राजगुरूनगर : खेेड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच लांडेवाडी येथील शिवनेरी या दादांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला. त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख महादेव लिंभोरे,विभागप्रमुख संभाजीराव राळे, खराबवाडीचे युवा नेते सम्राट देवकर, उद्योगपती सुदर्शन देवकर, उपविभागप्रमुख अरुण लिंभोरे, शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य आसखेड खुर्द, शांताराम लिंभोरे, उद्योजक, पांडुरंग लिंभोरे, माजी चेअरमन दिपक लिंभोरे, ग्रामपंचायत सदस्य शरद लिंभोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धनंजय लिंभोरे, युवासेना उपविभाग अधिकारी दत्तात्रय लिंभोरे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय लिंभोरे, गणेश पडवळ, चेअरमन शेलु गणेश नामदेव पडवळ, सोसायटी संचालक मनोहर कडाळे, भांबोली ग्रामपंचायतीचे सदस्य विकास भोकसे, अतुल थिगळे सर्वांनी शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना जिल्हा संघटक अशोकराव भुजबळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, युवासेना तालुका प्रमुख विशालआप्पा पोतले या सर्वांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी उपस्थितीत शिवसेना उपतालुका प्रमुख दत्ता राऊत, युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे, सहकार सेनेचे उपतालुका प्रमुख शंकरराव घेनंद, युवासेना उपतालुका प्रमुख संदिप काचोळे, शिवसेना उपविभाग प्रमुख संपतराव आढाव, वहागावचे सरपंच किसनराव नवले, साबळेवाडी सरपंच रायबा साबळे, चर्होली गावचे मा.सरपंच शिवाजीराव पगडे, वडगाव घेनंद शाखाप्रमुख ऋषिकेश घेनंद, शेलगावचे नितीन आप्पा आवटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.