IST)

    नोबेल विजेत्या मचाडो यांनी ट्रम्पना भेटून मागितले ‘बॉम्ब’

    दक्षिण अमेरिकेतील राजकारण सध्या एका ज्वालामुखीवर उभे आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकन सैन्याने कैद करून न्यूयॉर्कला नेल्यानंतर आता तेथील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो (Maria Corina Machado) चर्चेत आल्या आहेत. अलीकडेच त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत मचाडो यांनी चक्क स्वतःचा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ ट्रम्प यांना भेट म्हणून दिला, ज्यामुळे जगभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 23 Jan 2026 01:02 PM (IST)

    23 Jan 2026 01:02 PM (IST)

    तिरंगा फडकवायचा, पण नियम माहिती आहेत का?

    २६ जानेवारी, महणजेच प्रजासत्ताक दिन हा भारतासाठी एक महत्वाचा दिवस आहे. या दिवशी संविधान लागू झाले, या दिवशी राष्ट्रपती दिल्लीतील राजपथावर ध्वजारोहण करतात. याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांमध्येही ‘ध्वजारोहण केले जाते. मुलांना माहित आहे की, स्वातंत्र्य दिन असो किवा प्रजासत्ताक दिन, या दिवशी ध्वज फडकवला जातो, परंतु त्यांना आपल्या राष्ट्रध्वजाचा, तिरंग्याचा आदर कसा करायचा हे माहित नाही, बऱ्याच वेळा, अपूर्ण माहितीमुळे, मुले नकळत तिरंग्याचा अपमान करतात, जे योग्य नाही, अशा परिस्थितीत तुम्ही मुलांना तिरंग्याशी संबंधित काही गोष्टी सांगू शकता. माझ्यावर विश्वास ठेवा, हे कळल्यानंतर मुले तिरंग्याचा आदर करू लागतील.

  • 23 Jan 2026 12:00 PM (IST)

    23 Jan 2026 12:00 PM (IST)

    सनी देओलच्या अभिनयाला टाळ्यांचा कडकडाट; वरुण दिलजीत आणि अहाननेही केली जादू

    १९९७ च्या क्लासिक “बॉर्डर” चा वारसा पुढे नेणारा “बॉर्डर २” हा चित्रपट आज, २३ जानेवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, सनी देओल आणि वरुण धवन अभिनित चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. चित्रपटाच्या पहिल्याच रिव्ह्यूमध्ये त्याला ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले गेले आहे.

  • 23 Jan 2026 11:50 AM (IST)

    23 Jan 2026 11:50 AM (IST)

    प्रजासत्ताक दिनी AI सुद्धा ऑन ड्युटी! दिल्ली पोलीस करणार स्मार्ट ग्लासेसचा वापर

    26 जानेवारी 2026 रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी मोठी तयारी सुरु झाली आहे. दिल्लीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देखील जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिल्ली पोलीस सज्ज झाले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच दिल्ली पोलीस प्रजासत्ताक दिनाची व्यवस्था संभाळण्यासाठी AI पावर्ड स्मार्ट ग्लासेसचा वापर करणार आहेत.

  • 23 Jan 2026 11:40 AM (IST)

    23 Jan 2026 11:40 AM (IST)

    या तरुण गोलंदाजाला मिळणार संधी! दोन्ही संघाच्या Playing 11 मध्ये होणार बदल

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिकेचा पहिला सामना झाला. या मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला होता आता टीम इंडियाची नजर दुसऱ्या विजयावर असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याआधी, भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग त्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो निवडीचा विचार करण्याऐवजी त्याची योजना परिपूर्णतेने अंमलात आणण्याचा आग्रह धरतो.

  • 23 Jan 2026 11:30 AM (IST)

    23 Jan 2026 11:30 AM (IST)

    शरीरात सडलेली घाण त्वरीत बाहेर फेकेल ‘ही’ औषधी वनस्पती!

    शरीराची अंतर्गत स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. यालाच डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. जेव्हा विषारी पदार्थ शरीरात जमा होतात तेव्हा ते अनेक रोगांना कारणीभूत ठरतात. म्हणून, वेळोवेळी हे विषारी पदार्थ काढून टाकणे आवश्यक आहे. आयुर्वेदात शरीराच्या अंतर्गत शुद्धीकरणासाठी अनेक औषधी वनस्पतींचे वर्णन केले आहे.

  • 23 Jan 2026 11:20 AM (IST)

    23 Jan 2026 11:20 AM (IST)

    ‘Board of Peace’ की ‘Piece’ एलोन मस्क यांनी दावोसमध्ये ट्रम्पची उडवली खिल्ली

    स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos) येथे सुरू असलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ (WEF) मध्ये सध्या दोन दिग्गज अमेरिकन नेत्यांच्या संघर्षाची चर्चा रंगली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क ( Elon Musk) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील शीतयुद्ध आता चव्हाट्यावर आले आहे. ट्रम्प यांनी गाझा युद्धाच्या समाप्तीसाठी स्थापन केलेल्या ‘बोर्ड ऑफ पीस’ (Board of Peace) या जागतिक उपक्रमावर मस्क यांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे.

  • 23 Jan 2026 11:10 AM (IST)

    23 Jan 2026 11:10 AM (IST)

    माझा काका.. माझं बालपण…; दैनिक ‘सामना’तून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या

    हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज १०० वी जयंती (जन्मशताब्दी) देशभर उत्साहात साजरी केली जात आहे. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’साठी एक विशेष लेख लिहिला आहे. “माझे काका…” या शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखात राज ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत घालवलेले क्षण आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू अत्यंत भावूक शब्दांत मांडले आहेत.

  • 23 Jan 2026 10:59 AM (IST)

    23 Jan 2026 10:59 AM (IST)

    Border 2 चे सकाळचे सगळे शो रद्द?

    अनुराग सिंग यांचा दिग्दर्शित पहिला चित्रपट, “बॉर्डर २”, ज्यामध्ये सनी देओल, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन यांचा समावेश आहे, हा चित्रपट शुक्रवार, २३ जानेवारी रोजी देशाच्या अनेक भागात प्रदर्शित झाला आहे. परंतु, काही भागातील प्रेक्षक अजूनही वाट पाहत आहेत. २२ जानेवारी रोजी आलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की वितरक आणि प्रदर्शकांना अद्याप चित्रपट मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांना प्रदर्शनाची तयारी करता आली. यामुळे अनेक ठिकाणी मॉर्निंग शो रद्द करण्यात आले आहेत.

  • 23 Jan 2026 10:52 AM (IST)

    23 Jan 2026 10:52 AM (IST)

    T20 World Cup 2026 आधी दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये मोठे बदल!

    टी-२० विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. भारत आणि श्रीलंका ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ साठी सर्व संघ आता त्यांच्या तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. या मेगा स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होतील. दक्षिण आफ्रिकेनेही विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला होता, परंतु आता संघाने आपल्या संघात दोन मोठे बदल जाहीर केले आहेत.

    दक्षिण आफ्रिकेचा अद्ययावत संघ

    एडन मार्कराम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.

  • 23 Jan 2026 10:46 AM (IST)

    23 Jan 2026 10:46 AM (IST)

    अमेरिकेचा ‘जागतिक आरोग्य संघटने’ला कायमचा रामराम

    जागतिक राजकारणात आणि आरोग्य क्षेत्रात आज एक अत्यंत मोठा भूकंप झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेने (America) अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) ७८ वर्षांचे जुने नाते तोडले आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागाने काल गुरुवारी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून स्पष्ट केले की, अमेरिका आता या जागतिक आरोग्य संस्थेचा सदस्य नाही. या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिनिव्हा येथील WHO मुख्यालयाबाहेर डौलाने फडकणारा अमेरिकेचा ‘स्टार्स अँड स्ट्राइप्स’ ध्वज अखेर उतरवण्यात आला आहे.

  • 23 Jan 2026 10:39 AM (IST)

    23 Jan 2026 10:39 AM (IST)

    गुजरात जायंट्सच्या विजयाने पॉइंट्स टेबल हलले

    WPL 2026 ची गुणतालिका

    संघ सामना विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
    आरसीबी 5 5 0 0 10 +1.882
    गुजरात जायंट्स 6 3 3 0 6 -0.341
    मुंबई इंडियन्स 6 2 4 0 4 +0.483
    दिल्ली कॅपिटल्स 5 2 3 0 4 -0.586
    यूपी वाॅरियर्स 6 2 4 0 4 -0.769
  • 23 Jan 2026 10:31 AM (IST)

    23 Jan 2026 10:31 AM (IST)

    अनलिमिटेड VOID इमोट क्लेम करण्याची हीच सुवर्णसंधी!

    फ्री फायर मॅक्समध्ये OB52 अपडेट लाईव्ह झाल्यानंतर अनेक ईव्हेंट सुरू झाले आहेत. या अपडेटनंतर गेममध्ये अनेक गोष्टी बदलल्या आहेत. नवीन लोकेशन, कॅरेक्टर्स आणि मॅप गेममध्ये जोडण्यात आले आहेत. एवढंच नाही तर नव्या अपडेटनंतर गेममध्ये एकामागून एक असे अनेक ईव्हेंट लाइव्ह झाले आहे. या सर्व ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना एक्सक्लूसिव गेमिंग आइटम रिवॉर्ड्स स्वरूपात जिंकण्याची संधी मिळणार आहे. 

  • 23 Jan 2026 10:23 AM (IST)

    23 Jan 2026 10:23 AM (IST)

    2 तास 17 मिनिटांच्या ‘या’ चित्रपटाने Oscars 2026 मध्ये रचला इतिहास

    ऑस्कर २०२६ मध्ये बऱ्याच काळानंतर एक विक्रम मोडला गेला आहे. २०२६ च्या ऑस्करसाठी अंतिम नामांकने काल जाहीर करण्यात आली. भारताचे लक्ष “होमबाउंड” वर होते, परंतु हा चित्रपट २०२६ च्या ऑस्कर नामांकनांमधून वगळण्यात आला आहे. दरम्यान, आणखी एका चित्रपटाने १६ नामांकने मिळवून इतिहास रचला आहे, ज्याने “टायटॅनिक” आणि “ला ला लँड” सारख्या हॉलिवूड चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणी नसून रायन कूगलर दिग्दर्शित “सिनर्स” आहे. चित्रपट रसिकांची मने जिंकल्यानंतर, त्याने ऑस्कर नामांकनांमध्येही वर्चस्व गाजवले आहे.

Web Title: Maharashtra breaking news live updates marathi maharashtra political national international sports crime war news maharashtra zilla parishad election 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Maharashtra Breaking News update

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.