Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : देशामध्ये अनेक राज्याच्या विधानसभा निवडणूक पार पडल्या आहेत. यामध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे. महाराष्ट्रनंतर दिल्लीमध्ये भाजपला विजयश्री खेचून आणण्यामध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे आता भाजपचे मिशन हे दाक्षिणात्य प्रदेश असणार आहे. भाजप पक्षामध्ये नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. 14 मार्चपूर्वी भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी देशाच्या दक्षिण भागामधून भाजप नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशी, एल मुरुगन, जी किशन रेड्डी, के अन्नामलाई, के ईश्वरप्पा आणि निर्मला सीतारमण यांचा नावाची चर्चा सुरु आहे.
16 Feb 2025 11:06 AM (IST)
बीड हत्या प्रकरणामुळे नवनियुक्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना दिलेली सूचना होती.” असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केला. महायुतीत भाजप इतर पक्षांना बदनाम करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला सपकाळ यांनी लगावला आहे.
16 Feb 2025 10:44 AM (IST)
महाराष्ट्रात सध्या ‘गिलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात GBS चा धोका वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यात मृतांचा आकडा कमी होताना दिसत नाही. सांगलीमध्ये या आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 14 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. जीबीएसची लागण झालेले हे दोन्ही रुग्ण मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते.