मराठा आरक्षणासह इतर मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी
कोल्हापूर: मराठा आरक्षण तसेच इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३ ते १० मार्च या अधिवेशन काळात तोडगा काढावा; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिला. रविवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला राज्यभरातील ४२ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आरक्षणाबरोबरच ११ ठराव एकमताने मंजूर केले.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची वज्रमूठ बांधण्याचे नियोजन केले आहे. बैठकीला ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रतापसिंह जाधव हे व्हिडीओ कॉन्स्फरन्सीद्वारे हजर होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती विनायक मेटे, सुरेश जावडेकर, सुधाकरराव माने, वंदनाताई मोरे, दीपक पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे म्हणाल्या, मराठा समाजाच्या अनेक मागण्या आज प्रलंबित आहेत; मात्र शासन केवळ आश्वासनापलीकडे काहीच देत नाही. सरकारला जागे करण्यासाठी आता पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. जोपर्यंत आपल्या दहा मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाची मशाल खाली ठेवणार नाही. सुरेश जावडेकर म्हणाले, मराठा समाज आता आक्रमक बनला आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा पुन्हा लोक पेटून उठतील.
बैठकीत करण्यात आलेले अकरा ठराव
ओबीसी प्रवर्गातील ज्या सोयी सवलती आहेत, तशाच त्या मराठा समाजाला लागू कराव्यात.