संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : विद्यानगरी ते ‘पिस्तूलनगरी’ अशी ओळख निर्माण करत पुण्यातील गुंडानी ‘साऊथ’च्या चित्रपटाप्रमाणे गुन्हेगारीकडे वळू लागल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या बड्या खूनांमध्ये पिस्तूलांचा प्रकर्शाने वापर झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या देखील मोठी झाली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गेल्या चौदा वर्षात म्हणजेच, २०११ ते २०२५ या कालावधीत पुण्यातून तब्बल १४०० पिस्तूले जप्त करण्यात आली असून, १८३९ जणांना अटक करण्यात आली आहे. या पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारून पिस्तूल धाऱ्यांचा आलेख कसा वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कधी काळी असलेली विद्यानगरी आता पिस्तूलनगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
सांस्कृतिक अन् शांतताप्रिय शहरातील वाढत्या गुन्ह्यांनी नक्कीच जुने व जाणकर पुणेकर चिंतेत असतील. शहरात लाठ्या-काठ्याही जिथे न्याय हक्कांसाठी उचलल्या गेल्या त्याच पुण्यात आज कोयते व पिस्तूलांनी रक्ताचे सडे पाडले जात आहेत. गेल्या काही वर्षातील घटनां पाहता पुणे म्हणजे गुन्हेगारीने बरबटलेले शहर असेच म्हणत असावे असे दिसते. फक्त मारण्यासाठी नव्हे तर लुटमार, भिती दाखविण्यासाठी आणि स्टेट्ससाठी देखील या पिस्तूलांचा वापर होत असल्याचे घडलेल्या गुन्ह्यांतून समोर आले आहे.
शहराच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक ठरत असलेले पिस्तूल ‘विद्यानगरीत’ सहजतेने उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे. हे पिस्तूल वापरणारे सराईतच गुन्हेगार आहेत, असेही नाही. नव्या-कोऱ्या पोरांच्या हातात देखील पिस्तूल देऊन त्यांना या गुन्हेगारीच्या दलदलीत टाकले जात आहे. पिस्तूलांचे आकर्षण या तरुणाईला आहे. त्यातून ते पिस्तूल बाळगण्यासाठी वाट्टेल ते करत असल्याचेही दिसून आले आहे.
सहजरित्या हे पिस्तूल उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारांचे साधत आहे. पाच ते पंचवीस हजारांपर्यंत हे पिस्तूल उपलब्ध होत आहेत. त्याहून कमी किंमतीत आणि पाहिजे तितके हवे असल्यास परराज्यातून गुन्हेगार पिस्तूले घेण्यास जातात असे देखील काही घटनांवरून समोर आले होते. काही अल्पवयीन मुलांनीच एका मर्डरचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्यांनी पिस्तूलांचा साठा आणला होता. पण, सरावात काडतूसे गेली. पुन्हा ती मिळविण्यासाठी उत्तमनगर परिसरात दरोडा टाकला होता.
दरम्यान, वाढलेल्या घटनांना आवर घालण्यासाठी तसेच बेकायदा पिस्तूलांचा चाप लावण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. गेल्या पाच वर्षात ( २०२० ते २०२५) पोलिसांनी ४५० पिस्तूल पकडले असली तरी न पकडलेल्या पिस्तूलांचा आकडा किती असेल हा प्रश्नच आहे.
परराज्यातून पिस्तूल पुण्यात…
पिस्तूल विक्री करणारे रॅकेटच सक्रिय असून, ते परराज्यातून स्वस्थात पिस्तूल आणत पुण्यात दुप्पट ते तिपट्ट किंमतीने विक्री करत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून बक्कळ पैसा देखील मिळविला आहे. परराज्यात पिस्तूल अगदीच स्वस्त मिळतात. बिहार, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशातून हे पिस्तूल आणले जातात. त्याठिकाणी ५ हजारांपासून पिस्तूल मिळते. तेच पिस्तूल पुण्यात हवे तसे व गरजेनुसार किंमतीने विकले जाते. त्यात पिस्तूल घेऊन येणे सोपे आहे. दुचाकी व वाहनांमध्ये सहजरित्या आणले जाते. पुर्वी पुण्यापर्यंत पिस्तूल पुरवणारे एक रॅकेट होते. ते पुण्यात विक्री करणारे दुसरे रॅकेट. पण, आता परिस्थिती बदलली आहे. काही गुन्हेगार तर थेट पिस्तूल खरेदीलाच परराज्यात जात असल्याचे दिसून आले आहे.
वर्ष- जप्त पिस्तूल – अटक आरोपी
२०११- ७८ १०६
२०१२- ७६ १०२
२०१३- ९२ १३९
२०१४- १२० १६६
२०१५- ११० १५१
२०१६- १२४ १६३
२०१७- १११ १२१
२०१८- १३६ १२२
२०१९- ९० ९६
२०२०- ११६ १०२
पाच वर्षातील आकडेवारी. ( २०२० ते २०२५)
दाखल गुन्हे- जप्त पिस्तूल- जप्त काडतूसे– अटक आरोपी
३७५ ४४५- १३५७ ५७१
पिस्तूलांचा वापर वाढला..!
पुण्याच्या गुन्हेगारीचा कोयता पॅटर्न तसा राज्यभरात प्रसिद्ध आहे. असे असले तरी आता कोयत्यासोबतच पिस्तूलाने ढिशक्यांव-ढिशक्यांव करण्याचाही पॅटर्न फोफावला आहे. त्याचे कारणही तसे आहे, गुन्हेगारी वर्तळातील मतानुसार कोयत्याने मारले अन् नंतर तो ‘वाचला’ असे नको म्हणून आधी गोळ्या झाडल्या जातात. नंतर कोयत्याने तोडण्यात येते, असे सांगितले जाते. कुख्यात गुंड शरद मोहोळचा गोळ्या झाडूनच खून करण्यात आला. नंतर माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांना देखील गोळ्या झाडून व नंतर कोयत्याने वार करून मारण्यात आले. सोबतच पिस्तूलांमधून अधून-मधून दहशतीसाठी गोळ्या झाडल्या जातात.
नुकत्याच घडलेल्या काही घटना