'ट्रेड सर्टिफिकेट' न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी होणार, परिवहनमंत्र्यांचे आदेश (फोटो सौजन्य-X)
मुंबई : केंद्रीय मोटार वाहन कायदा व व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशीष्ठ प्रतिष्ठान, शोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
प्रितपाल सिंग अँड असोसिएट, गुरुग्राम यांनी मेसर्स ओला इलेक्ट्रीक मोबालिटी लिमीटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट घेऊन राज्यातील विविध ठिकाणी ‘ शोरूम व स्टोअर कम सर्व्हिस सेंटर’ उभारण्यात आले असल्याबाबत तक्रार केली आहे. ह्या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य, पश्चिम, पूर्व), बोरीवली व पुणे या कार्यालयाच्या अंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवून ‘ ट्रेड सर्टिफिकेट’बाबत ३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
व्यापार प्रमाणपत्र (Trade Certificate) म्हणजे एका व्यक्तीला किंवा कंपनीला विशिष्ट प्रकारचा व्यवसाय (Trade) करण्याची परवानगी देणारा एक अधिकृत कागदपत्र आहे, जो स्थानिक प्रशासनाकडून (Municipal Authority) जारी केला जातो.
कायदेशीर मान्यता: हे प्रमाणपत्र तुमच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता प्राप्त करून देते, ज्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे व्यवसाय करू शकता.
स्थानिक नियमांचे पालन: हे सुनिश्चित करते की तुमचा व्यवसाय स्थानिक नियम आणि कायद्यांचे पालन करतो.
विश्वासार्हता: हे प्रमाणपत्र तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवते.
व्यवसाय सुरू करणे: हे तुम्हाला तुमचा व्यवसाय कायदेशीररित्या सुरू करण्यास मदत करते.
वाहन डीलर: वाहन डीलरला त्याच्या मालकीचे वाहन नोंदणीशिवाय (Temporary/Permanent) दुसऱ्या खरेदीदाराला विकता येत नाही, पण व्यापार प्रमाणपत्रामुळे त्याला ही सूट मिळते.
कंपनी: कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी (Commencement of Business) प्रमाणपत्र (COB) आवश्यक असते, जे कंपनीच्या संचालकांनी कंपनी स्थापन केल्यापासून १८० दिवसांच्या आत केलेली घोषणा असते.
निष्कर्ष: व्यापार प्रमाणपत्र तुमच्या व्यवसायासाठी एक महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र आहे, जे तुम्हाला कायदेशीररित्या व्यवसाय करण्याची परवानगी देते आणि तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता वाढवते.