फोटो सौजन्य: iStock
भारतात National Highway आणि Expressways ची संख्या सतत वाढताना दिसत आहे. आपण सर्वेच जाणतो की भारतीय रस्त्यांवर वाहने चालवण्यासाठी टोल टॅक्स भरावा लागतो, पण तुम्हाला माहिती आहे का की असे काही लोक आहेत, ज्यांना टोल टॅक्समधून पूर्णपणे सूट मिळते.
सरकारने काही विशेष श्रेणीतील लोकांसाठी टोल करात पूर्ण सूट देण्याची तरतूद केली आहे. चला अशा लोकांबद्दल जाणून अधिक माहिती जाणून घेऊया.
Honda Activa E ला टक्कर द्यायला येत आहे Suzuki E Access स्कूटर, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
सर्वात आधी आपण जाणून घेऊया की की टोल टॅक्स का आकारला जातो? सार्वजनिक रस्ते, पूल किंवा महामार्गांवरून प्रवास करण्यासाठी वाहनांना भरावे लागणारे हे एक प्रकारचे शुल्क आहे. या शुल्काचा वापर रस्ते बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीसाठी केला जातो.
भारतात एक्सप्रेसवे आणि राष्ट्रीय महामार्ग सतत बांधले जात आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे, लोक आता स्वतःच्या वाहनांनी लांबचा प्रवास करू लागले आहेत. या रस्त्यांवरून प्रवास करण्यासाठी टोल कर आकारला जातो आणि तो NHAI (National Highways Authority of India) द्वारे वसूल केला जातो.
देशभरातील कोणत्याही महामार्गावर किंवा द्रुतगती महामार्गावर प्रवास करताना काही विशिष्ट श्रेणीतील लोकांना टोल टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे. यामध्ये देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, राज्यसभेचे अध्यक्ष, राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष, राज्य विधानसभेचे अध्यक्ष, मुख्य लोकसभेचे अध्यक्ष, न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांचे इतर न्यायाधीश, राज्यांचे मंत्री, संसद सदस्य, भारत सरकारचे सचिव, राज्यसभा आणि लोकसभेचे सचिव, राज्यांच्या विधानसभा आणि विधान परिषदांचे सदस्य आणि अधिकृत दौऱ्यांवर असलेले उच्चपदस्थ परदेशी मान्यवर यांचा समावेश आहे.
किती वर्ष टिकते Electric Scooter ची बॅटरी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
भारत सरकारच्या वतीने, देशाच्या सेवेसाठी विशेष व्यक्तींना पुरस्कार दिले जातात. या लोकांना सरकारकडून टोल टॅक्समध्येही सूट दिली जाते. यामध्ये परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र विजेत्यांचा समावेश आहे. या लोकांना टोल प्लाझावर फक्त त्यांचे फोटो असलेले ओळखपत्र दाखवावे लागते.
वर उल्लेख केलेल्या सन्माननीय लोकांव्यतिरिक्त, इतर काही लोकांनाही टोल टॅक्समध्ये सूट दिली जाते. यामध्ये संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, अधिकृत कामासाठी जाणारे अधिकारी, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल, निमलष्करी दल, केंद्रीय आणि सशस्त्र दलांचे पोलिस गणवेशातील अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, अग्निशमन विभाग किंवा संघटना, एनएचएआय किंवा अशा कोणत्याही संस्थेचे लोक जे त्यांची वाहने तपासणी, सर्वेक्षण इत्यादींसाठी वापरतात त्यांना टोल करातून सूट देण्यात आली आहे. यासोबतच, देशभरात रुग्णवाहिका आणि शववाहिका वाहनांना टोल टॅक्समध्ये पूर्ण सूट दिली जाते.
अलिकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक लोकांना टोल टॅक्समध्ये पूर्ण सूट मिळेल अशी घोषणा केली होती. जर एखादी व्यक्ती टोल प्लाझा जवळील परिसरातील रहिवासी असेल आणि वारंवार या रस्त्याचा वापर करत असेल, तर ते स्थानिक रहिवासी म्हणून टोल टॅक्समध्ये सूट मिळवू शकतात.