Maharashtra Breaking News Updates Today:
Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे
पुणे : महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. बारामती उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये दाखल झालेल्या ५९ अजर्जापैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत, तर ६ अर्ज फेटाळण्यात आले. आज, गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, नेमके किती उमेदवार माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती व राहुरीत २३ रोजी मतदान होणार असून, निकाल ४ मे रोजी आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी उमेदवार न देता या निवडणुकीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसने अचानक आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करून ‘जातीय कार्ड’ खेळले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यापुढील आव्हान वाढले असून, ही लढत आता वाटते तितकी सोपी राहिलेली नाही.
09 Apr 2026 06:37 PM (IST)
जर तुम्ही आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोचे शेअरधारक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. विप्रो कंपनीने शेअर बाजारांना कळवले आहे की, कंपनीचा संचालक मंडळ १५-१६ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत इक्विटी शेअर्स परत खरेदी करण्याच्या प्रस्तावावर विचार करेल. याशिवाय, कंपनी १६ एप्रिल रोजी आपल्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करेल. विप्रो कंपनीने म्हटले आहे की, तिचे संचालक मंडळ इक्विटी शेअर्स परत खरेदी करण्याच्या प्रस्तावाचे मूल्यांकन करेल आणि या प्रक्रियेशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींवर विचार करेल. हे सेबीच्या सिक्युरिटीज बायबॅक रेग्युलेशन्स आणि इतर संबंधित कायद्यांच्या लागू तरतुदींनुसार केले जाईल. या घोषणेनंतर, गुरुवारी विप्रोचे शेअर्स किंचित घसरून ₹२०२ वर बंद झाले.
09 Apr 2026 06:27 PM (IST)
नाशिक शहरातून एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकरण समोर आले आहे. नाशिक पोलिसांनी एका आयटी (IT) कंपनीच्या ‘बीपीओ’ (BPO) सेवा विभागाशी संबंधित असलेल्या सहा व्यक्तींना अटक केली आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या कनिष्ठ स्तरावरील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, अनेक महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, आपल्यावर सातत्याने छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि आरोपींना ताब्यात घेतले.
09 Apr 2026 06:22 PM (IST)
सातारा : महाराष्ट्र संघटन सृजन अभियान सुरुवात सातारा काँग्रेस कमिटीतून करण्यात केली जात आहे. याचा उद्देश सातारा जिल्हयासह राज्यात काँग्रेस पक्ष मजबुत करणे आहे. सर्वसामान्य जनता, महिला व शेतकरी यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवत असून भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेस सक्षम होत असल्याचे मत हिमाचल प्रदेशचे आ.मलेंदर राजन यांनी व्यक्त केले.
09 Apr 2026 06:15 PM (IST)
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती रहिवाश्यांच्या जीविताला धोकादायक बनल्या आहेत. पालिका प्रशासन केवळ धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्याचे काम करून आपले हात झाकून टाकत असल्याने आजही धोकादायक इमारतीचा प्रश्न आवासून उभा राहिला असल्याने पालिका प्रशासन इमारती कोसळून जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
09 Apr 2026 06:03 PM (IST)
दोन आठवड्यांनी होणाऱ्या बंगाल विधानसभा (West Bengal) निवडणुकीत अंदाजे ९१ लाख लोकांना मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे (SIR) निर्माण झालेली ही एक अभूतपूर्व आणि अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. १२ टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया (SIR) अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे, या लोकांना नवीन मतदार यादीत समाविष्ट करता आलेले नाही. मतदार म्हणून आपली पात्रता सिद्ध करण्याची जबाबदारी स्वतः लोकांवरच टाकण्यात आली आहे.
09 Apr 2026 05:34 PM (IST)
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, मात्र पुदुचेरीवर त्यावेळी फ्रेंचांचे राज्य होते. त्यामुळे तिथे दोन स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात:
१. १५ ऑगस्ट (राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन): संपूर्ण भारतासोबत पुदुचेरीमध्येही १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवला जातो आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य दिन साजरा होतो.
२. १ नोव्हेंबर (पुदुचेरी मुक्ती दिन – De Jure Day): भारत स्वतंत्र झाल्यावरही फ्रेंच पुदुचेरी सोडायला तयार नव्हते. दीर्घ संघर्ष आणि वाटाघाटींनंतर, १ नोव्हेंबर १९५४ रोजी फ्रेंचांनी पुदुचेरीचा ताबा भारत सरकारकडे सोपवला. या दिवसाला ‘डि ज्यूरे ट्रान्सफर डे’ (De Jure Day) किंवा पुदुचेरीचा खरा स्वातंत्र्य दिन मानले जाते.
09 Apr 2026 05:20 PM (IST)
जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी तसेच इयत्ता नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची पट पडताळणी दिनांक ११ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सविता बिरगे यांनी दिली आहे. (Educational News) सदर पट-पडताळणी करण्याबाबतच्या सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या दिवशी म्हणजेच दिनांक ११ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत करण्याबाबत देण्यात आल्या आहेत. (Parbhani News)
09 Apr 2026 04:50 PM (IST)
शिवसेना ही केवळ एक राजकीय पक्ष नसून सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी लढणारी एक जिवंत चळवळ आहे. प्रत्येक शिवसैनिकाने '२४ तास जनतेच्या सेवेसाठी' हे ब्रीद लक्षात घेऊन संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करावी, असे आवाहन शिवसेनेचे सचिव तथा अहिल्यानगर दक्षिणचे नूतन जिल्हा संपर्कप्रमुख रामजी रेपाळे यांनी केले. अहिल्यानगर दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड झाल्यानंतर रामजी रेपाळे यांचे काल शहरात प्रथमच आगमन झाले. यावेळी शिवसेनेच्या वतीने त्यांचे भव्य आणि उत्साही स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
09 Apr 2026 04:45 PM (IST)
कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत निवृत्त पोलीस अधिकारी याने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांशी गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.वल्लभ टॉवर येथे राहणाऱ्या एक महिल लहान मुलाला घेऊन बाहेर जाण्यासाठी आपली दुचाकी पार्किंगमधून बाहेर काढत होत्या. यावेळी सोसायटीतच राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी बी. एल. पवार यांनी मुद्दाम आपली गाडी महिलेच्या गाडीमागे लावली. वारंवार हॉर्न वाजवूनही त्यांनी गाडी बाजूला घेतली नाही आणि तक्रारदार महिलेकडे पाहण्यास सुरुवात केली. यानंतर तिला शिवीगाळ केली या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले.
09 Apr 2026 04:40 PM (IST)
नवी मुंबईतील खारघर परिसरात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली आहे. खारघर सेक्टर 12 मध्ये फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना चोरट्यांनी टार्गेट केलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक युवक हातगाडी घेऊन येतो आणि नारळ पाणी विक्रेत्याचे नारळ चोरून नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक फेरीवाले आणि
09 Apr 2026 04:35 PM (IST)
काँग्रेस पक्ष च्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत कल्याणमध्ये नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबुतीकरण, आगामी निवडणुकांची तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या चार प्रमुख नेत्यांची नावे पुढे आली आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या कामगिरीचा आढावा मांडत पदासाठी दावा केला. पक्षाच्या वरिष्ठ निरीक्षकांकडून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
09 Apr 2026 04:30 PM (IST)
कल्याण पश्चिमेत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. या परिसरात रस्त्यावर लोकदुचाकी उभी करुन कामाला जातात. यामध्ये सगळ्यात जास्त संख्या पोलिसांची आहे. केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांनी या परिसराची पाहणी केली. बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी पाहून महापौर संतापल्या. या दुचाकी चालकांच्या विरोधात त्वरीत कारवाई करण्याची सूचना महापौरांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर वाहतूक विभागाने या दुचाकी चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाईकेली. असा प्रकार पुन्हा घडू नये अशी सूचना पोलिसांना करण्यात आली आहे.
09 Apr 2026 04:25 PM (IST)
७ एप्रिल रोजी सुनावणीदरम्यान आरोपी हरीसर अँथोनी जोसेफ (४७) कुलाबा सत्र न्यायालयातून पळून गेला होता.विरार पश्चिमेत चहा-पाणी घेतल्यानंतर पैसे न दिल्याने झालेल्या वादातून त्याची ओळख उघड झाली.बीट मार्शल दिनेश सानप आणि सुरक्षा रक्षक अक्षय देसाई यांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल असून तो आर्थर रोड कारागृहात होता.सध्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
09 Apr 2026 04:20 PM (IST)
आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या ९४ व्या फिरत्या नारळी सप्ताहाचा आज भक्तिमय वातावरणात समारोप होत आहे. राष्ट्रसंत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात असून, आजच्या सांगता समारंभासाठी जनसागराचा महापूर लोटला आहे. या सोहळ्याचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार प्रितम मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने संपूर्ण आष्टी तालुका भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
09 Apr 2026 04:15 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कल्याण-निर्मळ महामार्गावर असलेल्या करंजी घाटात आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली. २५ टन लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक घाटात पलटी झाला. सुदैवाने, चालक दत्ता बांगर यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी, महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
09 Apr 2026 04:10 PM (IST)
वसई-विरार परिसरात ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य सेवा सुरू आहेत. मात्र, काही डॉक्टर उच्च शिक्षणासाठी किंवा इतर संधींमुळे सेवेतून बाहेर पडल्याने अनेक केंद्रांवर डॉक्टरांची कमतरता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भरती प्रक्रिया हाती घेतली असून, एकूण ४५ पदांपैकी २० नवीन डॉक्टरांची नियुक्ती पूर्ण झाली आहे.
09 Apr 2026 04:05 PM (IST)
कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील धोकादायक व अतिधोकादायक इमारती रहिवाश्यांच्या जीविताला धोकादायक बनल्या आहेत.पालिका प्रशासन केवळ धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्याचे काम करून आपले हात झाकून टाकत असल्याने आजही धोकादायक इमारतीचा प्रश्न आवासून उभा राहिला असल्याने पालिका प्रशासन इमारती कोसळून जीवित हानी होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
09 Apr 2026 04:00 PM (IST)
कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक अॅक्शन ट्रॅक पाहायला मिळत आहे. मोहिनी आणि तिचे वडील महेंद्र (शांतनू मोघे) यांच्यातील दमदार फाईट सीक्वेन्स केवळ अॅक्शनपुरते मर्यादित न राहता नात्यांमधील संघर्ष, भावनिक गुंतागुंत आणि एका वडिलांचा आपल्या मुलीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न प्रभावीपणे मांडतो आहे. या सीनमुळे मालिकेची रंगत अधिकच वाढली असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
09 Apr 2026 03:55 PM (IST)
आसुस एक्सपर्टबुक बीउ जी१ लॅपटॉप. कंपनीने सध्या हा लॅपटॉप आपल्या देशांतर्गत बाजारपेठ असलेल्या तैवानमध्ये लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप १४-इंच आणि १६-इंच स्क्रीन साईझमध्ये येतो, जे विविध प्रकारच्या कामाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या बिझनेस लॅपटॉपसाठी सामान्य आहे. त्यामुळे ऑफिस काम, डिझायनिंग किंवा हेवी टास्किंगसाठी एक ऑल-राउंडर डिव्हाइस म्हणून याकडे पाहिले जात आहे. आसूसचा एक्सपर्टबुक बी३ जी१ लॅपटॉपची काय आहेत वैशिष्ट्ये जाणून घेऊया
09 Apr 2026 03:50 PM (IST)
Congress vs BJP : आसाम : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा महासंग्राम होत आहे. यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला असून राजकीय आरोप सुरु आहेत. या निवडणुकांच्या प्रचारामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे.काँग्रेसने भाजप आणि भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसवर (RSS) निशाणा साधला आहे. यावरुन भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये राजकीय वाद सुरु आहे.
09 Apr 2026 03:45 PM (IST)
Baramati by-election: जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. पण त्याचवेळी काँग्रेसनेही या जागेसाठी आपला उमेदवार दिला आहे. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते काँग्रेसशी संपर्क साधत आहेत, त्यामुळे काँग्रेस अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. या सगळ्या घटनाक्रमावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
09 Apr 2026 03:40 PM (IST)
नागरिकांची ‘लिव्हिंग विल’ म्हणजेच वैद्यकिय इच्छापत्र कायमस्वरूपी जतन करण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार आहे. त्यांचे जतन करण्यासाठी कस्टोडियन म्हणजेच संरक्षकाचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. नगरविकास विभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे. अर्थात हे फक्त वैद्यकिय इच्छापत्र असून त्याचा संपत्तीशी संबंधित विल म्हणजे इच्छापत्राशी कोणताही संबंध असणार नाही.
09 Apr 2026 03:35 PM (IST)
‘मटका किंग’ ही वेब सीरिज प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जाण्यास सज्ज आहे, जे कधीकाळी वास्तवात अस्तित्वात होते. एक असे जग जिथे अनुभव, निरीक्षण आणि मानवी प्रवृत्तींच्या बारकाव्यांनी घडलेली आहे. रिलीजच्या जवळ असलेल्या या वेब सीरिजबद्दल त्याचे क्रिएटर, लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अनेक रंजक गोष्टी उलगडल्या आहेत. विशेषतः ‘मटका’ या संकल्पनेभोवती फिरणारी ही कथा आणि त्यातून साकारलेली ‘बृज भाटी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार आहे.
09 Apr 2026 03:30 PM (IST)
Parth Pawar Oath Ceremony News In Marathi: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar Oath Ceremony) आज (9 एप्रिल)राज्यसभेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीत भव्य बॅनरबाजी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी अजित पवार जसा जॅकेट परिधान करायचे अगदी तसाच जॅकेट परिधान केला आहे.
09 Apr 2026 03:25 PM (IST)
बंगळुरू : हिंदीवरून नेहमीच ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ वाद उकरून काढला जातो. विशेषतः, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे हिंदी भाषा लादण्याचा आरोप करत सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आले आहेत. मात्र, दक्षिण भरतातीतलच एक राज्य कर्नाटकने मात्र हिंदीचा स्वीकार केल्याचे वास्तव समोर आले आहे. कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे निकाल त्यांचे उत्तम उदाहरण आहेत. तब्बल ९३ टक्के विद्यार्थ्यांनी आपली तिसरी भाषा म्हणून हिंदीची निवड केली आहे.
09 Apr 2026 03:20 PM (IST)
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने महिलेशी अनेकदा लैंगिक संबंध ठेवून कंत्राटदाराच्या संगनमताने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महिलेने काम करण्यास नकार दिला असता, त्याने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले. नंतर तिच्या मुलालाही व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. यामुळे पीडित महिला नैराश्यात जाऊन आत्महत्या केली. तिने रेल्वेखाली उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने पोलिसांनी आरोपीविरूधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे.
09 Apr 2026 03:15 PM (IST)
Baramati Politics: बारामतीची पोटनिवडणूक ही काँग्रेसने लढवलीच पाहिजे. काँग्रेसने बारामतीला वैचारिक लढाई दिली. महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता पाळायला हवी. रमेश चेन्निथला यांच्याशी चर्चा झाली. सुनेत्रा वहिनींनी आज मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही एका निर्णयापर्यंत पोहचलो आहोत. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या विनंतीनंतर त्यांच्याविरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.” अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
09 Apr 2026 03:10 PM (IST)
बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आजकाल भाईजान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज आपल्या लूक्सने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसत आहेत. सलमान खान लवकरच ‘मातृभूमी’ या चित्रपटात दिसणार आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान एक गाणे गाताना दिसत आहे, पण त्याचा अर्थ कोणालाही समजू शकलेला नाही. हा व्हिडिओ आता चर्चेत आलेला दिसत आहे.
credit - social media and Instagram @beingsalmankhan
09 Apr 2026 03:05 PM (IST)
राजवाडा येथील गाळ्याच्या अतिक्रमणाने घेतलेला राजकीय संदर्भ आता गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे .अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी अतिक्रमणांच्या (Encroachment News) संदर्भातील स्पष्टीकरणात माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख केल्याने संतप्त झालेल्या प्रभाग क्रमांक 23 मधील लेवे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पालखीत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. निकम यांना चार वाजेपर्यंत निलंबित करा अन्यथा त्यांना काळेफासू असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. यावेळी मुख्याधिकारी विनोद झळक यांना निवेदन देण्यात आले.
09 Apr 2026 03:00 PM (IST)
Naim Qassem killed in Beirut airstrike : मध्य-पूर्वेतील युद्धाने आता सर्वात भीषण वळण घेतले आहे. ज्या क्षणी जगाला वाटले होते की शस्त्रसंधीमुळे शांतता प्रस्थापित होईल, त्याच वेळी इस्रायलने एक असा धक्का दिला आहे ज्याने संपूर्ण इस्लामिक जग हादरले आहे. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दावा केला आहे की, लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये केलेल्या एका ‘सर्जिकल’ हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा (Hezbollah) नवा प्रमुख नईम कासिम याला कंठस्नान घालण्यात आले आहे. हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर सूत्रे हाती घेतलेल्या कासिमचा अंत झाल्यामुळे हिजबुल्लाह आता नेतृत्वहीन झाला आहे.
צה"ל חיסל בביירות את מזכירו של מזכ"ל ארגון הטרור חיזבאללה נעים קאסם: שורת תשתיות טרור הותקפו הלילה בדרום לבנון
צה"ל תקף וחיסל אתמול את עלי יוסף חרשי, מזכירו האישי של מזכ"ל ארגון הטרור חיזבאללה, ואחיינו של נעים קאסם במרחב ביירות.
חראשי היה מקורב ויועץ אישי למזכ"ל חיזבאללה נעים…
— צבא ההגנה לישראל (@idfonline) April 9, 2026
credit - social media and Twitter
09 Apr 2026 03:00 PM (IST)
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पत्र लिहून कळवले आहे की, बांगलादेश संघ भारताला भेट देण्यास इच्छुक असून, या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताला आमंत्रित केले आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग म्हणून भारत यावर्षी बांगलादेशचा दौरा करणार आहे, ज्यामुळे या घडामोडीचे महत्त्व आणखी वाढले आहे. वाचा सविस्तर
09 Apr 2026 02:55 PM (IST)
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून आरोपी ट्रॅक्टर चालक आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी परिसरातील एका गावात घडली. वाचा संपूर्ण प्रकरण
09 Apr 2026 02:50 PM (IST)
युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलचे लेबनॉनमध्ये हल्ले सुरु आहे. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात २५४ लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक जखमी आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इस्रायलच्या हल्ल्यांना विरोध केला जात आहे. फ्रान्ससह सर्व युरोपीय राष्ट्रांनी अमेरिका इराण युद्धविरामात लेबनॉनला समील करण्याची मागणी केली आहे. तसेच इस्रायलच्या हल्ल्यांमुळे युद्धविराम कमकुवत होत असल्याचे म्हटले आहे. ब्रिटन, इटली, स्पेन, बेल्जियम अशा सर्व युरोपीय राष्ट्रांनी इस्रायलचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
09 Apr 2026 02:45 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेतील युद्ध आणखी पेट घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले सुरुच असून इराणने संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात पाकिस्ताने इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यांना चुकीचे म्हटले आहे. इस्रायलला रोखणे आवश्यक असून तात्काळ कारवाई थांबवण्याची मागणी पाकिस्ताने केली आहे. पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानच्या शांतीदूत भूमिकेने जगभरात आश्चर्याचे वातावरण आहे.
09 Apr 2026 02:40 PM (IST)
एक खळबळजनक वृत्त आहे. पाकिस्तानमधील इराणी राजदूताने काही तांसापूर्वी इराणच्या शिष्टमंडळ गुरुवारी (०९ एप्रिल) रात्रीपर्यंत पाकिस्तानमध्ये येणार असल्याची सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. परंतु ही पोस्ट हटवलण्यात आली आहे. यामुळे युद्धबंदीची चर्चा होणार का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मध्यपूर्वेतील तणावाबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे.
09 Apr 2026 02:35 PM (IST)
बुधवारी ०७ एप्रिल रोजी अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा करण्यात आली होती. परंतु याला काही तासच उलटले असताना इस्रायलने लेबनॉनवर हल्ले चढवले आहेत. लेबनॉन या युद्धविराम कराराचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर ब्रिटन, आणि बेल्जियमने अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामात लेबनॉनचाही समावेश करण्याची मागणी केली आहे. इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यांचा निषेध करत हल्ले थांबवण्याचे आवाहन केले जात आहे. संयुक्त राष्ट्राने आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी देखील इस्रायलच्या लेबनॉवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. वाचा सविस्तर
09 Apr 2026 02:30 PM (IST)
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने महिलेशी अनेकदा लैंगिक संबंध ठेवून कंत्राटदाराच्या संगनमताने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. महिलेने काम करण्यास नकार दिला असता, त्याने पीडित महिलेचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले. नंतर तिच्या मुलालाही व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. यामुळे पीडित महिला नैराश्यात जाऊन आत्महत्या केली. तिने रेल्वेखाली उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने पोलिसांनी आरोपीविरूधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहे. वाचा नेमकं काय घडलं?
09 Apr 2026 02:25 PM (IST)
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. खामेनेईंच्या निधनाला आज ४० दिवस पूर्ण झाले आहे. यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक रस्त्यावर उतलले आहे. राजधानी तेहरापासून अनेक शहरांमध्ये मशिदींध्ये, चौकांपर्यंत रॅली काढण्यात आली आहे.
Iranians gather to mark 40 days since the death of late Supreme Leader Ayatollah Ali Khamenei pic.twitter.com/35kL01w4L2
— RT (@RT_com) April 9, 2026
09 Apr 2026 02:20 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेतील अमेरिका इराण तणावादरम्यान इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरु आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने बेरुतमध्ये हिजबुल्लाहचा प्रमुख नईम कासेल याच्या पुतण्या अली युसूफ खरशीला मारल्याचा दावा केला आहे. इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसारस, खरशी नईम कासेम याचा मुख्ख सल्लागार म्हणून कार्य करत होता. तसेच बेरुतमध्ये इस्रायलने लक्ष्यभेदी हल्लेही सुरुच ठेवले आहेत.
09 Apr 2026 02:15 PM (IST)
स्पेन इराणची राजधानी तेहरानमध्ये पुन्हा आपल्या दूतावास सुरु करणार आहे. स्पेनचे परराष्ट्र मंत्री होजे मॅन्युएल अल्बारेस गुरुवारी (०९ एप्रिल) याची घोषणा केली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
09 Apr 2026 02:10 PM (IST)
सध्या मध्यपूर्वेतील युद्धबंदीबाबात अनिश्चितता निर्माण झाली आहे. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केला आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक इंधन आणि उर्जा पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. परंतु याच वेळी भारतासाठी दिलासादायक वृत्त आहे. भारतीय झेंडा असलेले ग्रीन आशा हे जहाज १५,४०० टन LPG टँकर घेऊन भारतात दाखल झाले आहे. हे जहाज गुरुवारी मुंबईच्या जवाहरलाल नेहरु बंदरावर उतरले आहे.
GREEN ASHA LPG TANKER
Another LPG Tanker Green Asha arrives in Mumbai from West Asia battle zone, after transiting behind Green Sanvi a few days ago.
It is carrying 15000MT LPG.#lpggascrisis #lpg_gas #India https://t.co/QvbV2Udwyw pic.twitter.com/XaimqjdTQw
— India Strikes YT 🇮🇳 (@IndiaStrikes_) April 9, 2026
09 Apr 2026 02:05 PM (IST)
Google AI App Speech app : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलने एक मोठी क्रांती घडवून आणली आहे, लिखाण आणि टायपिंगसाठी एक नवे खास एआय आधारित डिक्टेशन ॲप तयार केले आहे. यामुळे ज्यांचे काम लिखाण किंवा ऑडिओचे मजकुरात रुपांतर करण्यचे आहे अशा लोकांसाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शिवाय हे ॲप पूर्णपणे मोफल असून इंटरनेटशिवाय देखील काम करु शकते. जाणून घ्या संपूर्ण माहिती
09 Apr 2026 02:00 PM (IST)
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) सन 2025-26 मध्ये 1922 कोटी रुपये महसूल वसूल केला असून, राज्य शासनाकडून पुणे आरटीओला मोटार वाहन कर व शुल्क याकरिता १८९५.१७ कोटींचे उदिष्टे देण्यात आले होते. आरटीओला दिलेल्या महसूल वसूलीचे उदिष्टे १०१.४२ टक्के पूर्ण झाले. यामध्ये रस्ता सुरक्षा अंमलबजावणी पथकांद्वारे तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या एकूण १६ हजार ५०१ वाहनांना ई-तपासणी अहवालाव्दारे जारी करण्यात आली. यातून २५ कोटी ६८ लाख रुपये महसूल वसूल करण्यात आले. तसेच कार्यालयामार्फत एकूण १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक परवाना जारी करण्यात आले असून, ५ हजार ५८४ आंतरराष्टीय वाहन परवाने देण्यात आले.
09 Apr 2026 01:55 PM (IST)
वर्धा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. केवळ ५० रुपयांसाठी एकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिंगणघाट जिल्ह्या आणि सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि कडक निकाल दिल्याचे समोर आले आहे.मृत व्यक्तीने आरोपीच्या पत्नीकडून 50 रुपये उसने घेतले होते. हे ५० रुपये परत करण्यावरून आरोपी आणि मृत व्यक्तमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. शिवीगाळ आणि हाणामारी करतांना आरोपी संतापला आणि आरोपीने जवळच असलेला लाकडी राफ्टर उचलला आणि मृतकाच्या डोक्यावर जोराने प्रहार केला. हा वार इतका जोरात होता की, त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
09 Apr 2026 01:50 PM (IST)
जागतिक राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पण सध्या पाकिस्तान (Pakistan) ज्या कारणाने चर्चेत आहे ते ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. इराण आणि अमेरिका यांच्यातील भीषण (US-Israel Iran War) युद्ध टाळण्यात आपणच सर्वात मोठी भूमिका बजावली आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना त्यांच्या या ‘महान’ कार्यासाठी चक्क ‘नोबेल शांतता पुरस्कार’ मिळावा, अशी मागणी पाकिस्तानी जनता आणि तिथली माध्यमे लावून धरत आहेत. मात्र, या मागणीमुळे पाकिस्तानला कौतुकाऐवजी जगभरातून टोमणे आणि टीकेचा सामना करावा लागत आहे.
09 Apr 2026 01:45 PM (IST)
कॅनडा (Canada) हे भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मुख्य केंद्र राहिले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून तिथल्या नियमांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आता कॅनडा सरकारने एक अत्यंत कठोर पाऊल उचलले असून, सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘स्टडी परमिट’च्या नियमांचे पालन केल्याचा पुरावा सादर करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, यासाठी केवळ २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत चुकल्यास विद्यार्थ्यांचा ‘टेंपररी रेसिडेंट स्टेटस’ (तात्पुरता रहिवासी दर्जा) तात्काळ रद्द केला जाऊ शकतो, ज्यामुळे त्यांना थेट हद्दपारीला सामोरे जावे लागेल.
09 Apr 2026 01:41 PM (IST)
आयटी क्षेत्रातील तरुणी-तरुणीला मध्यरात्री पोलिस ठाण्यात आणून त्यांच्याकडून धमकावून पैसे उकळल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांचे एकाचवेळी तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांना सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैसे घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, दहा हजार रुपये फोन पेद्वारे घेतले होते.
09 Apr 2026 01:35 PM (IST)
जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. पण त्याचवेळी काँग्रेसनेही या जागेसाठी आपला उमेदवार दिला आहे. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते काँग्रेसशी संपर्क साधत आहेत, त्यामुळे काँग्रेस अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. या सगळ्या घटनाक्रमावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
09 Apr 2026 01:25 PM (IST)
आसुस एक्सपर्टबुक बीउ जी१ लॅपटॉप. कंपनीने सध्या हा लॅपटॉप आपल्या देशांतर्गत बाजारपेठ असलेल्या तैवानमध्ये लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप १४-इंच आणि १६-इंच स्क्रीन साईझमध्ये येतो, जे विविध प्रकारच्या कामाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या बिझनेस लॅपटॉपसाठी सामान्य आहे. त्यामुळे ऑफिस काम, डिझायनिंग किंवा हेवी टास्किंगसाठी एक ऑल-राउंडर डिव्हाइस म्हणून याकडे पाहिले जात आहे. आसूसचा एक्सपर्टबुक बी३ जी१ लॅपटॉपची काय आहेत वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
09 Apr 2026 01:15 PM (IST)
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जोरदार प्रचार आणि राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. मात्र आता या राजकीय विरोधी भूमिका भयान रुप घेत असल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी रात्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बहारामपूरचे उमेदवार अधीर रंजन चौधरी प्रचार दौऱ्यावरून परतत असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. हा अपघात होता की घातपात असा संशय व्यक्त होतो आहे.






