शस्त्रसंधी वाढवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाची खिल्ली उडवणारा त्यांचा AI Video इराणमध्ये व्हायरल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Donald Trump AI video Iran viral : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष (US-Israel Iran War) आता केवळ समुद्रात किंवा जमिनीवर मर्यादित राहिलेला नाही, तर तो आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) माध्यमातून सोशल मीडियाच्या रणांगणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर इराणसोबत शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय घेतला खरा, पण इराणने या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी त्याची चक्क खिल्ली उडवली आहे. इराणमध्ये सध्या एक ४५ सेकंदांचा एआय व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, त्याने वॉशिंग्टनपासून ते तेहरानपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी व्हान्स एका टेबलावर बसून इराणी शिष्टमंडळाची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांचे एआय व्यंगचित्र त्यांच्या सोशल मीडियावर ‘इराणसोबतची चर्चा उत्तम सुरू आहे’ असे टाईप करताना दिसते. मात्र, गंमत अशी की, तासनतास वाट पाहूनही इराणकडून कोणीही येत नाही. शेवटी वैतागलेले ट्रम्प रिकाम्या खुर्च्यांकडे पाहून ओरडतात आणि इराणवर मोठ्या हल्ल्याची धमकी देतात. याच वेळी एक सहाय्यक त्यांना छोटी चिठ्ठी देतो, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिले असते “Trump, Shut Up!” (ट्रम्प, गप्प बसा!). व्हिडिओच्या शेवटी ट्रम्प हसत हसत पाकिस्तानच्या नावाने शस्त्रसंधी जाहीर करून खोलीबाहेर पडताना दिसतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: अमेरिकन लष्करप्रमुखांनंतर नौदलप्रमुखांचीही पडली विकेट; Andrew Hug यांच्या ‘या’ VIRAL VIDEOमध्ये ‘US’ची गुपितं उघड
या प्रकरणाला अधिक गांभीर्य तेव्हा आले जेव्हा भारतातील हैदराबाद येथील इराणी वाणिज्य दूतावासाने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. यातून इराणला जागतिक स्तरावर हा संदेश द्यायचा आहे की, अमेरिकेने केलेली शस्त्रसंधीची घोषणा केवळ एक देखावा असून त्यात कोणतेही गांभीर्य नाही. या व्हिडिओमुळे दोन्ही देशांमधील आधीच ताणलेले संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
How was the ceasefire extended?
The video is getting viral in Iran. pic.twitter.com/UCldpWjZMO — Iran In Hyderabad (@IraninHyderabad) April 22, 2026
credit – social media and Twitter
या व्हायरल व्हिडिओच्या गदारोळात इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रवक्ते इस्माईल बाकी यांनी सांगितले की, इराणने चर्चेसाठी नेहमीच सकारात्मक पाऊल उचलले आहे, परंतु अमेरिकेची भूमिका धरसोडीची राहिली आहे. अमेरिकेच्या याच बेजबाबदारपणामुळे शांतता चर्चेत अडथळे येत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेत इराण सहभागी होणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Post : महासत्तेचा ‘उलटा’ प्रवास! ट्रम्प यांनी भारताला म्हटले ‘नरक’; ‘ही’ एक पोस्ट आणि संपूर्ण इंटरनेटवर ट्रोलिंगचा स्फोट
हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी नसून तो एक प्रभावी ‘प्रोपोगंडा’ शस्त्र म्हणून वापरला जात आहे. अनेक नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची खिल्ली उडवत आहेत. एका बाजूला क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा मारा सुरू असताना, दुसरीकडे एआय व्हिडिओच्या माध्यमातून चाललेले हे ‘सायकोलॉजिकल वॉरफेअर’ जागतिक सुरक्षेसाठी नवीन आव्हान ठरत आहे. आता ट्रम्प प्रशासन या अपमानास्पद व्हिडिओला कसे उत्तर देते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
Ans: व्हिडिओच्या शेवटी ट्रम्प यांना एका चिठ्ठीद्वारे "Shut Up" (गप्प बसा) असा संदेश देऊन त्यांच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाची थट्टा करण्यात आली आहे.
Ans: हा व्हिडिओ हैदराबादमधील इराणी वाणिज्य दूतावासाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केल्यामुळे राजनैतिक तणाव वाढला आहे.
Ans: इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही; अमेरिकेच्या गांभीर्यावर त्यांचा सहभाग अवलंबून असेल असे त्यांनी म्हटले आहे.






