मुंबई : येत्या आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने कंबर कसली असून, उद्या दिनांक ९ जुलै २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता, राजगड, मध्यवर्ती कार्यालय, दादर येथे राज्यस्तरीय महिला कार्यकारिणी जाहीर होऊन पदे वाटप करण्यात येणार आहे.
राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. अजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यातच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व मुंबई पुणे महानगरपालिका तसेच काही नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर त्यांची तयारी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते चिपळूण, खेड दापोली दौऱ्यावर आहेत. शिवसेना राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी मनसेतील कार्यकर्त्यांची ताकद वाढावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
[read_also content=”माझी Y+ दर्जाची सुरक्षा काढून घ्या; संतोष बांगर यांनी पोलिसांना पत्राद्वारे केली विनंती https://www.navarashtra.com/maharashtra/remove-my-y-grade-security-santosh-bangar-made-a-request-to-the-police-in-a-letter-nrdm-301944.html”]