
Top Marathi News Today Live : सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
Marathi Breaking News Updates : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, पक्षांतर्गत बंडाला एक मोठे वळण लागले. उलुबेरिया पूर्वचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्याची आणि ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची घोषणा केली. हा निर्णय बंडखोर गटाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. या नेत्यांनी नवीन संघटनात्मक समितीच्या स्थापनेनंतर लगेचच एक ठराव मंजूर केला.
बंडखोर गटाने ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची नव्याने स्थापन झालेल्या संघटनात्मक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ऋतब्रता गटाची ही बैठक न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये झाली, ज्यात बंडखोर आमदार आणि कोलकाता महानगरपालिकेसह तीन जिल्ह्यांतील ७० ममता बॅनर्जी यांच्या जागी हावडा सेंट्रलचे आमदार अरूप रॉय यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. अभिषेक बॅनर्जी यांच्या निलंबनानंतर, तृणमूल काँग्रेसचे खरे नेतृत्व आणि वैचारिक प्रभाव कोणाकडे आहे, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.
23 Jun 2026 06:00 PM (IST)
मुंबई : राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ व्यापार व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अमली पदार्थ विक्री व सेवनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी सदस्य सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, अमीन पटेल, योगेश सागर आणि संजय क्षीरसागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
23 Jun 2026 05:50 PM (IST)
NEET UG Low Score Options 2026: २१ जून रोजी नीट (NEET UG २०२६) पुनर्परीक्षा कडक सुरक्षा व्यवस्थेत यशस्वीरीत्या पार पडली. आता लाखो विद्यार्थी आपल्या निकालाची आणि समुपदेशन प्रक्रियेची वाट पाहत आहेत. दरम्यान, जर तुमचा स्कोअर अपेक्षेपेक्षा कमी येणार असेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी अजूनही अनेक संधी उपलब्ध आहेत.
23 Jun 2026 05:45 PM (IST)
War Deaths : मध्यपूर्वेतील अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष सध्या काही काळासाठी निवळला आहे. परंतु या युद्धात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी या विनाशकारी युद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेकडो सामान्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. धक्कादायक म्हणजे या युद्धाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे. खाडी देशांतील अनेक भारतीय कामगारांनी आपले प्राण गमावले असल्याचे काही अहवालांमध्ये सागंण्यात आले आहे.
23 Jun 2026 05:30 PM (IST)
शहरांमध्ये विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत प्रत्येकालाच आपल्या दैनंदिन प्रवासासाठी विश्वासू दुचाकीची गरज असते. आणि तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर, नवीन कोरी गाडी घेण्याऐवजी ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सेकेंड हॅंड गाड्यांचा पर्याय सगळ्यात योग्य ठरतो. अशा गाड्या शोधणाऱ्यांसाठी पुण्यातील ‘नाना पेठ’ आणि लगतचे रास्ता पेठ हे सर्वात मोठे आणि हक्काचे ठिकाण ठरेल. ऑटोमोबाईल विश्वात या मार्केटचा दबदबा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.
23 Jun 2026 05:20 PM (IST)
Jio Share Impact: शेअर बाजार हा एक जोखमीच्या अधीन असल्याचं वेळोवेळी आपल्याला सांगितलं जातं. पण कोणता शेअर कशी कामगिरी करेल आणि कधी कोणाचं नशीब पलटेल सांगता येत नाही. अशाच एका शेअरने आश्चर्यकारक कामगिरी करून गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. मुकेश अंबानींची कंपनी, जिओ प्लॅटफॉर्म्स, जी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत आहे. नेमकं काय घडतंय समजून घेऊयात.
23 Jun 2026 05:10 PM (IST)
Jio Share Impact: शेअर बाजार हा एक जोखमीच्या अधीन असल्याचं वेळोवेळी आपल्याला सांगितलं जातं. पण कोणता शेअर कशी कामगिरी करेल आणि कधी कोणाचं नशीब पलटेल सांगता येत नाही. अशाच एका शेअरने आश्चर्यकारक कामगिरी करून गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. मुकेश अंबानींची कंपनी, जिओ प्लॅटफॉर्म्स, जी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव करत आहे. नेमकं काय घडतंय समजून घेऊयात.
23 Jun 2026 05:00 PM (IST)
मुंबई: किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय नामांतरासंदर्भात आज विधानपरिषदेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. लोढा यांनी स्पष्टपणे नमूद केले की, ब्रिटिश सत्ताकाळ हा भारताच्या शोषणाचा काळ होता. “किंग एडवर्ड हा भारतासाठी गौरवाचा विषय नसून, तो गुलामगिरीच्या काळाचे प्रतीक आहे,”.
23 Jun 2026 04:57 PM (IST)
Share Market Crash : शेअर बाजारात कधी कोणत्या कारणामुळे उलथापालथ होईल हे सांगता येत नाही. आजचंच बघा ना… वॉल स्ट्रीटवरील टेक स्टॉक्सची झालेली विक्री आणि त्यामुळे दक्षिण कोरियाच्या बाजारात झालेली मोठी घसरण, याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होताना दिसून आला. बाजारात इतकी मोठी विक्री झाली की, बीएसई सेन्सेक्स अंदाजे ६००-७०० अंकांनी घसरला. एनएसई निफ्टी ५० सुद्धा २३,९०० च्या पातळीखाली घसरला. पण नेमकी कारणं काय आहेत? समजून घेऊयात
23 Jun 2026 04:47 PM (IST)
फुटबॉलच्या इतिहासात कित्येक खेळाडू आले आणि गेले ज्यांनी आपल्या कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली पण काही नावे अशी असतात जी केवळ एक खेळाडू म्हणून नाही तर गरिबी, पराकोटीचा संघर्ष आणि न डगमगणाऱ्या जिद्दीचे प्रतीक म्हणून अजरामर होतात. आज जगातील सर्वात श्रीमंत, यशस्वी आणि अफाट लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला असाच एक महान चेहरा म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो ज्याला जग ‘CR7’ म्हणून ओळखतं. आज कोट्यवधी डॉलर्सच्या साम्राज्यात राहणाऱ्या रोनाल्डोचा इथपर्यंत पोहोचण्याचा इतिहास अत्यंत वाईट परिस्थितीतून आणि थरारक राहिलेला आहे. ज्या मुलाला जन्माआधीच या जगात नाकारण्याचा प्रयत्न झाला होता, त्याने आपल्या कष्टाच्या जोरावर संपूर्ण जगाला स्वतःच्या पायावर कसं झुकवलं, ही आहे रोनाल्डोची गोष्ट. वाचा सविस्तर...
23 Jun 2026 04:42 PM (IST)
NEET UG Re-Exam: १८ जून २०२६ रोजी नीट (NEET UG) परीक्षा पुन्हा घेण्यात आली, तेव्हा पेपर फुटीच्या जुन्या वादांमुळे यंत्रणा अतिशय कडक असेल असा दावा ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) केला होता. मात्र, परीक्षेच्या दिवशीच बिहारपासून ते हैदराबाद आणि जयपूरमधील गैरप्रकारांपर्यंत अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. वाचा सविस्तर...
23 Jun 2026 04:37 PM (IST)
India Vs England T20 Series: लवकरच भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 सिरिज सुरू होणार आहे. 1 जुलै ते 11 जुलै या दरम्यान ही सिरिज खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर इंग्लंडने देखील भारताविरुद्ध टी 20 सिरिज खेळण्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. वाचा सविस्तर...
23 Jun 2026 04:32 PM (IST)
सासवड/संभाजी महामुनी : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक मोठी कारवाई केली आहे. सोमवारी २२ जून रोजी सासवड येथून जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट याप्रमाणे दाखल असलेल्या शिरूर, सासवड, जेजूरी या ३ पोलीस स्टेशनच्या गुन्हयांमध्ये फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेंडकर (वय २८ वर्षे रा. चांबळी ता. पुरंदर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. वाचा सविस्तर...
23 Jun 2026 04:27 PM (IST)
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला काल (सोमवार, 22 जून) सुरुवात झाली. राज्यात आधीपासूनच राजकीय वातावरण गरम असतानाच अधिवेशन कार्यकाळात अधिक घडामोडी घडताना दिसत आहेत. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजचा दिवस एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज अधिवेशनात दिवंगत गायिका अशा भोसले आणि दीनदयाळ उपाध्याय यांचा शोकप्रस्ताव मांडला. मात्र शोकप्रस्ताव मांडताना कागदावर लिकिलेले वाक्य वाचताना नार्वेकर अडखळत होते. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आक्रमक झाले असून त्यांनी सोशल मीडिया पोस्टमधून नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर...
23 Jun 2026 04:00 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज विधिमंडळात केली. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:55 PM (IST)
Vidarbha Monsoon : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या मान्सूनची अखेर विदर्भात एंट्री झाली आहे.विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तरीही हवामान विभागाने शेतकऱ्यांना तातडीने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:50 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ऐतिहासिक अवचितगडावर इतिहासाचा एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला आहे. सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत, तब्बल ६०० ते ७०० फूट खोल दरीत शतकांपासून दडलेल्या दोन शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढण्यात इतिहासप्रेमींना यश आले आहे. शिवशंभू प्रतिष्ठान आणि सह्याद्री वन्यजीव रक्षक यांच्या संयुक्त पथकाने ही अत्यंत खडतर आणि थरारक मोहीम फत्ते केली असून यामुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली आहे. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:45 PM (IST)
सुझुकी मोटर कॉर्पोरेशन, जपानची दुचाकी उपकंपनी असलेल्या सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएमआयपीएल) यांनी पुण्यात ‘बर्गमन हँगआउट परेड’चे आयोजन करून स्कूटरप्रेमींना वेगळाच रायडिंग अनुभव दिला. या उपक्रमात बर्गमन आणि एव्हेनिस स्कूटरचे मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डिझाइन, आरामदायी प्रवास आणि उत्कृष्ट कामगिरी यांचा अनुभव एकत्रितपणे साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या परेडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विशेष राइडमध्ये सहभागी झालेल्या ग्राहकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून स्कूटर रॅली काढत आकर्षक उपस्थिती दर्शवली. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष वेधले गेलेच, शिवाय सुझुकीच्या वाढत्या ग्राहक समुदायालाही अधिक बळ मिळाले. स्कूटरप्रेमींना एकमेकांशी संवाद साधण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि ब्रँडशी अधिक जवळीक निर्माण करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाली. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:40 PM (IST)
PFRDA Pension Sahayak: निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS नियामक पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने एक अत्यंक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेन्शनधारकांसाठी सोयीचं व्हावं यासाठी ‘PFRDA पेन्शन सहाय्यक’ नावाचे एक AI-आधारित तक्रार निवारण व्यासपीठ सुरू केलं आहे. हे पूर्वीच्या केंद्रीय तक्रार व्यवस्थापन प्रणालीची CGMS च्या जागी येत आहे. पेन्शनधारकांना तक्रारी नोंदवणे, त्यांच्या स्थितीचा मागोवा घेणे आणि वेळेवर निराकरण मिळवणे सोपे करणे, हा याचा उद्देश आहे. नेमकं कसं काम करतं हे व्यासपीठ समजून घेऊयात.
23 Jun 2026 03:35 PM (IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 'कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएट' (CUET UG) २०२६ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार आता cuet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन त्यांचे गुणपत्रक (स्कोरकार्ड) पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक (ॲप्लिकेशन नंबर) आणि पासवर्ड वापरून लॉग-इन करावे लागेल.
23 Jun 2026 03:30 PM (IST)
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर जंगलात बलात्कार करून तिळाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अटक केली आहे. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:25 PM (IST)
India Vs Ireland T20 Series: लवकरच भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात टी 20 सिरिज सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघ आणि आयर्लंडचा संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न असणाऱ्या खेळाडूचे टीम इंडियाची जर्सी घालण्याचे स्वप्न असते. वैभव सूर्यवंशीचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानंतर तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Ladies & Gentlemen
The moment the nation has been waiting for has arrived!
Vaibhav Sooryavanshi in #TeamIndia jersey. Witness this incredibly special moment ❤️ pic.twitter.com/sUUytFMPVw
— BCCI (@BCCI) June 23, 2026
23 Jun 2026 03:20 PM (IST)
कर्जत : कर्जत तालुक्यातील जमिनीवर होऊ घातलेल्या टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा जलविद्युत प्रकल्प व्हावा यासाठी सरकार स्तरावरून सर्व मदत केली जात आहे. त्यामुळे आदिवासी लोकांच्या संमतीविना आदिवासी लोकांच्या मालकीच्या दळी जमिनीतून अवजड मशिनरी नेण्यासाठी रस्ते बनवले आहेत. दरम्यान झाडे तोडून आणि मालकीच्या दळी जमिनीतून रस्ते बनवले गेल्याने टोरंट कंपनी कोणालाही जुमानत नसल्याचे दिसून येत असून दळी भूखंड धारक आक्रमक झाले आहेत. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:15 PM (IST)
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या पालकांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेतील रक्कम मुदतपूर्तीपूर्वीही विशिष्ट अटींवर काढता येते. मात्र, यासाठी शासनाने काही नियम निश्चित केले आहेत. सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा ती दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर खात्यातील शिल्लक रकमेपैकी ५० टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस खात्यात असलेल्या शिल्लक रकमेनुसार निश्चित केली जाते. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:10 PM (IST)
Honor Smartphone Launched: टेक कंपनी हॉनरने चीनमध्ये आणखी एक नवीन दमदार 5G फोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Honor X80 Pro Max या नावाने लाँच केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Honor X70 Pro Max लाँच केला होता. यानंतर आता आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनमध्ये 11,000mAh बॅटरी आणि 10,000 निट्स ब्राईटनेस आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही ऑनर फोनमधील आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. हा हँडसेट कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. वाचा सविस्तर
23 Jun 2026 03:05 PM (IST)
अमेरिका-इराणमध्ये युद्धबंदीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यानंतर दोन्ही देशांत शांतता चर्चेला सुरुवात करण्यात आली असून पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली आहे. यामुळे लवकरच होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग खुली होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या ड्युटी ड्रॉबॅक निर्णयामुळे भारताच्या बासमती निर्यातीला फटका बसण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
23 Jun 2026 02:59 PM (IST)
निधी मिळत नसल्यानं शिंदेंसोबत जात असल्याचा आरोप फुटीर खासदारांनी केला होता. मात्र शिंदेंसोबत गेलेल्या या खासदारांची पोलखोल झालीय. एम्पॉवर्ड इंडियन या वेबसाईटवरील माहितीचा आधार घेऊन या खासदारांना मिळालेल्या निधीची माहिती पोस्ट केली आहे. 2 वर्षांत मिळालेल्या निधीची माहिती पोस्ट करण्यात आलीय.
23 Jun 2026 02:50 PM (IST)
मुंबई, ठाण्यात पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे. ठाण्यात २० टक्के पाणीकपात करण्यात आली असून काही ठिकाणी ४८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट कमी करण्यासाठी मुंबई महापालिका सांडपाण्यापासून पेयजल, कृत्रिम पाऊस अशा योजना राबवण्याबाबत विचार करत आहे. सांडपाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करताना यंत्रणेत त्रुटी आढळण्यास आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत या योजनेला जोरदार विरोध होत आहे. पावसाच्या विलंबामुळे पाण्याचा पेच निर्माण झाला आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर 'एमआयडीसी'ने लागू केलेल्या २० टक्के पाणीकपातीचा फटका ठाण्याला बसला आहे.
23 Jun 2026 02:41 PM (IST)
अमरावतीच्या तिवसा इथून एक धक्कादायक घटना समोर आलीये. कौटुंबिक वादातून मुलगा आणि सुनेला कारने चिरडण्याचा प्रयत्न केला गेलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झालीये. याप्रकरणी सुनेने सास-याविरोधात तक्रार दाखल केलीये. तर वडिलांनीही मुलाविरोधात शिवीगाळ करत दगड मारल्याची तक्रार दिलीये.
23 Jun 2026 02:31 PM (IST)
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी विधानसभेत मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. आमदार आदित्य ठाकरेंसह जयंत पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवर यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
23 Jun 2026 02:22 PM (IST)
विधानसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सभागृहात दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली. झटका बसल्याने मानसिक संतुलन बिघडल्याची टीका त्यांनी केली.
23 Jun 2026 02:10 PM (IST)
राज्यात लोडशेडिंग केलेले नाही, उलट विक्रमी 32,000 मेगावॅट विजेचा पुरवठा केला असून, पुढील 5 वर्षात ही क्षमता 45,000 मेगावॅटपर्यंत वाढवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
23 Jun 2026 02:00 PM (IST)
कोरोना महामारीपेक्षाही मोटे संकट भारतावर येण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराच्या तापमानाच प्रचंड वाढ झाली आहे. एल निनोचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे नासाने सांगितले आहे. नासा आणि अमेरिकेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सेंटिनेल-६ मायकेल फ्रेलिच या उपग्रहाने समुद्राच्या पृष्ठभागावरील वाढत्या उष्णता आणि समुद्रसपाटीतील असमान्य वाढ नोंदवली आहे. यामुळे एल निनो अधिक सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
23 Jun 2026 01:55 PM (IST)
“आपण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे म्हणवतो. त्यामुळे आपली भूमिका केवळ एकाच बाजूने असून चालणार नाही. केवळ विशिष्ट धर्माचे लोक शोधून त्यांना मारणे म्हणजे हिंदुत्व नाही, तर माता-भगिनींची छेड काढणारा समोरचा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला, तरी त्याला तिथेच चोप दिला पाहिजे,” असे रोखठोक प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. शिर्डी येथे आयोजित ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’त बोलताना सुजय विखे यांनी आपल्या भाषणातून थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे आमदार संग्राम जगताप यांचे जाहीरपणे कान टोचले.
23 Jun 2026 01:50 PM (IST)
लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या आठवड्यात बॅन करण्यात आलेले टेलिग्राम आता पुन्हा एकदा सुरु झाले आहे. अखेर आता भारतात टेलिग्रामवरील बंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरवर देखील टेलिग्राम पुन्हा एकदा दिसू लागले आहे. तसेच जर तुमच्या फोनमध्ये टेलिग्राम अॅप उपलब्ध नसेल तर तुम्ही आता हा अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड देखील करू शकता. टेलिग्रामवरील बंदी हटवण्यात आली असली तरी देखील अद्याप अॅपमधील एक फीचर सुरु करण्यात आलेले नाही.
23 Jun 2026 01:45 PM (IST)
पुणे शहर आणि जिल्ह्यात सतत वाढणारे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार दिनांक २२ पासून जिल्ह्यातील विविध महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवरील अपघातप्रवण क्षेत्रांची, म्हणजेच ‘ब्लॅक स्पॉट’ची अत्यंत महत्त्वाची संयुक्त पाहणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
23 Jun 2026 01:35 PM (IST)
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोटोची पोज देतांना मोठ्या बिझनेसमनच्या मुलाचा लोहगडावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र ही मृत्यू अपघात नसून हत्या असल्याचे तपासात समोर आलं आहे. तो दरीत पडला नसून त्याला दकळून दिल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे.
23 Jun 2026 01:25 PM (IST)
एलॉन मस्क यांच्या SpaceX या बलाढ्य कंपनीच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात घसरण सुरुच आहे. सोमवारी कंपनीचे शेअर्स जवळपास १६ टक्क्यांनी घसरून १५४.६० डॉलरवर बंद झाले आहे. गेल्या तीन दिवसांत, स्टॉकमध्ये जवळपास 23 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या बाजारमुल्यात जवळपास 600 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
23 Jun 2026 01:15 PM (IST)
‘भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड’ (BEML) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बीईएमएल लिमिटेडने कंत्राटी तत्त्वावर नॉन-एग्जीक्यूटिव्ह (ऑपरेटर) पदांच्या एकूण ३६२ जागांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करून अर्ज मागवले आहेत. बीईएमएल लिमिटेडने जाहीर केलेल्या या ३६२ जागांमध्ये आयटीआय – फिटरच्या १२७, आयटीआय – टर्नरच्या ९३, आयटीआय – वेल्डरच्या ४४, आयटीआय – मशिनिस्टच्या ४० आणि आयटीआय – इलेक्ट्रीशियनच्या ५८ जागांचा समावेश आहे.
23 Jun 2026 01:06 PM (IST)
सोमवारी लखनऊच्या अलीगंजमधील पुरानिया येथे एक दुःखद घटना घडली. एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीत अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशभरातील लोकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. सोनू सूदने या हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेबद्दल सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले. ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली आहेत, त्यांच्याप्रती अभिनेत्याने आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
23 Jun 2026 12:48 PM (IST)
पतीने पत्नीला गुंगीचे औषध पाजल्यानंतर मित्राजवळ सोडले. मित्राने तिला हॉटेलमध्ये नेत अत्याचार केला. त्याचे व्हिडीओ तयार करून धमकावत तिचे वारंवार लैंगिक शोषण केले. विशेष म्हणजे या प्रकरणात दीरासह अन्य एका व्यक्तीने तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आला आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागात विवाहीतेवर अत्याचार करण्यात आला आहे.
23 Jun 2026 12:36 PM (IST)
पावसापासून बचाव करण्यासाठी कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दुचाकीस्वारांना शिवाई बसने धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाऊस सुरू असल्याने पाच ते सहा दुचाकीस्वार कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या शिवाई बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने दुचाकींना जोरदार धडक दिली. यातील एक दुचाकी थेट बसखाली अडकली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमी तिघांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
23 Jun 2026 12:24 PM (IST)
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (२१ जून) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, चिखली येथील भाजी मंडई रोड व साने चौक येथे घडली आहे. याबाबत विनायक उर्फ बाबू राजू ननावरे (वय२४, सुदर्शन नगर, साने चौक, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ धाईजे (२१, अंठाजनगर, निगडी), शिवशंकर श्रीमंगल (२०, मेंदळवाडी, चाकण) आणि त्यांच्या इतर दोन अनोळखी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिद्धार्थ आणि शिवशंकर या दोघांना अटक केली आहे.
23 Jun 2026 12:12 PM (IST)
पुण्यातील फुरसुंगी येथील मंतरवाडी फाटा परिसरात एका स्टील व्यावसायिकाच्या दुकानाच्या गेटवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.22) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी संबंधित स्टील व्यावसायिकाच्या दुकानासमोर येत दुकानाच्या गेटवर तीन ते चार राऊंड फायर केले. त्यानंतर गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्यावसायिकाला धमकी देण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणण्यात आला की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
23 Jun 2026 11:50 AM (IST)
कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यात लग्नाच्या अवघ्या 2 दिवस आधी धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय रक्षिता आणि तिचे आई-वडील शिवन्ना व नागरत्ना यांनी विष घेऊन आत्महत्या केली. रक्षिताच्या लग्नाला विरोध करणाऱ्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकामुळे कुटुंब मानसिक तणावात असल्याचा संशय आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून तपास सुरू आहे.
23 Jun 2026 11:40 AM (IST)
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, पक्षांतर्गत बंडाला एक मोठे वळण लागले. उलुबेरिया पूर्वचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्याची आणि ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची घोषणा केली. हा निर्णय बंडखोर गटाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. नेत्यांनी नवीन संघटनात्मक समितीच्या स्थापनेनंतर लगेचच एक ठराव मंजूर केला.
23 Jun 2026 11:30 AM (IST)
धावत्या रेल्वेतून प्रवास करताना महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. यानंतर उपस्थित लोकांनी लगेच याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली ज्यानंतर काही वेळातच महिलेला तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. ही घटना ओडिशातील घडली. राउरकेला-गुणुपूर राज्यारानी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करत असताना महिलेला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या. यानंतर प्रवाशांनी तत्परतेने रेल्वे कर्मचाऱ्यांनी माहिती दिली ज्यानंतर रेल्वेत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. तथापि,वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वीच महिलेने रेल्वेत एका मुलाला जन्म दिला होता तर रुग्णालयात दाखल करताना एम्बुलंसमध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
23 Jun 2026 11:00 AM (IST)
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबई आणि देशातील सर्वात मोठे व्यावसायिक केंद्र आहे. आता, सायन-बीकेसी कनेक्टरमुळे वडाळा आणि बीकेसी दरम्यानचा प्रवास १० ते १५ मिनिटांनी कमी होणार आहे. यामुळे वडाळा आणि त्याच्या आसपासचा परिसर एक प्रमुख केंद्र बनला आहे. सायन-बीकेसी कनेक्टरमुळे अंतर कमी झाल्याने, वडाळा-बीकेसी प्रवासाला १०-१५ मिनिटे लागतील, ज्यामुळे हा परिसर रिअल इस्टेटचे प्रमुख केंद बनला आहे.
23 Jun 2026 10:50 AM (IST)
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल चालकाचा चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना केज परिसरात घडली. या प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक कारण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कदमवाडी फाट्यावरील ‘हॉटेल गावकरी’समोर घडली २० जूनला ही घटना घडली.
23 Jun 2026 10:40 AM (IST)
टेक कंपनी टेक्नोने काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्लिम स्मार्टफोन कंपनीने Tecno Camon Slim या नावाने सादर केला आहे. हा स्मार्टफोन ट्रान्सशन होल्डिंग्स उपकंपनीचे एक नवीन डिव्हाईस आहे. स्मार्टफोनच्या नावावरूनच समजतं की हा एक स्लिम स्मार्टफोन आहे आणि याची जाडी केवळ 6.39 मिमी आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्लिम स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. तसेच नव्या स्मार्टफोनच्या रंग पर्यायांची देखील चर्चा आहे.
23 Jun 2026 10:30 AM (IST)
IANS शी बोलताना शिल्पाने सांगितले की, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत तिची थोडी जुनी विचारसरणी आहे. त्याला महिलांचे धूम्रपान अजिबात आवडत नाही. शिल्पा म्हणते की, स्त्री केवळ धूम्रपान, दारू पिऊन किंवा लहान कपडे घालून बोल्ड किंवा आधुनिक होत नाही. धाडसाचा खरा अर्थ काही औरच आहे.