मुंबई – केंद्र सरकारने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बोलावले. आम्ही आमची भूमिका मागे घेतली नाही. केस सुप्रीम कोर्टात आहे. तीन – तीन मंत्र्यांची समिती सीमावादाच्या मुद्यावर सर्वकष चर्चा करतील. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टातील भूमिका तटस्थ असावी त्यात कुणाचीही त्यांनी बाजू घेऊ नये. केंद्राने न्यायाची बाजू घ्यावी हे आम्ही अमित शहा यांना सांगितले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमावाद सुरू आहे. यावरुन मोठे राजकारणही होत आहे. केंद्राने दोन्ही राज्याच्या सीमावादात हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्लीत पोहचले. रात्री आठच्या सुमारास उभय नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संसदभवनातील शहांच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीनंतर अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला.
बैठकीत हे झाले निर्णय