Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Marathi Breaking Live Updates : राजकारण, समाजकारण, अर्थकारण, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजनसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 23, 2026 | 06:37 PM
Top Marathi News Today Live : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जींनाच 'तृणमूल'च्या अध्यक्षपदावरून काढले

Top Marathi News Today Live : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जींनाच 'तृणमूल'च्या अध्यक्षपदावरून काढले

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने या निवडणुकीतून उमेदवार मागे घेतला आहे. त्यामुळे सुनेत्रा यांचा विक्रमी विजय अपेक्षित आहे. अजित पवरांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

या मतदानासाठी शरद पवार हजर नसतील, अशी माहिती सध्या दिली जात आहे. यावर शरद पवार म्हणाले, १९६७ मधील माझ्या पहिल्या निवडणुकीपासून मी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र, यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार नाही. ढासळत्या प्रकृतीमुळे मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

The liveblog has ended.
  • 23 Apr 2026 06:36 PM (IST)

    23 Apr 2026 06:36 PM (IST)

    सरनाईकांच्या मतदारसंघात सदावर्ते आक्रमक; रिक्षाचालकांशी संवाद, मेहता भेटीने राजकीय रंग, मनसेसोबत रस्त्यावर संघर्ष

    भाईंदर : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाने केवळ प्रशासकीय नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय पातळीवर मोठा वाद निर्माण केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला असताना, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्याला जोरदार विरोध दर्शवत हा मुद्दा रस्त्यावर आणला आहे. मिरा-भाईंदरमधील अलीकडील घडामोडी या वादाची तीव्रता किती वाढली आहे, याचे प्रतीक ठरतात.

  • 23 Apr 2026 06:30 PM (IST)

    23 Apr 2026 06:30 PM (IST)

    Bhujia King : ‘भुजिया किंग’चा प्रवास इथेच थांबला! कोट्यवधींचे साम्राज्य उभं करणारे प्रसिद्ध शिवरतन अग्रवाल यांचे निधन

    Bhujia King Shivratan Agarwal Passes Away : बिकाजी ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शिव रतन अग्रवाल यांचे गुरुवारी (23 एप्रिल 2026) सकाळी चेन्नई येथे निधन झाले. पत्नीच्या उपचारासाठी कुटुंबासोबत तिथे राहत होते. सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीची नुकतीच हार्ट बायपास शस्त्रक्रिया झाली होती आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते गेल्या १० दिवसांपासून चेन्नईमध्ये राहत होते. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.

  • 23 Apr 2026 06:25 PM (IST)

    23 Apr 2026 06:25 PM (IST)

    Israel Iran Conflict : इराणचा आक्रमक पवित्रा! युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान इस्रायली गुप्तहेराला फाशी, मध्यपूर्वे पुन्हा पेटणार?

    Iran Executes Mossad Agent : तेहरान/वॉशिंग्टन/जेरुसेलम : मध्यपूर्वेती अमेरिका इराण तणाव (US Iran War) निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. इराणने इस्रायलशी संबंधित एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे युद्धविरामाच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणने इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादशी संबंधित असल्याच्या आरोपावरुन एका व्यक्तीला फाशी दिली आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनिश्चित काळासाठी युद्धविरामाची घोषणा केली आहे.

  • 23 Apr 2026 06:16 PM (IST)

    23 Apr 2026 06:16 PM (IST)

    हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर, नेमकं काय झाली चर्चा?

    मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधींच्या हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. हा सर्व दस्तावेज असताना जैन मुनीने गांधी हत्येचे समर्थन करावे हे योग्य नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • 23 Apr 2026 06:07 PM (IST)

    23 Apr 2026 06:07 PM (IST)

    गोत्यात यायचे नसेल तर...! ChatGPT ला कधीच विचारू नका 'हे' प्रश्न; एआय का देतंय नकार?

    ChatGPT News: हल्लीच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी डिजिटल मिडिया, सोशल मिडिया आणि एआयचा वापर केला जातो. 2022 मध्ये एआय  लॉंच झाले आहे. आपल्याला हवी ती माहिती एआय देते, त्यामुळे आपले (Tech News) काम सोपे होते. कोणत्याही क्षेत्रात आपण पाहिले तर हल्ली एआयचा वापर होतो. मात्र कोणतेही एआय टूल आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे देत नाही. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

  • 23 Apr 2026 05:57 PM (IST)

    23 Apr 2026 05:57 PM (IST)

    प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केली भूमिका

    प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदानाच्या दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार या सगळ्या माध्यमांमध्ये चर्चा आहे. या पोटनिवडणुकीसाठी मी तटस्थ भूमिका घेतली आहे.

  • 23 Apr 2026 05:44 PM (IST)

    23 Apr 2026 05:44 PM (IST)

    बारामतीत दुपारी एकपर्यंत 31 टक्के मतदान

    बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूकसाठी सकाळी सकाळी ९ वाजेपर्यंत ८.१ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा टक्का हळूहळू वाढत आहे. सकाळी 11 पर्यंत 20 टक्के मतदान झाले. तर, दुपारी एक वाजेपर्यंत 31 टक्के मतदान झाले.

  • 23 Apr 2026 05:37 PM (IST)

    23 Apr 2026 05:37 PM (IST)

    सप्तशृंगी गडावरील मंदिरातील 22 किलो चांदी गायब

    साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारातून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये सुमारे 22 किलोची तफावत आढळली असून, या 'चांदी अपहार' प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

  • 23 Apr 2026 05:22 PM (IST)

    23 Apr 2026 05:22 PM (IST)

    बारामतीत 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार व्हावे, अशी आमची इच्छा नाही : जय पवार

    माझ्या म्हणण्याचा मीडियाने चुकीचा अर्थ घेतला आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करावं, अशी माझी इच्छा आहे. पण २०२९ मध्ये मी उमेदवार व्हावं, अशी लोकांची इच्छा आहे. बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठीही माझे नाव पुढे आले होते. पण त्यावेळीही अजितदादांना मी कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले होते. तसेच, २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार होणार, असे रोहित पवार म्हणाले. पण आमची तशी कोणतीही इच्छा नाही, असे जय पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • 23 Apr 2026 05:13 PM (IST)

    23 Apr 2026 05:13 PM (IST)

    ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मध्य रेल्वे नमली; परीक्षेसाठी मराठी भाषेचे माध्यम

    मध्य रेल्वे विभागाने १६ मार्चपूर्वी काढलेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीमध्ये परीक्षेसाठी मराठी भाषेचे माध्यम दिले नव्हते, त्याचा निषेध करत अमित ठाकरे यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला होता. त्यानंतर मध्ये रेल्वे विभागाने त्याची दखल घेत अगोदरची अधिसूचना रद्द केली होती. मध्य रेल्वे विभागाने परीक्षेसाठी आता मराठी भाषेचा समावेश करत नव्याने अधिसूचना काढली आहे.

  • 23 Apr 2026 05:00 PM (IST)

    23 Apr 2026 05:00 PM (IST)

    शिक्षण विभागाचा शाळांना दिलासा! स्वयंमूल्यांकन प्रक्रियेला मुदतवाढ

    राज्यातील शाळांसाठी सुरू असलेल्या स्वयंमूल्यांकन प्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाने महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेसाठी देण्यात आलेली अंतिम मुदत वाढवून शाळांना आता १ मेपर्यंत आवश्यक माहिती सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अद्याप विविध कारणांमुळे माहिती भरू न शकलेल्या शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 23 Apr 2026 04:50 PM (IST)

    23 Apr 2026 04:50 PM (IST)

    पाहूनच तोंडाला पाणी सुटेल! घरी बनवा हिरव्या मसाल्यातील कुरकुरीत ‘पापलेट फ्राय’

    समुद्रकिनारी मिळणाऱ्या ताज्या माशाचा सुगंध आणि चव ही खरंच वेगळीच असते. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पापलेट हा मासा विशेष लोकप्रिय आहे. त्याच मऊ, रसाळ मांस आणि सौम्य चव यामुळे ती विविध पद्धतींनी बनवली जाते. हिरव्या मसाल्यातील पापलेट फ्राय ही  एक चविष्ट आणि थोडी वेगळी रेसिपी आहे.

  • 23 Apr 2026 04:40 PM (IST)

    23 Apr 2026 04:40 PM (IST)

    Vastu Tips: घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी या दिशेला ठेवा ब्रह्मकमळ

    वर्षातून एकदाच मध्यरात्री उमलणारे आणि पहाटे कोमेजणारे फूल किती खास असेल? ते सुंदर फूल म्हणजे ‘ब्रह्मकमळ’. असे मानले जाते की भगवान ब्रह्मदेव याच कमळावर वास करतात. हे रोप घरात असणे म्हणजे घरात दैवी ऊर्जा असण्यासारखेच आहे. या फुलाला आध्यात्मिक तसेच वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व आहे. घरात ब्रह्म कमळ योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. त्यामुळेच वास्तु दोष दूर करण्यासाठी या पवित्र फुलाचे स्थान आणि दिशा जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. घरामधील वास्तुदोष दूर करण्यासाठी ब्रम्हकमळ कोणत्या दिशेला लावावेत, जाणून घ्या

  • 23 Apr 2026 04:30 PM (IST)

    23 Apr 2026 04:30 PM (IST)

    Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’

    Summer Car Care Tips: सध्या राज्यासह देशभरात उन्हाचा कडाका वाढला असून पारा 40 अंशांच्या पार गेला आहे. अशा परिस्थितीत माणसांप्रमाणेच तुमच्या लाडक्या वाहनांनाही उन्हाचा मोठा फटका बसत आहे. पार्किंगसाठी शेड किंवा बेसमेंटची सुविधा नसल्यास अनेकदा आपण कार उन्हात उभी करतो, मात्र ही छोटीशी निष्काळजी तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकते. अवघ्या काही मिनिटांत कारचे केबिन गरम झाल्यामुळे त्याचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही, तर गाडीच्या कार्यक्षमतेवरही होतो.

  • 23 Apr 2026 04:20 PM (IST)

    23 Apr 2026 04:20 PM (IST)

    Fact Check : अफवांना बळी पडले ट्रम्प?

    Truth of Trump claims Saving 8 Iranian Women From Excection: वॉशिंग्टन/तेहरान : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अफवांना बळी पडले आहे. ट्रम्प यांनी इराणमधील ८ महिलांची फाशी रोखल्याचा दावा केला होता. मात्र इराणने हा दावा खोडून काढला असून ट्रम्प फेक न्यूजला बळी पडले असल्याचे म्हटले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. इराणने सोशल मीडियावर ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

  • 23 Apr 2026 04:12 PM (IST)

    23 Apr 2026 04:12 PM (IST)

    IPL 2026: मुंबईचा ‘राजा’ विरुद्ध चेन्नईचा ‘थाला’

    Tata IPL 2026 MI Vs CSK Live: आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आज पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या ३३ व्या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5 वेळा जेतेपदावर नाव कोरले आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2026) टिकून राहण्यासाठी दोन्ही ‘महाबलाढ्य’ संघांना आजचा विजय महत्वचा असणार आहे.

  • 23 Apr 2026 03:50 PM (IST)

    23 Apr 2026 03:50 PM (IST)

    थरारक घटना! 23 वर्षीय तरुणीकडून आई-भावाची निर्घृण हत्या; कारण काय?

    उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईची आणि भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये बुधवारी (२२ एप्रिल) रोजी घडली.

  • 23 Apr 2026 03:40 PM (IST)

    23 Apr 2026 03:40 PM (IST)

    ‘हा तर भाजपचा एजंट!’ हुमायूं कबीर यांच्या ताफ्यावर हल्ला, मुर्शिदाबादमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

     पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मतदानादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या दरम्यान हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच सुरक्षाकर्मचाऱ्यांसोबतही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 23 Apr 2026 03:35 PM (IST)

    23 Apr 2026 03:35 PM (IST)

    समुद्राच्या गाभाऱ्यातलं दुर्मिळ दृश्य! पाण्याच्या तळाशी मादी व्हेल पिल्लाला दूध पाजताना कॅमेऱ्यात कैद; Video Viral

    महासागराच्या आत अनेक रहस्ये दडलेली आहेत ज्यांची फारशी माहिती मानवाला नाही. माशांना आजवर आपण पाण्यात पोहताना पाहिलं आहे पण वास्तवात त्यांचं जीवन कसं आहे याची माहिती आपल्याकडे नाही. असं म्हणतात की, जगात आईहून अधिक प्रेम आपल्यावर कुणीही करु शकत नाही. आईला ममतेचं प्रतिक मानलं जातं. आई-मुलाचं हे नातं फक्त मानवांपुरतंच मर्यादित नसून प्राणी, पक्षी आणि माशांमध्येही हे नातं तितकंच घट्ट असतं. अलिकडेच सोशल मिडियावर यासंबंधित एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक देवमासा म्हणजेच मादी व्हेल आपल्या पिल्लाला पाण्याच्या तळाशी दूध पाजताना दिसून आली. व्हेल माशाने आपल्या बाळाला दूध पाजण्याचा हा दुर्मिळ क्षण यूजर्सने पहिल्यांदाच पाहिला ज्यामुळे हे दृष्य सोशल मिडियावर शेअर होताच लोकांनी वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली.

  • 23 Apr 2026 03:25 PM (IST)

    23 Apr 2026 03:25 PM (IST)

    राजनाथ सिहांची जर्मनी वारी यशस्वी! रडारवर अदृश्य, जर्मनीच्या मदतीने भारत बनवतोय जगातील सर्वात शांत पाणबुडी

    भारत आता केवळ शस्त्रे खरेदी करणारा देश राहिला नसून, तो जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा संरक्षण भागीदार म्हणून उदयास येत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांचा नुकताच झालेला तीन दिवसीय जर्मनी दौरा याच बदलाचा पुरावा आहे. सात वर्षांनंतर एखाद्या भारतीय संरक्षण मंत्र्याने जर्मनीला दिलेली ही पहिलीच भेट आहे. या दौऱ्याचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे ९०,००० कोटी रुपयांचा ‘Project-75I’ हा पाणबुडी प्रकल्प, जो भारतीय नौदलाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता ठेवतो.

  • 23 Apr 2026 03:20 PM (IST)

    23 Apr 2026 03:20 PM (IST)

    कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीला चालना; बायोगॅस धोरण जाहीर, ५०० कोटींची गुंतवणूक

    कचरा साठल्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण, २०२६ राबविण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी २०२६-२७ या वर्षात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहरांतील कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पध्दतीने लावणे शक्य होणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत कॉम्प्रेस्ड बॉयोगॅसच्या गरजेनुरूप वापरण्यायोग्य गॅस उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वापरून प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. धोरणांच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे. असे प्रकल्प पीपीपी आणि हायब्रिड अॅन्युएटी तत्वावर राबविण्यात येणार आहे.

  • 23 Apr 2026 03:15 PM (IST)

    23 Apr 2026 03:15 PM (IST)

    नेस्को ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना अटक, मुख्य आरोपी भारत सोडून फरार

    मुंबईच्या गोरेगाव येथील NESCO येथे एक म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. यात कार्यक्रमात ड्रग ओव्हरडोसमुळे MBA च्या दोन विध्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ११ लोकांना अटक केली आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भारत सोडून फरार झाला आहे. तर अटक केलेल्या Nescoच्या दोन अधिकाऱ्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  • 23 Apr 2026 03:09 PM (IST)

    23 Apr 2026 03:09 PM (IST)

    एंटरटेनमेंटचा फुल पॅक! 500 रुपयांत YouTube Premium OTT, 5G आणि Gemini बेनिफिट्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

    Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी नव नवीन ऑफर आणत असतो. आता Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एंटरटेनमेंटचा फुल पॅक असलेला खास प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. फक्त 500 रुपयांत प्रीमियम OTT आणि 5G फायदे मिळणार आहेत. एवढेच नाहीत तर 35,100 रुपयांच्या किंमतीचा Google Gemini बेनिफिटही मिळणार आहेत. चला, या प्लानचे फायदे जाणून घेऊया

  • 23 Apr 2026 03:00 PM (IST)

    23 Apr 2026 03:00 PM (IST)

    होर्मुझची सामुद्रधुनी कधी उघडणार? गालिबाफ यांनी केले स्पष्ट

    अमेरिका इराण वाद तीव्र पेटला असून होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही बंद आहे. यामुळे जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. इंधन किमती गगनाला भिडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी होर्मुझ कधी उघडणार हे स्पष्ट सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, जोपर्यंत इराणच्या नौदल नाकेबंदी उठवली जात नाही आणि शस्त्रसंधी उल्लंघ शत्रूकडून थांबत नाही, तोपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार नाही.

    آتش‌بس کامل وقتی معنا دارد که با محاصره دریایی و گروگان‌گیری اقتصاد دنیا نقض نشود و جنگ افروزی صهیونیست‌ها در همه جبهه‌ها متوقف باشد؛ بازگشایی تنگه هرمز با نقض فاحش آتش‌بس ممکن نیست.
    با تجاوز نظامی به اهداف خود نرسیدند،با قلدری هم نخواهند رسید. تنها راه، پذیرش حقوق ملت ایران است.

    — محمدباقر قالیباف | MB Ghalibaf (@mb_ghalibaf) April 22, 2026

  • 23 Apr 2026 02:55 PM (IST)

    23 Apr 2026 02:55 PM (IST)

    मिर्झापूर अपघातावर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले

    मिर्झापूर येथे घडलेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे घडलेल्या अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला अत्यंत दुःख आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. अपघातात जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो." या दुर्दैवी अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला, अशा प्रत्येक व्यक्तीच्या निकटच्या नातेवाईकांना 'पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी'तून (PMNRF) २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत मिळेल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

  • 23 Apr 2026 02:50 PM (IST)

    23 Apr 2026 02:50 PM (IST)

    सीझफायरवरून इराणने उडवली अमेरिकेची थट्टा

    अमेरिका आणि इराणमधील संघर्ष (US-Israel Iran War) आता केवळ समुद्रात किंवा जमिनीवर मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) माध्यमातून सोशल मीडियाच्या रणांगणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर इराणसोबत शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय घेतला खरा, पण इराणने या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी त्याची चक्क खिल्ली उडवली आहे. इराणमध्ये सध्या एक ४५ सेकंदांचा एआय व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, त्याने वॉशिंग्टनपासून ते तेहरानपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

    How was the ceasefire extended?
    The video is getting viral in Iran. pic.twitter.com/UCldpWjZMO

    — Iran In Hyderabad (@IraninHyderabad) April 22, 2026

  • 23 Apr 2026 02:45 PM (IST)

    23 Apr 2026 02:45 PM (IST)

    अमेरिकन खासदारांची इराण युद्धावरून ट्रम्प यांच्यावर टीका

    अमेरिका इराण युद्धाने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशात तणाव निवळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन सिनेटर ख्रिस मर्फी यांनी ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की,  ट्रम्प यांच्या इराणसोबतच्या युद्धामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. संघर्ष संपुष्टात आणण्यास इराणच्या नकारामुळए होर्मुझवर त्यांचे नियंत्रण कायम राहिल ज्यामुळे तेलाच्या किमती गननला भिडल्या आहेत.

     

  • 23 Apr 2026 02:40 PM (IST)

    23 Apr 2026 02:40 PM (IST)

    ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे शांतता चर्चेत अडथळा- इराणचे राष्ट्राध्यक्ष

    इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी मंगळवारी (२१ एप्रिल) इराण शांतता चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु शत्रूच्या धमक्या आणि आक्रम उपाययोजनांमुळे यामध्ये अडथळा येत असल्याचे त्यांनी म्हटले. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये पेझेश्कियान यांनी ठामपणे सांगितले की इराणने संवाद आणि शांततेचे नेमहमीच स्वागत केले आहे आणि यापुढेही करत राहिले. परंतु शत्रूच्या दुष्ट हेतू आणि घेराव घालण्याच्या धोरणामुळे, धमक्यांमुळए वाद पेटत आहे. यामुळे परस्पर विश्वाला तडा जात आहे.

    The Islamic Republic of Iran has welcomed dialogue and agreement and continues to do so. Breach of commitments, blockade and threats are main obstacles to genuine negotiations. World sees your endless hypocritical rhetoric and contradiction between claims and actions.

    — Masoud Pezeshkian (@drpezeshkian) April 22, 2026

  • 23 Apr 2026 02:35 PM (IST)

    23 Apr 2026 02:35 PM (IST)

    इराण युद्धाची नेतन्याहूंची योजना तीन राष्ट्राध्यक्षांनी फेटाळली होती

    अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. इराणविरुद्धच्या युद्धाची योजना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेसोमर आतापर्यंत तीन वेळा सादर केली होती. यापूर्वीच्या तीन राष्ट्राध्यक्षांनी ही योजना फेटाळून लावली होती. मात्र ट्रम्प नेतन्याहूंच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी युद्धाला मंजुरी दिली. जॉन केरी यांनी केलेल्या दाव्यानुसार बराक ओबामा, जॉर्ज डब्ल्यू. बुश आणि जो बायडेन या राष्ट्राध्यक्षांनी इराण युद्धाची योजना फेटाळली होती असे म्हटले आहे. त्यांच्या मते, इस्रायलने या युद्धाची खरी उद्दिष्टे लपवून दिशाभूल करणारी माहिती ट्रम्प यांना पुरवली आहे. याची अत्यंत मोठी किंमत चुकवावी लागू शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

  • 23 Apr 2026 02:30 PM (IST)

    23 Apr 2026 02:30 PM (IST)

    होर्मुझमधील माइन्स हटवण्यासाठी ६ महिने लागणार

    इराणने अमेरिका-इस्रायल आणि त्यांना मदत करणाऱ्या देशांच्या जहाजांना रोखण्यासाठी स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये नौदल माइन्स पेरले होते. यामुळे या मार्गावर जाणाऱ्या जहाजांना मोठा धोका निर्माण झाला होता. दरम्यान हे माइन्स काढून टाकण्यासाठी आता सहा महिने लागू शकतात असा अंदाज अमेरिकेच्या पेंटागॉनने व्यक्त केला आहे. यामुळे युद्धबंदीनंतरही या मार्गावर धोका कायम आहे.

     

     

  • 23 Apr 2026 02:25 PM (IST)

    23 Apr 2026 02:25 PM (IST)

    इराण संघर्षादरम्यान शेअर बाजारात वाढ

    सध्या अमेरिका इराण संघर्ष तीव्र चिघळला आहे. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र इराणने याला प्रतिसाद दिलेलाय नसून होर्मुझमध्ये नाकेबंदी सुरुच ठेवली आहे. असे असूनही तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलवर रेंगाळले आहेत. अर्थतज्ज्ञांनी जागतिक मंदीचा इशारा देण्यात आला आहे. परंतु शेअर बाजारांत मात्र तेजी सुरु आहे. अमेरिकेत S&P 500 निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाला, तर आशियाई बाजारांनीही नवीन रेकॉर्ड रचले आहेत. संघर्षामुळे उर्जा आणि संरक्षण क्षेत्राील कंपन्यांचा सहभाग वाढला असून शेअर्सच्या किमती वाढल्या आहेत. मोठ्या कॉर्पोरेशनवर कोणताही परिणाम झालेला नाही, कारण वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकण्यात आला आहे. तसेच तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतवणूक वाढत आहे. परिणामी बाजारात तेजी निर्माण झाली आहे.

     

     

  • 23 Apr 2026 02:20 PM (IST)

    23 Apr 2026 02:20 PM (IST)

    पाकिस्तानचे अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेसाठी प्रयत्न

    अमेरिका इराण तणाव पुन्हा चिघळला असून पाकिस्तान दोन्ही देशांना चर्चेच्या एका टेबलावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. यांच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि अमेरिकेच्या राजदूत नताली बेकर यांची एक बैठक झाली आहे. या बैठकीत मध्यपूर्वेतील परिस्थिती आणि दोन्ही देशांधील शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे आयोजन इस्लामाबद येथे आयोजित करण्याची शक्यतेवर चर्चा करण्यात आली आहे.

     

  • 23 Apr 2026 02:15 PM (IST)

    23 Apr 2026 02:15 PM (IST)

    शरद पवारांसाठी पार्थ पवारांचे खास ट्विट

    बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. “या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. मात्र, दुर्दैवाने प्रकृती बिघडल्याने मला मुंबईतील रुग्णालयात दाखल व्हावे लागले.” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी उपचार सुरू असल्याने आणि सक्तीची विश्रांती आवश्यक असल्यामुळे मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदा ते बारामतीत येऊन मतदान करू शकणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

    बारामतीमध्ये एकीकडे पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असताना, दुसरीकडे दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर ट्विट करत शरद यांना लवकर बरे व्हा, असे ट्विट करत त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

    Get well soon, Ajoba! Wishing you strength, comfort, and a speedy recovery. We are all praying for your good health 🙏@PawarSpeaks

    — Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 22, 2026

  • 23 Apr 2026 02:10 PM (IST)

    23 Apr 2026 02:10 PM (IST)

    अमेरिका-इराण युद्धातून परतला महाराष्ट्राचा सुपुत्र

    आजूबाजूला आकाशातून उडणारी युद्धातील मिसाईल्स…आजूबाजूच्या जहाजांवर होणारे हल्ले… आकाशातून उडणारे अंतर्गत ड्रोन हल्ले… स्टेट ऑफ हॉरम्यूजमध्ये अनुभवलेला युद्धाचा थरार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण युद्धाच्या थराराचा, कोकणचा सुपुत्र राहुल उसगावकरने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. या सगळ्या मोठ्या जीवघेण्या थरारक मोठ्या बाका प्रसंगांमधून दैव बलवत्तर म्हणून सुखरूप कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील आपल्या गावी आठ दिवसांपूर्वीच परतलेला एका खाजगी कंपनीच्या ऑइल वाहतूक करणाऱ्या जहाजाचा कॅप्टन असलेला कोकणसुपुत्र राहुल उसगावकर यांनी अनुभन सांगितला आहे. इतक्या सगळ्या धोकादायक युद्धजन्य परिस्थितीतून राहुल सुखरूप परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आई-वडील पत्नी यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. वाचा संपूर्ण घटना

     

  • 23 Apr 2026 02:05 PM (IST)

    23 Apr 2026 02:05 PM (IST)

    भारताचा जगाशी संपर्क तुटणार?

    अमेरिका इराण तणाव निवळण्याची काही चिन्ही दिसत नाहीत. एकीकडे ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी युद्धविरामाची घोषणा केली असून शांतता चर्चेचे संकेत दिले आहे. तर दुसरकीडे इराणने दिलेल्या धमकीमुळे जगावर मोठे संकट ओढवण्याची चिंता निर्माण झाली आहे. जगाच्या डिजिटल अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे भारतासह संपूर्ण जगाचा एकमेकांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 23 Apr 2026 02:00 PM (IST)

    23 Apr 2026 02:00 PM (IST)

    महासत्तेचा ‘उलटा’ प्रवास! ट्रम्प यांनी भारताला म्हटले ‘नरक’

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या एका सोशल मीडिया पोस्टने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी ट्रम्प यांनी थेट भारताला ‘नरक’ (Hellhole) संबोधणारा आणि भारतीयांच्या अमेरिकेतील नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आहे. लेखक मायकल सॅव्हेज यांच्या या व्हिडिओला ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने केवळ राजनैतिकच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • 23 Apr 2026 01:55 PM (IST)

    23 Apr 2026 01:55 PM (IST)

    ‘जय पवार आले तर आमचे युगेंद्र पवार तयार!’; रोहित पवारांचे खळबळजनक विधान

    बारामती पोटनिवडणुकीसाठी आज (23 एप्रिल) ला मतदान प्रक्रिया सुरू आहे. ही मतदान प्रक्रिया सुरू असतानाच दिवंगत अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. २०२९ मध्ये बारामतीच्या निवडणुकीतून जय पवार राजकारणात प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. यावर जय पवार यांनी मात्र आपल्याला कार्यकर्ता म्हणून काम करायचे असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • 23 Apr 2026 01:50 PM (IST)

    23 Apr 2026 01:50 PM (IST)

    मोहोळमध्ये श्री नागनाथ महाराज यात्रेदरम्यान पेहरावावरून वाद; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिरवणूक शांततेत

    सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोहोळ येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेदरम्यान पेहरावाच्या कारणावरून दोन गटांत झालेला वाद पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मिटवला. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पालखी मिरवणूक शांततेत पार पडली. सध्या शहरात शांतता असून, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 23 Apr 2026 01:45 PM (IST)

    23 Apr 2026 01:45 PM (IST)

    YouTube वर ऐतिहासिक कामगिरी; Samay Rainaचा “Still Alive” ठरला ग्लोबल हिट कॉमेडी स्पेशल

    लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाने इतिहास रचला आहे. त्याचा नवीन कॉमेडी स्पेशल, “स्टिल अलाइव्ह,” हा यूट्यूबवर जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला कॉमेडी स्पेशल ठरला आहे. “स्टिल अलाइव्ह”ला ५३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले असून, त्याने कॉमेडी विश्वात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. हा दावा स्वतः समय रैनाने केला आहे.

  • 23 Apr 2026 01:40 PM (IST)

    23 Apr 2026 01:40 PM (IST)

    OTTचा ‘फॅमिली मॅन’ आता पुन्हा मोठ्या पडद्यावर, ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

    दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह यांनी यापूर्वी अनेक वेगळ्या धाटणीचे आणि प्रयोगशील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. आता ते आणखी एका रोचक आणि सस्पेन्सने भरलेल्या प्रोजेक्टसह परत येण्यासाठी सज्ज झाले आहेत.ताज्या अपडेटनुसार, त्यांच्या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर्स समोर आले असून, त्यामध्ये कथानकाबाबत एक गूढ आणि रहस्यमय वातावरण दिसून येत आहे. ‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ असे या चित्रपटाचे नाव असून, या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • 23 Apr 2026 01:35 PM (IST)

    23 Apr 2026 01:35 PM (IST)

    गजराज आले मतदानाला! झाडग्राममध्ये मतदान केंद्रात थेट महाकाय हत्तीची एन्ट्री

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांसाठी मतदान पार पडत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विचित्र घटना घडत आहेत. मुर्शिदाबादच्या नवादा विधानसभा मतदारसंघात तणाव निर्माण झाला होता. आता मात्र झाडग्राममध्ये विचित्र घटना घडली. मतदानकेंद्रावर थेट गजराजाचे आगमन झाल्याने मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ देखील व्हायरल (Viral News) झाला आहे.

  • 23 Apr 2026 01:25 PM (IST)

    23 Apr 2026 01:25 PM (IST)

    IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड

    IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजाने लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात खळबळ उडवून दिली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर, जडेजाने राजस्थानची सूत्रे हाती घेतली आणि २९ चेंडूंमध्ये ४३ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत जडेजाने दोन चौकार आणि एक षटकारही मारला. त्याच्या दमदार कामगिरीमुळे राजस्थानने निर्धारित २० षटकांत १५९ धावा केल्या. त्यानंतर, जेव्हा त्याची गोलंदाजीची पाळी आली, तेव्हा त्याने निकोलस पूरनची महत्त्वपूर्ण विकेट घेऊन राजस्थानचा विजय निश्चित केला.

  • 23 Apr 2026 01:15 PM (IST)

    23 Apr 2026 01:15 PM (IST)

    बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार किती मतांनी निवडून होणार? रोहित पवार म्हणाले

    अजित पवारांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार ही निवडणूक लढत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे आहे. सर्व मोठ्या पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असल्याने त्या निवडून येणार हे निश्चित आहे. मात्र काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला असून, रोहित पवारांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

  • 23 Apr 2026 01:07 PM (IST)

    23 Apr 2026 01:07 PM (IST)

    पिवळ्या पाण्यामुळे १६ ग्रामस्थ आजारी

    खेड तालुक्यातील पिरलोटे येथील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी येथील नळांना रासायनिक सांडपाणी मिश्रित पिवळ्या रंगाचे पाणी आल्याने ग्रामस्थांच्या संताप अनावर झाला. यामुळे १६ जणांची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी पिरलोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. या संतापजनक प्रकारानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत जाब विचारला. रासायनिक सांडपाणी हे एका कंपनीतीलच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला, त्या कंपनी व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांनाही ग्रामस्थांनी घटनास्थळी बोलावून घेत जाब विचारला. सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये जाणारी वाहिनी गेले तीन-चार महिने तुंबली असून, सतत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कळवून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं स्पष्टीकरण कंपनीच्या व्यवस्थापनाने दिलं. यावर आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

  • 23 Apr 2026 01:06 PM (IST)

    23 Apr 2026 01:06 PM (IST)

    CH.SAMBHAJINAGAR : छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा वाढता धोका

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून, उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र होत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.चिकलठाणा येथील मिनी घाटीसह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी विशेष शीतकक्ष तयार करण्यात आले आहेत. तसेच घाटी रुग्णालयात अतिदक्षता विभाग आणि विशेष अतिदक्षता विभागात स्वतंत्र खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.दरम्यान, नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

  • 23 Apr 2026 01:05 PM (IST)

    23 Apr 2026 01:05 PM (IST)

    महिला आरक्षणावरून भाजपवर काँग्रेसची जोरदार टीका

    महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद पुन्हा पेटताना दिसत आहे. काँग्रेसकडून राज्यभर पत्रकार परिषदांचा धडाका सुरू असून, वर्ध्यातही काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. वर्धेच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नामदेव किरसान यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर खोटा कांगावा करत असल्याचा आरोप केला. भाजपच्या महिला विरोधी धोरणाचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस जिल्हा स्तरावर पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 पासून देशात भाजपची सत्ता असूनही महिला आरक्षण विधेयकाबाबत ठोस पावले उचलली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हे काय भजे खात आहेत का, की विटी-दांडू खेळत आहेत?” असा टोला त्यांनी भाजपला लगावला. काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत त्यांनी नमूद केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसने महिला आरक्षण लागू केले. 2010 मध्ये राज्यसभेत 33 टक्के आरक्षण विधेयक काँग्रेसने मंजूर केले, मात्र लोकसभेत बहुमत नसल्याने ते पुढे जाऊ शकले नाही. 2014 मध्ये भाजपला लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतरही त्यांनी हे विधेयक का पारित केले नाही, असा प्रश्नही किरसान यांनी उपस्थित केला. भाजपवर खोटारडेपणाचा आरोप करत त्यांनी पक्षाचा इतिहास महिला विरोधी असल्याचे म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणावर चर्चेचे आवाहन केले असून, “ते जिथे बोलावतील तिथे चर्चा करण्यास मी तयार आहे,” असे किरसान यांनी स्पष्ट केले. कोणत्याही वाद-विवादाला काँग्रेस तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  • 23 Apr 2026 01:02 PM (IST)

    23 Apr 2026 01:02 PM (IST)

    प्रभाग समिती अध्यक्षपद निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

    पुणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपचे वर्चस्व दिसून आले. १५ प्रभाग समिती अध्यक्षपदांपैकी भाजपकडे १३ तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला प्रत्येकी १ अध्यक्षपद मिळाले आहे. १३ ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिकेच्या सभागृहाप्रमाणेच प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महिलांचा आवाज घुमणार आहे.

  • 23 Apr 2026 01:01 PM (IST)

    23 Apr 2026 01:01 PM (IST)

    बारामती पोटनिवडणूक ही मतदारांसाठी भावना व्यक्त करण्याची संधी; संजय राऊत  

    मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी ही निवडणूक अत्यंत भावनिक असल्याचे म्हटले आहे. जरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले असले, तरी २३ उमेदवार रिंगणात असल्याने ती आता मतदारांच्या हाती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

    अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक बारामतीकरांसाठी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग बनली असल्याचे राऊत यांनी नमूद केले.महायुतीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र तांत्रिक कारणास्तव आणि उमेदवारांच्या संख्येमुळे ते शक्य झाले नाही. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांची सक्रिय उपस्थिती आणि महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 23 Apr 2026 01:01 PM (IST)

    23 Apr 2026 01:01 PM (IST)

    पनवेलमध्ये प्रदूषण रोखणाऱ्या यंत्रणा फक्त कागदावरचं

    पनवेल महानगरपालिका क्षेत्रात काही दिवसांपूर्वी बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनीप्रदूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण ३८ बांधकाम स्थळांवर कारवाई पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली आहे. तर शेकडो बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावली आहे. मात्र, कारवाईपासून बचावासाठी ठेवलेल्या यंत्रणा आता शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. बहुतांश ठिकाणी बसवलेले प्रदूषण रोखणारे यंत्र बंद पडले आहेत तसेच पाणी फवारण्याच्या मशीन बंद आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली होत असून पालिका प्रशासनाकडून कारवाईचा फक्त दिखावा केला जातो का ? जर कारवाई करून सुद्धा बांधकाम व्यावसायिक ऐकत नसतील तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर पनवेल महानगरपालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी ३४ बांधकाम स्थळांवर कारवाई केली होती. तर १६६ बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बजावली होती. त्यानुसार, बांधकाम साहित्य खुले न ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी पाणी शिंपडणे, ब्लास्टिंग करताना मानक कार्यपद्धतीचे (SOP) पालन करणे, ग्रीन नेट, स्प्रिंकलर लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी कागदोपत्री सर्व यंत्रणा ठेवून जबाबदारी झटकली आहे.

  • 23 Apr 2026 12:50 PM (IST)

    23 Apr 2026 12:50 PM (IST)

    चुलत्यानेच केला पुतणीचा विनयभंग

    पुण्याच्या मध्यभागात चुलत्यानेच पुतणीचा विनयभंग करून धमकावल्याची गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चुलत्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे. त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह पोक्सो कायद्यांतर्गत कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी चुलत्याला पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Marathi breaking news by election updates live updates marathi top news international news national news crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • navarashtra breaking news
  • Navarashtra Live Updates

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जींनाच ‘तृणमूल’च्या अध्यक्षपदावरून हटवले
1

Top Marathi News Today Live : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जींनाच ‘तृणमूल’च्या अध्यक्षपदावरून हटवले

Top Marathi News Today Live :शिंदेसेनेत जाण्याबाबत अद्यापही माझा निर्णय झालेला नाही : ओमराजे
2

Top Marathi News Today Live :शिंदेसेनेत जाण्याबाबत अद्यापही माझा निर्णय झालेला नाही : ओमराजे

Top Marathi News Today Live : मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक;  6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा
3

Top Marathi News Today Live : मातोश्रीवर ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक; 6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही सविस्तर चर्चा

Top Marathi News Today Live :नाशिक विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान, परभणी विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान
4

Top Marathi News Today Live :नाशिक विधान परिषदेसाठी 100 टक्के मतदान, परभणी विधान परिषदेसाठी 99.78 टक्के मतदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.