Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 05:32 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Follow Us:

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार निकाल; ‘असा’ पाहा रिझल्ट

पुणे | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. २०२६ मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, २ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची आणि पालकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

निकालाच्या दिवशी सकाळी ११ वाजता शिक्षण मंडळाची अधिकृत पत्रकार परिषद पार पडणार असून, यामध्ये राज्याचा एकूण निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती दिली जाईल. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव अर्जातील नोंदीप्रमाणे प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

विद्यार्थी आपला निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. यासोबतच इतर काही अधिकृत पोर्टलवरही निकालाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदाची परीक्षा दिलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार असून, निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सोयही उपलब्ध असेल.

The liveblog has ended.
  • 01 May 2026 05:15 PM (IST)

    01 May 2026 05:15 PM (IST)

    रत्नागिरी बोगस दारूच्या विरोधात तीव्र आंदोलन

    रत्नागिरी जिल्ह्यात राजरोसपणे विक्री होत असलेल्या गोवा बनावटीच्या तसेच बोगस दारूच्या विरोधात आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील मद्य परवाना धारकांनी या बेकायदेशीर विक्रीविरोधात आवाज उठवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनानिमित्त आमरण उपोषण सुरू केले.या वेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट व गोवा बनावटीची दारू खुलेआम विकली जात असून, त्यामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत आहे तसेच परवानाधारक व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच, या बेकायदेशीर दारूमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई करून अवैध दारू विक्रीवर पूर्णतः बंदी घालावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.उपोषणस्थळी मोठ्या संख्येने परवाना धारक उपस्थित होते आणि प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

  • 01 May 2026 05:10 PM (IST)

    01 May 2026 05:10 PM (IST)

    महाराष्ट्रात इंग्रजी राणी तर हिंदी नोकरानी म्हणून फिरत आहे - अबू आजमी...

    महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे आम्ही शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो.परंतु मराठीची सक्ती करणे चुकीचे आहे.मराठीच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण केले जात आहे.भारताच्या स्वातंत्र्यानंतर हिंदी राणी आणि इंग्रजी नोकरानी होणार असे बोलले जात होते.मात्र सद्यस्थितीत महाराष्ट्रात इंग्रजी राणी तर हिंदी नोकरानी बनून फिरत असल्याची प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी भिवंडीत दिली. महाराष्ट्राच्या सीमेवरील बंगलोर,मॅगलोर मध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील नागरिक राहत आहेत. त्यांच काय होणार ? न्यायालयात वकील खटल्याचा युक्तिवाद लढताना इंग्रजी मध्ये बोलतात आणि वकील टेबलावर जोरात हात मारून बोलतात तेव्हा किती आशिलाना समजते काय युक्तिवाद सुरू आहे ? अनेक नगरसेवक मराठी नाहीत ते कोणी बोलत नाही. कामगार कष्टाने घाम गाळून विकासात योगदान देत असताना मराठीची सक्ती करणे चुकीचे आहे.रिक्षा चालक, टॅक्सी ड्रायव्हर प्रवाश्यांना काय प्रश्न विचारणार कुठे जाणार ,पैसे किती एवढेच ना.महाराष्ट्रातील जनता समजदार असून जनतेला माहीत आहे देशातील शेतकऱ्यांची आत्महत्या,बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ,नशेखोरी या गंभीर मुद्द्यांना वगळून मराठी सक्तीचा मुद्द्याच्या सक्तीवर राजकारण करणे चुकीचे असून प्रथम बंद होत असलेल्या मराठी शाळा सुरू करा आणि मराठी शाळेतील शिक्षक भरती प्रक्रिया राबवा असे आवाहनही अबू आझमी यांनी मराठीच्या मुद्द्यावर शासनाला केले आहे.

  • 01 May 2026 05:05 PM (IST)

    01 May 2026 05:05 PM (IST)

    IRC च्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्ष लागवड करणे बंधनकारक

    मुंबई गोवा महामार्गवर विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग बनविताना IRC च्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. सदरहू मार्ग बनविताना लाखो आपल्या लाखो वड पिंपळ उंबर पायर कदंब अश्या धार्मिक व आयुर्वेदिक वनौषधीची कत्तल झालेली आहे जैव विविधता नष्ट केली गेली आहे या रस्त्यावरून IRC च्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्ष लागवड केली जावी या करीता 2022 पासून आपण विविध मार्गाने प्रयत्न करीत आहोत तरी ही या कडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर, चिपळूण प्रांत कार्यालयाशेजारी HIGHWAY वृक्ष लागवड हक्क समितीने भूसमाधी आमरण उपोषण सुरु केले आहे

  • 01 May 2026 04:55 PM (IST)

    01 May 2026 04:55 PM (IST)

    माथेरान डोंगरातील आदिवासी कार्यकर्त्यांचे आत्मदहन आंदोलन यशस्वी

    कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरात असलेल्या १२आदिवासी वाड्या यांना जोडणारा रस्ता माणगाव ग्रामपंचायत मधील रस्ता वन जमिनीची परवानगी मिळाली नसल्याने रखडला होता.वन जमिनीतून रस्ता वन विभाग होऊ देत नसल्याने दोन आदिवासी तरुणांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.त्यावेळी ३० एप्रिल रोजी अखेरची मुदत या दोन्ही कार्यकर्त्यांनी वन विभागाला दिली होती.दरम्यान,वन विभागाने २२ एप्रिल रोजी दिलेले आश्वासन पूर्ण केले असून वन विभागाने पाच टप्प्यात रस्ता बनविण्यास परवानगी दिली आहे. कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगर रांगेत असलेल्या आदिवासी वाड्यांच्या रस्त्याला वन विभागाने परवानगी द्यावी या मागणीसाठी आदिवासी कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.२२ एप्रिल रोजी जैतू पारधी आणि गणेश पारधी हे वन विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करणार होते.माणगाव ग्रामपंचायत मधील वन जमिनीतून रस्ता बनविण्याचा प्रस्ताव वन विभागाने मंजूर केला नव्हता.

  • 01 May 2026 04:50 PM (IST)

    01 May 2026 04:50 PM (IST)

    महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापाना दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा

    महाराष्ट्र राज्याचा ६७ स्थापना दिन आणि  कामगार दिनानिमित्त मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी, यांचे शुभहस्ते राष्ट्र ध्वजवंदन करण्यात आले.
      तदनंतर महानगरपालिकेच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी व मा. आयुक्त श्री अनमोल सागर (भा.प्र.से.) यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जुनी प्रशासकीय इमारती समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास मा. उप-महापौर तारीक अब्दुल बारी मोमीन व मा नगरसेवक फराज (बाबा) बहाउद्दीन यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.  तसेच जनगणना २०२६ या कार्यक्रमाअंतर्गत स्वगणना चे शुभारंभ मा. महापौर, उप- महापौर, मा आयुक्त, यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी मा नगरसेवक श्री. प्रशांत लाड, फराज (बाबा) बहाउद्दीन यांच्या उपस्थित या कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. भारतात प्रथमच होणाऱ्या डिजिटल जणगणनेसाठी दि. 01-05-2026 ते 15-05-2026 या कालावधीत https://se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन मोबाईलद्वारे प्रत्येक नागरिकांना स्वत:ची गणना करता येणार असल्याबाबतची माहिती सहा. आयुक्त (जनगणना) श्री. नितीन पाटील यांनी सर्वाना देण्यात आली.
  • 01 May 2026 04:45 PM (IST)

    01 May 2026 04:45 PM (IST)

    नेरळमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन

    नेरळ येथे हुतात्मा चौक येथे महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी १०६ तरुणांनी हौतात्म्य प्राप्त झाले.या हुतात्म्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी हुतात्मा चौक उभारण्यात आला आहे.या हुतात्मा चौकात आज महाराष्ट्र दिनानिमित्त तिरंगा झेंडा फडकावून तसेच हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.कर्जत तालुक्यातील पत्रकारांची समाजसेवी संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या हुतात्मा स्मारक समितीचे वतीने हुतात्मा स्मारक उभे आहे.
    हुतात्मा स्मारक समितीचे वतीने महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचे औचित्य साधून हुतात्मा चौक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्यांना जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले.त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळी मध्ये हुतात्मा झालेल्या १०६ हुतात्मा यांच्या स्मारकाला वैद्यक क्षेत्रातील डॉ हेमंत शेवाळे आणि नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.तर कर्जत तालुक्यातील ४६ स्वातंत्र्यसैनिक यांच्या नामफलक यास शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर आणि मनसेचे शहर अध्यक्ष सुभाष नाईक यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर महाराष्ट्र दिनाचे निमित्ताने कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांचे हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला.

  • 01 May 2026 04:40 PM (IST)

    01 May 2026 04:40 PM (IST)

    कर्जत महावितरण कार्यालयासमोर विजेच्या प्रश्नावर ठिय्या आंदोलन सुरू

    कर्जत-जामखेड मतदारसंघातील वाढत्या वीज समस्यांविरोधात आज कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलनात आमदार रोहितदादा पवार यांनीही सहभाग घेतला आहे.कर्जत -जामखेड भागात गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच सततच्या लोडशेडिंगमुळे नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.महावितरण प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस तोडगा न निघाल्याने कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला.या आंदोलनात आमदार रोहितदादा पवार यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. महावितरण प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

  • 01 May 2026 04:33 PM (IST)

    01 May 2026 04:33 PM (IST)

    भिवंडीत वाहतूक विभागाची कारवाई; बेकायदेशीर ४८ रिक्षा तर ४० दुचाकी जप्त

    भिवंडीत वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिल २०२६ पर्यंत केलेल्या कारवाईत बेकायदेशीर ४८ रिक्षा जप्त केल्या असून ४० दुचाक्या जप्त केल्या आहेत.तर ड्रंक अँड ड्राइव्ह च्या ९५५ केसेसची नोंद केली असून ८९७२३ ई चलान तर ४८ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.दरम्यान ३८९५ केसेसमध्ये २२ लाख ५४ हजार १०० रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.तसेच लोक अदालत मध्ये १९३९ केसेस मध्ये २६ लाख ८७ हजार ३५० रुपये वसुलण्यात येवून केसेस निकाली काढण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर यादव यांनी दिली आहे.

  • 01 May 2026 04:27 PM (IST)

    01 May 2026 04:27 PM (IST)

    "हा माझा शेवटचा व्हिडीओ असेल"शिरोलीत पुन्हा धक्कादायक प्रकार

    कोल्हापुरातील शिरोली लैंगिक अत्याचाराचं प्रकरणं ताजं असतानाच आता शिरोली इथल्या आणखीन एका नराधमाच्या कृत्याची घटना समोर आली आहे..अत्याचाराच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा महिलेला त्रास देऊन विनयभंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे..गैबीसाहेब दस्तगीर लिंगरे राहणार पुलाची शिरोली असं त्या व्यक्तीचं नाव आहे.. शहरातील महावीर कॉलेज परिसरात बुधवारी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतयं..पिडीत महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून व्हिडीओ द्वारे आपली व्यथा मांडली आहे..लिंगरे याने संबंधित महिलेला रस्त्यात गाठून जबरदस्तीने रिक्षात बसवलं..जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला.. तू पोलिसांत तक्रार केलीस, तर तुला मारून टाकीन, पोलीस आणि हिंदुत्ववादी लोक माझे . काहीच करू शकत नाहीत, असं धमकीचे शब्द उच्चारल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

  • 01 May 2026 04:23 PM (IST)

    01 May 2026 04:23 PM (IST)

    २० हजार कोटींचा विकास स्फोट, वसई-विरार बनणार सुपर कनेक्टिव्हिटी हब

    वसई-विरारच्या विकासाला आता मोठी गती मिळणार आहे. एम. एम. आर. डी. ए. आयुक्त आणि महापौरांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे वसई-विरार शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल होणार असून, रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकल्प राबवताना स्थानिक मच्छिमार, शेतकरी आणि पर्यावरण यांचे हित अबाधित राहील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

  • 01 May 2026 04:17 PM (IST)

    01 May 2026 04:17 PM (IST)

    पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं, तब्बल 12 वर्षानंतर आरोपी रील स्टारचा कारनामा उघड

    तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या अपहरण व खून प्रकरणाचा कल्याण गुन्हे शाखा, घटक-०३च्या पथकाने कौशल्यपूर्ण तपासातून उलगडा केला. याप्रकरणामुळे रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) याचा आणखी एक कारनामा पुढे आला असून त्याच्यासह चंद्रकांत बाळाराम गायकर आणि सुरेश गोपाळ देगावत उर्फ छोटू (३२) या तिघांना अटक करण्यात आली आहे. सात एकर जमीन व्यवहारातील पैशांच्या वादातून करण अरविंद बागुल (२३) या तरुणाची हत्या करून त्याचे प्रेताची विल्हेवाट मुरबाड येथील जंगलात केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली .

  • 01 May 2026 04:12 PM (IST)

    01 May 2026 04:12 PM (IST)

    खेर्डी नदीत मृत माशांचा खच, परिसरात दुर्गंधीने नागरिक त्रस्त

    रत्नागिरीत खेर्डी परिसरात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मेलेल्या माशांचा खच जमा झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्यावर तरंगणारे शेकडो मासे मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे पर्यावरणीय धोका निर्माण झाला असून नागरिकांनी तात्काळ प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

  • 01 May 2026 04:10 PM (IST)

    01 May 2026 04:10 PM (IST)

    गोकुळच्या संचालक मंडळाला मुदतवाढ नाकारली, प्रशासक नियुक्त होणार

    कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघावर आता प्रशासक येण्याची वाट मोकळी झाली आहे..विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचने स्पष्ट नकार दिला आहे..गोकुळ दूध संघाच्या संलग्न असणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी अवसायनात आदेश निघालेल्या 1320 संस्थाच्या सुनावणीनंतर गोकुळ ची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी असा निर्णय कोल्हापूर सर्किट बेंचने दोन दिलायं..त्यामुळे गोकुळ दुध संघाची निवडणूक लांबणीवर पडणार आहे..गोकुळ दुध संघाच्या संचालक मंडळाची येत्या 4 मे रोजी मुदत संपणार असल्याने संघावर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित झालं आहे..त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाला मोठा धक्का बसलायं..सभासद संस्था आणि अवसायानामधील संस्थांच्या सुनावणीमुळे विद्यमान संचालक मंडळाला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळ प्रशासनाकडून न्यायालयाला विनंती करण्यात आली होती..मात्र या संस्थांच्या निकालानंतर निवडणूक घेण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत..दरम्यान गोकूळच्या प्रशासक पदासाठी खासदार धनंजय महाडिक, भाजप नेत्या शौमिका महाडिक आणि याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांची नावं चर्चेत असून प्रशासक पदावर कुणाची वर्णी लागणार याकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलयं.

  • 01 May 2026 04:00 PM (IST)

    01 May 2026 04:00 PM (IST)

    आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

    JEE Advanced Registration 2026 Apply Last Date:  ज्या विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते. त्यांच्या रचनात्मकतेला वाव अभियांत्रिकी क्षेत्रात मिळू शकतो. अलीकडेच आपल्या देशात अनेक मुले कल हा या क्षेत्राकडे दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे करियर इंजिनिअरिंग क्षेत्रात करायचे आहे. त्यांनी प्रथम जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced 2026) परीक्षेची नोंदणी करणे आवश्यक आहे. या परिक्षेत सहभागी होऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये  (IIT) प्रवेश मिळू शकतो. जर तुमचेही स्वप्न आयआयटी संस्थेत प्रवेश मिळवून इंजिनीयरिंग क्षेत्रात करियर करायचे असेल तर त्यांनी त्वरित जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करा.

  • 01 May 2026 03:50 PM (IST)

    01 May 2026 03:50 PM (IST)

    ‘Bigg Boss Marathi Season 6’ चा ग्रँड फिनाले ठरला 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

    ‘Bigg Boss Marathi Season 6’चा ग्रँड फिनाले 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट ठरला आहे. Endemol Shine India आणि Banijay Entertainment यांच्या निर्मितीत साकारलेला हा शो यंदा प्रचंड चर्चेत राहिला. अनेक आठवड्यांच्या स्पर्धेनंतर तन्वी कोलटे हिने विजेतेपद पटकावत ट्रॉफी आपल्या नावावर केली, तर प्रेक्षकांना थरार, भावना आणि मनोरंजनाचा संगम अनुभवायला मिळाला. ग्रँड फिनाले हा खऱ्या अर्थाने भव्य सोहळा ठरला. हाय-एनर्जी परफॉर्मन्स, भावनिक क्षण आणि विजेत्याच्या घोषणेचा थरार यामुळे प्रेक्षक खिळून राहिले. या फिनालेने 3.1 TVR रेटिंग मिळवत मराठी रिअॅलिटी शोच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. निर्मात्यांनी ही माहिती शेअर करताना सांगितले की, “या जॉनरमधील सर्वाधिक रेटिंग असलेल्या फिनालेसह बिग बॉस मराठी हा मराठी रिअॅलिटी टेलिव्हिजनचा निर्विवाद नेता ठरला आहे.”

  • 01 May 2026 03:40 PM (IST)

    01 May 2026 03:40 PM (IST)

    आता निम्म्या किंमतीत Dubai मध्ये खरेदी करा Property!

    Dubai Change Property Rule : दुबई हे जगभरातील लोकांसाठी एक अत्यंत पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. विशेषतः भारतीयांसाठी, दुबईचे आकर्षण काहीसे वेगळेच आहे. आजकाल, प्रत्येक श्रीमंत व्यक्ती दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करण्यास उत्सुक असतो. जर तुम्हीही दुबईमध्ये जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, पण आर्थिक अडचणींमुळे तुम्ही ते स्वप्न पूर्ण करण्यापासून मागे हटत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. इराणसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दुबईच्या रिअल इस्टेट बाजारपेठेने असे एक पाऊल उचलले आहे, ज्यामुळे भारतीयांना नक्कीच आनंद होणार आहे. आता दुबईमध्ये पूर्वीच्या किमतीच्या निम्म्याच दरात मालमत्ता खरेदी करणे शक्य झाले आहे. शिवाय, व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया देखील आता खूपच सुलभ झाली आहे.

  • 01 May 2026 03:30 PM (IST)

    01 May 2026 03:30 PM (IST)

    Raja Shivaji’ स्वराज्याचा झळाळता इतिहास आणि रितेश देशमुखचा मास्टरस्ट्रोक!!

    मूव्ही रिव्ह्यू, आकाश जायसवाल: ‘राजा शिवाजी’ स्वराज्याचा झळाळता इतिहास आणि रितेश देशमुखचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ रुपेरी पडद्यावरील एक ऐतिहासिक मांडणी नसून, प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेचा हुंकार आहे. दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख यांनी शिवचरित्रातील सुवर्णपाने ज्या संवेदनशीलतेने आणि भव्यतेने हाताळली आहेत, त्यामुळे हा चित्रपट केवळ पाहण्याचा विषय न उरता तो एक भावनिक अनुभव ठरतो; याच कारणास्तव ‘नवराष्ट्र’ने या चित्रपटाला 4 स्टार्सचे रेटिंग दिले आहे.

  • 01 May 2026 03:20 PM (IST)

    01 May 2026 03:20 PM (IST)

    Motorcycle: आई शपथ! घरी बनवली पाण्यावर बनवणारी बाईक

    जगात असंख्य सुपरबाईक्स आहेत, ज्या त्यांच्या विजेच्या वेगासाठी ओळखल्या जातात. त्या डोळ्याची पापणी लवते न लवते तोच विजेचा वेग गाठू शकतात. पण, आज आम्ही तुम्हाला एका अशा अनोख्या मोटरसायकलविषयी सांगणार आहोत, जी पेट्रोलवर नाही, तर पाण्यावर चालते. ही निसर्गाची एक शक्ती आहे, जी वाफेच्या इंजिनवर चालते. विशेष गोष्ट म्हणजे, ही मोटरसायकल कोणत्याही मोठ्या कंपनीने नाही, तर एका पती-पत्नीने घरी बनवली आहे. या मोटरसायकलने युकेच्या ‘फेस्टिव्हल ऑफ पॉवर’मध्ये आपल्या या वैशिष्ट्याने सर्वांना चकित केले आहे. या बाईकने ताशी ३१० किलोमीटर वेगाने सुमारे ४०० मीटर (पाव मैल) अंतर केवळ ५.५०३ सेकंदात पार केले. चला, या अनोख्या मोटरसायकलची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

  • 01 May 2026 03:10 PM (IST)

    01 May 2026 03:10 PM (IST)

    केवळ 299 रुपयांत नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस?

    केवळ 299 रुपयांत तुम्हालाही मिळणार नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसह अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस… तुमच्याही मोबाईलवर असा मेसेज आला आहे का? सावध राहा. ही टेलिकॉम कंपन्यांची कोणतीही ऑफर नाही तर हा एक मोठा स्कॅम आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप-टेलिग्राम सारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सवर स्कॅम सुरु आहे. सब्सक्रिप्शन बंडलच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय या पद्धतीने स्कॅमर्स लोकांकडून त्यांची वैयक्तिक माहिती देखील गोळा करत आहेत.

  • 01 May 2026 02:53 PM (IST)

    01 May 2026 02:53 PM (IST)

    महावितरणच्या वीज वितरण बॉक्समध्ये हात घालून तरुणाची आत्महत्या

    डोंबिवलीत धक्कादायक घटना समोर आलीये. डोंबिवली पश्चिम येथील नवसंपदा इमारतीसमोर एका तरुणाने वीज वितरण बॉक्समध्ये हात घालून आत्महत्या केली.

  • 01 May 2026 02:33 PM (IST)

    01 May 2026 02:33 PM (IST)

    यवतमाळमध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद; प्रशासन-पोलिस सतर्क

    यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसविण्यावरून वाद निर्माण झाला आहे. मार्डी परिसरात बसवण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवप्रेमींनी पुतळा हटवू नये अशी मागणी केली असताना, प्रशासन मात्र तो हटविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. दरम्यान, प्रशासनाने अर्धाकृती पुतळा हटवून नगर पंचायतमध्ये सन्मानपूर्वक ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार निलवाड यांनी दिली.

  • 01 May 2026 02:25 PM (IST)

    01 May 2026 02:25 PM (IST)

    यवतमाळमध्ये ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय; विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी माफी

    यवतमाळ जिल्ह्यातील किन्ही ग्रामपंचायतीने एक सकारात्मक आणि वेगळा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील घटती विद्यार्थीसंख्या रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने 6 वी ते 8 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांची घरपट्टी कायमस्वरूपी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आला असून, शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

  • 01 May 2026 02:13 PM (IST)

    01 May 2026 02:13 PM (IST)

    ठाकरेंच्या शिवसेनेत फूट, नगराध्यक्ष पक्ष सोडणार

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे आपल्या सात नगरसेवकांसह लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत. मुंबईत लवकरच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

  • 01 May 2026 02:05 PM (IST)

    01 May 2026 02:05 PM (IST)

    आता 90 मिनिटात पुण्यात! मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकात, आजपासून वाहतुकीसाठी खुला

    १ मे रोजी, महाराष्ट्र दिनानिमित्त, राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प केवळ मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित करणार नाही, तर महाराष्ट्राच्या आधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचे एक उत्तम उदाहरण म्हणूनही ओळखला जातो. कारण आता मिसिंग लिंक प्रकल्पाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

  • 01 May 2026 01:59 PM (IST)

    01 May 2026 01:59 PM (IST)

    राज्य शासनाला दोष देणे हे काही राज ठाकरेंचं बरोबर नाही'

    राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या मुद्यावर काही मताशी सहमत आहे, तर काही मताशी सहमत नाही. महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी आलीच पाहिजे. काही आयएएस अधिकारी हे परप्रांतीय आहेत. परंतु ते अस्खलित मराठीत बोलतात. त्यांच्या कामाचा भाग म्हणून आयएएस अधिकारी मराठी बोलत असतील, तर रिक्षा, टॅक्सी, दुकानदार यांनी मराठी बोललं पाहिजे. हे म्हणणं राज ठाकरेंचं मान्य आहे. परंतु राज्य शासनाला दोष देणे हे काही राज ठाकरेंचं बरोबर नाही, असे टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

  • 01 May 2026 01:47 PM (IST)

    01 May 2026 01:47 PM (IST)

    मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत जनगणनेचा भंडारा इथं प्रारंभ

    राज्याचे महसूल तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भंडाऱ्यात या जनगणना मोहिमेचा अधिकृत प्रारंभ झाला. मंत्री योगेश कदम यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून जनगणनेचा भंडाऱ्यातून श्रीगणेशा केला. जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यासाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 ते 15 मे रोजीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा केंद्र सरकारनं दिली असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन यावेळी योगेश कदम यांनी केलं आहे.

  • 01 May 2026 01:45 PM (IST)

    01 May 2026 01:45 PM (IST)

    वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका- एकनाथ शिंदे

    मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर लागून सुट्टी आल्यामुळे सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

  • 01 May 2026 01:31 PM (IST)

    01 May 2026 01:31 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या

    पुणे - मुंबई एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसला.त्या सकाळी दोन ते तीन तास त्या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे पक्ष कार्यालयातील झेंडावंदनला त्या वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. दरम्यान, कोंडीचा एक व्हिडीओ देखील सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे.

  • 01 May 2026 01:31 PM (IST)

    01 May 2026 01:31 PM (IST)

    विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना

    देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे; या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईनपद्धतीने 'स्व-गणना' पूर्ण केली आहे.

  • 01 May 2026 01:30 PM (IST)

    01 May 2026 01:30 PM (IST)

    ठाकरेंच्या शिवसेनेत फूट, नगराध्यक्ष पक्ष सोडणार

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे आपल्या सात नगरसेवकांसह लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत. मुंबईत लवकरच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

  • 01 May 2026 12:00 PM (IST)

    01 May 2026 12:00 PM (IST)

    देशाचे वैभव परतले! कोहिनूर वादाच्या पार्श्वभूमीवर महासत्तेकडून भारताला मोठी भेट; 657 प्राचीन कलाकृतींची घरवापसी

    US returns 657 antiquities India : आजचा काळ हा केवळ आर्थिक किंवा लष्करी प्रगतीचा नसून, आपल्या प्राचीन संस्कृती आणि वारशाचा सन्मान करण्याचा आहे. अशाच एका ऐतिहासिक आणि अत्यंत आनंददायी क्षणी, अमेरिकेने (America) भारताच्या ६५७ प्राचीन कलाकृती आणि मूर्ती भारताकडे सुपूर्द केल्या आहेत. तब्बल १३३ कोटी रुपये (१४ दशलक्ष डॉलर्स) मूल्य असलेल्या या कलाकृती परत करण्याच्या प्रक्रियेमुळे भारतीय जनतेच्या मनात एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. हा केवळ एका देशाकडून दुसऱ्या देशाला दिलेला सन्मान नाही, तर भारताच्या लुप्त झालेल्या ऐतिहासिक वैभवाची सातासमुद्रापारून झालेली घरवापसी आहे.

  • 01 May 2026 11:55 AM (IST)

    01 May 2026 11:55 AM (IST)

    लहान हातांतला न्यायदंड”, बालसभेतून मुलांचा आवाज बुलंद; सारोळा गावात विद्यार्थ्यांनीच चालवला लोकशाहीचा कारभार

    “बालसभा मुलांनी मुलांसाठी आयजोति केलेली आहे. ती आपल्या लोकशाही प्रक्रियेचे प्रतिबिंब असून ती घेण्याचा व त्यात सहभागी होण्याचा आपल्याला अधिकार आहे,” धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी शिवकन्या खरे हिने ठामपणे सांगितले. एखाद्या अनुभवी संसदपटूच्या आत्मविश्वासाने ती आपल्या समवयस्कांना संबोधित होती. तिच्या शेजारी व्यासपीठावर बालसभा समितीचे आठ सदस्य बसले होते. सारेच तिच्याच वयाचे, मात्र शांतपणे अधिकारवाणीने कामकाज चालवत होते. प्रेक्षकांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि शिक्षक एकाग्रतेने ऐकत होते. हे दृश्य विरळेच होतं.

  • 01 May 2026 11:50 AM (IST)

    01 May 2026 11:50 AM (IST)

    Harshvardhan Sapkal : विधानपरिषद उमेदवारीवरुन नेमकं काय घडलं? हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच सांगितलं

    मुंबई : आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सविस्तर व सकारात्मक चर्चा पार पडली असून, या सर्व निवडणुकांमध्ये आघाडी एकसंघपणे लढणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून काँग्रेस पक्षाचा त्यांना ठाम पाठिंबा आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

  • 01 May 2026 11:45 AM (IST)

    01 May 2026 11:45 AM (IST)

    Traffic Jam: सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

    Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. दोन तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोडीं निर्माण झाली. याचा फटका लोकांना बसत आहे. मुंबई ते पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लेनमध्ये समस्या निर्माण झाली आहे. सलग तीन वेळा वाहतूक थांबल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने लोणावळ्याच्या दिशेने निघाले आहेत. सकाळी वाहतूक हळूहळू सुरू झाली होती. मात्र, आता दोन तासांहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंडमुळे एक्सप्रेसवर वाहनांच्या लांबच लांब रागा बघायला मिळत आहेत. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांचा पुणे लेनवर पंधरा मिनिटांचा ब्लॉक आहे. मात्र, वाहतूक काही सुरळीत होत नाही.

  • 01 May 2026 11:40 AM (IST)

    01 May 2026 11:40 AM (IST)

    Pune Census 2026: १६ मे पासून प्रगणक तुमच्या दारी; प्रशासनाने आखली १०,१७२ परिमंडळे

    Pune Rural Population Growth :  पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येत गेल्या १५ वर्षांत अभूतपूर्व वाढ झाली आहे. आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीनुसार, ग्रामीण भागाची लोकसंख्या आता ८० लाखांच्या वर पोहोचल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. २०११ च्या जनगणनेत हा आकडा ४५ लाख होता, याचा अर्थ लोकसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. ही आकडेवारी प्राथमिक असून, प्रत्यक्ष जनगणनेनंतर अधिकृत अंतिम आकडेवारी समोर येईल. प्रशासनाने नागरिकांना प्रगणकांना योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

  • 01 May 2026 11:35 AM (IST)

    01 May 2026 11:35 AM (IST)

    १२ वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ! नेमका कोणाला आणि किती मिळणार लाभ?

    दिव्यांग विद्यांर्थ्यांना शिक्षणामध्ये सवलत प्राप्त करून देण्याकरीता शासन नेहमी प्रयत्न करत असते. यंदा दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षणासाठी पाठबळ मिळावे, याकरीता शासनाने शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. 12 वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पहिल्यांदाच वाढ झाली असून ही बैठक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार प़डली. उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे. या सुधारित योजनेअंतर्गत विद्यापीठ, संस्था, शिक्षण मंडळाला भरावे लागणारे शुल्क तसेच प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी शुल्क, खेळ, लायब्ररी, मॅगझिन आणि वैद्यकीय तपासणी यासारखे इतर भराव्या लागणाऱ्या सक्तीच्या शुल्काकरिता रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. तसेच या शुल्काव्यतिरिक्त खालीलप्रमाने वित्तीय सहाय्य केले जाणार आहे .

  • 01 May 2026 11:30 AM (IST)

    01 May 2026 11:30 AM (IST)

    Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच

    Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने त्यांच्या G सीरीजअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा नवा स्मार्टफोन Moto G87 या नावाने सादर केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन Moto G77 चे अपग्रेडेड वर्जन असल्याचे सांगितलं जात आहे. हा स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट Moto G87 ची किंमत 399 यूरो म्हणजेच सुमारे 45 हजार रुपये आहे. हा फोन येत्या काही आठवड्यांत EMEA आणि लॅटिन अमेरिका बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.मोटोरोलाने लाँच केलेल्या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये 6.78-इंच 1.5K एक्सट्रिम अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 5000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, स्मार्टफोनचे रिजॉल्यूशन स्टँडर्ड फुल एचडी पेक्षा 17 टक्के जास्त आहे. एवढंच नाही तर स्क्रीनवर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे प्रोटेक्शन दिले आहे.

  • 01 May 2026 11:25 AM (IST)

    01 May 2026 11:25 AM (IST)

    ठाण्यातही डबल डेकर बसची एंट्री! टीएमटी ताफ्यात ३०० नव्या बसेसची भर, प्रवाशांना मोठा दिलासा

    ठाणेकरांसाठी मुंबईप्रमाणेच ठाण्याच्या रस्त्यांवर लवकरच डबल डेकर बसेस धावताना दिसणार असून गुरुवारी गुरुवारी ठाणे परिवहनच्या आनंदनगर बस आगारात डबलडेकर बस दाख झाल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महानगर परिवहन सेवेत (टीएमटी) १० डबल डेकर बसेसची भर घालण्याची घोषणा केली. प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रवासी सेवेसाठी ती उपलब्ध होण्यास पंधरा दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

  • 01 May 2026 11:20 AM (IST)

    01 May 2026 11:20 AM (IST)

    DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…

    आजचा दिल्ली विरुद्ध राजस्थानचा सामना जयपूरमध्ये होत आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जयपूरची खेळपट्टी ही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी चांगली समजली जाते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये नवीन बॉल असेल तर स्विग मिळू शकतो. दुसऱ्या डावात गोलंदाज प्रभावी मारा करू शकतात. मॅच सुरू झाल्यावर काही ओव्हर्सनंतर  खेळपट्टी थोडी संथ होऊ शकते, ज्यामुळे मधल्या ओव्हर्समध्ये कुलदीप यादव यांसारख्या फिरकीपटूंना मदत मिळेल. खेळपट्टीवर फलंदाज स्थिरावला की, येथे मोठे फटके मारणे सोपे जाते. आउटफील्ड वेगवान असल्याने चेंडू सीमारेषेपलीकडे लवकर पोहोचतो. आजचा सामना रात्रीचा असल्याने दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता जास्त आहे.  यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते आणि चेंडू ओला झाल्यामुळे फिरकीपटूंना ग्रीप मिळवणे जड जाईल. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

  • 01 May 2026 11:15 AM (IST)

    01 May 2026 11:15 AM (IST)

    हॉटेलमध्ये पोलीस झोपले, चकमा देत महाराष्ट्रातून रिमांडवर असलेला आरोपी हरिद्वारमधून फरार

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री महाराष्ट्रातील तळोजा पोलीस ठाण्याचे एपीआय प्रसाद डोंगर यांनी त्यांचे सहकारी पीएन एम खेडकर, महेश पाटील आणि उमेश पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील मुंबई, खारवाला येथील रहिवासी आरोपी अमित ब्रह्मानंद याला पोलीस कोठडी रिमांडसाठी डेहराडूनला आणले होते. तपासानंतर ते हरिद्वारमधील हॉटेलमध्ये थांबले. रात्रीच्या प्रहरी जेव्हा सर्व अधिकारी झोपत गुंगले तेव्हाच आरोपीने संधीचा फायदा घेत हाॅटेलमधून गुपचूप पळ काढला. बुधवारी सकाळी पोलिसांना जाग आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आणि एकच खळबळ उडाली. तत्काळ या घटनेची माहिती हरिद्वार पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, हरिद्वार पोलिसांनी दिवसभर आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप त्याचा काहीही मागमूस लागलेला नाही.

  • 01 May 2026 11:10 AM (IST)

    01 May 2026 11:10 AM (IST)

    DMK पुन्हा सत्तेत, तर अभिनेता विजय किंगमेकर? पाहा तमिळनाडू निवडणुकीचे आकडे

    Tamilnadu  Exit Poll News: तमिळनाडू विधानसभा निवडणुका 2026 संदर्भात ‘टुडेज चाणक्य’ने गुरुवारी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार DMK नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याचे मजबूत संकेत मिळत आहेत. 234 सदस्यीय विधानसभेत DMK आघाडीला सुमारे 125 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेमधील विशेष बाब म्हणजे अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला तब्बल 63 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. दुसरीकडे AIADMK नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सुमारे 45 जागांवर मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.

  • 01 May 2026 11:04 AM (IST)

    01 May 2026 11:04 AM (IST)

    Trump वरील हल्ल्याचा थरार; ‘या’ CCTV फुटेजमुळे नेमके सत्य आले समोर

    Trump White House dinner shooting CCTV : जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अमेरिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ (White House Correspondents’ Dinner) दरम्यान झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचे नवीन सीसीटीव्ही फुटेज आता जगासमोर आले आहे. या फुटेजने संपूर्ण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे आणि सुरक्षेचे धाबे दणाणले आहेत. केवळ ४ सेकंदांच्या आत एका संशयिताने सुरक्षेचे कडेकोट कवच कसे भेदले, हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या घटनेने केवळ अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवर खळबळ उडवून दिली असून सुरक्षेच्या त्रुटींवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

    Slow-mo footage of MOMENT Cole Allen 'SHOT US Secret Service officer' mid-Trump assassination attempt

    US Attorney Pirro: 'no evidence shooting was result of friendly fire' pic.twitter.com/lf6wv9YbcT

    — RT (@RT_com) April 30, 2026

     credit - social media and Twitter

  • 01 May 2026 10:45 AM (IST)

    01 May 2026 10:45 AM (IST)

    नेपाळमध्ये यात्रेकरूंनी भरलेली जीप 700 मीटर दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू

    नेपाळच्या (Nepal ) दुर्गम आणि निसर्गरम्य अशा रोल्पा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. गुरुवारी (३० एप्रिल) सायंकाळच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण नेपाळसह जगभरातील लोकांचे डोळे पाणावले आहेत. एका खाजगी जीपमधून प्रवास करणारे जवळपास २० निष्पाप यात्रेकरू डोंगरावरून ७०० मीटर खोल दरीत कोसळले. या अपघाताने २० हून अधिक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जलजाला परिसरात वैशाख पौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेल्या या यात्रेकरूंचा हा प्रवास इतका वेदनादायक ठरेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती.

  • 01 May 2026 10:35 AM (IST)

    01 May 2026 10:35 AM (IST)

    अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार

    पुण्याच्या व्यावसायिकाला गंडा घातल्याप्रकरणी नोंदवलेल्या खंडणीच्या नवव्या गुन्ह्यात खरातला शुक्रवारी (दि. १) पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी खरातला अटक करून तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. सरकारी पक्षातर्फे अॅड. किरण बेंडभर आणि अॅड. शैलेंद्र बागडे यांनी बाजू मांडली. मात्र, बचाव पक्षाचे वकील अॅड. सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला तीव्र विरोध केला. हा गुन्हा पूर्वीच्या बलात्कार प्रकरणासारखाच असून, यात केवळ विनयभंगाचा आरोप आहे, त्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

  • 01 May 2026 10:25 AM (IST)

    01 May 2026 10:25 AM (IST)

    ‘गोकुळ’वर प्रशासक येणार! हायकोर्टाने मुदतवाढ नाकारल्याने विद्यमान संचालक मंडळाला मोठा धक्का

    कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी (३० एप्रिल) महत्त्वाचे वळण मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने गोकुळवर प्रशासक नेमण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपत असून, मुदतवाढ नाकारल्यामुळे संघाच्या कारभारावर प्रशासक नियुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान चार महिन्यांनी पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 01 May 2026 10:15 AM (IST)

    01 May 2026 10:15 AM (IST)

    प्लेअर्सचं अकाऊंट का बॅन होतं? या चुका टाळा, नाहीतर गेम होईल लॉक

    चिटींग किंवा हॅक्सचा वापर करणं

    काही प्लेअर्स गेममध्ये जिंकण्यासाठी ऑटो एम, वॉल हॅक किंवा अनलिमिटेड डायमंड्स सारख्या चुकीच्या टूल्सचा वापर करतात. असे खेळणं गेमच्या नियमांच्या विरोधात असतं. फ्री फायर मॅक्स सिस्टिम अशा प्लेअर्सना लगेच ओळखते आणि त्यांचे अकाऊंट डिलीट किंवा कायमचे बॅन करते. यामुळे प्लेअर्स गेममध्ये लॉगिन करू शकत नाहीत. तसेच त्यांची गेममधील प्रगती देखील थांबते.

    जाहिरात

    थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करणं

    इंटरनेटवर अनेक मोडियाफाईड वर्जनवर उपलब्ध आहेत, जे गेममध्ये जास्त फीचर्स देण्याचा दावा करतात. मात्र हे थर्ड पार्टी अ‍ॅप्स असुरक्षित असतात आणि गेमच्या निमयांच्या विरोधात असतात. जर तुम्ही अशा थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करत असाल तर तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकतं.

    शिवीगाळ करणं

    जर तुम्ही चॅट्समध्ये शिवीगाळ केली, चुकीच्या भाषेचा वापर केला किंवा एखाद्या प्लेअरला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर दुसरे प्लेअर्स तुमचं अकाऊंट रिपोर्ट करू शकतात. ज्यामुळे कंपनी कारवाई करत तुमचं अकाऊंट बॅन करू शकते.

  • 01 May 2026 10:05 AM (IST)

    01 May 2026 10:05 AM (IST)

    नैराश्येत मुलाने मजल्यावरून उडी मारून जीव संपवला

    आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ३८ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देवेंद्र संजय थोरात (वय ३८, रा. निर्माण उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र थोरात यांचे त्यांच्या आईसोबत पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याने देवेंद्र प्रचंड नैराश्येत होते. याच नैराश्येतून मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने देवेंद्र यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

  • 01 May 2026 09:55 AM (IST)

    01 May 2026 09:55 AM (IST)

    ‘गंगा एक्सप्रेस वे’चा पर्यटनाला किती फायदा होणार?

    पूर्वी मेरठ ते प्रयागराज प्रवासाला १० ते १२ तास इतका वेळ लागत होता. पण आता हा वेळ अंदाजे ५-६ तास म्हणजेच अर्ध्यावर येणार आहे. याचा फायदा असा होईल की ज्यांना आठवड्याच्या शेवटी किंवा कमी वेळेत धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करायची असेल त्यांच्यासाठी हा मार्ग खूप फायदेशीर ठरणार आहे. चांगले रस्ते, जलद कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षित प्रवास यामुळे पर्यटनाला अनुभव आणखी सुधारेल.

  • 01 May 2026 09:45 AM (IST)

    01 May 2026 09:45 AM (IST)

    मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी रेल्वे रुळावर मारली उडी

    सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली ही फिल्मी घटना तंतोतंत खरी आहे आणि ती २८ एप्रिल रोजी बांग्लादेशातील रेल्वे स्थानकावर घडून आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक वृत्तानुसार, ट्रेन सुमारे दीड तास, म्हणजेच अंदाजे ९० मिनिटे उशिरा धावत होती. जेव्हा ट्रेन स्टेशनवर थांबली, तेव्हा वडिलांना वेळेवर उतरता आले नाही. ट्रेन पुन्हा सुरू होताच, घाबरलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला कवेत घेऊन धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. या घाईगडबडीत, ते निष्पाप बाळ त्यांच्या हातातून निसटले आणि थेट रुळांवर पडले. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांना रेल्वे रुळावर उडी मारली आणि त्याला कुशीत घेत तिचेच आडवे झोपले. रेल्वेचे आठ डबे त्यांच्यावरून गेले पण वडीलांना खंबीरपणे ही परिस्थिती हाताळली. ट्रेन जाताच, प्लॅटफॉर्मवरील लोकांनी वडील आणि मुलाला सुरक्षितपणे रुळांवरून बाहेर काढले. यात दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही जे कोणत्या चमत्काराहून कमी नाही.

  • 01 May 2026 09:35 AM (IST)

    01 May 2026 09:35 AM (IST)

    अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार; खंडणीच्या गुन्ह्यात अडकणार

    धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.३०) विनयभंगाच्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील सात गुन्ह्यांना हा अपवाद ठरला.

Web Title: Maharashtra desh videsh 1st may breaking news politics economy live blog marathi breaking news political news economice ipl 2026 live national news international live marathi news latest update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 07:41 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
1

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’;  संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र
2

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’; संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?
3

Maharashtra Politics : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही वाढले भाजपचे संख्याबळ; विधिमंडळात नाही आता मित्रपक्षांची गरज?

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक
4

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.