• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Add Main Events Date 28 February

Top Marathi News Today Live : योगेश कदम यांच्या असंवेदनशील वक्तव्यावरुन रंगलं राजकारण

Marathi breaking live marathi headlines update Date 28 February : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 28, 2025 | 07:36 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking News Live Updates: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी या गावी जाणाऱ्या तरुणीला फसवून तिच्यावर शिवशाही बसमध्ये अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून त्याची ओळख पटली होती. दोन दिवसानंतरही तो सापडत नसल्यामुळे पुणे पोलिसांवर दवाब होता. मात्र अखेर आरोपी दत्तात्रय खाडे याला शिरुरमधून अटक करण्यात आली आहे.

The liveblog has ended.
  • 28 Feb 2025 06:07 PM (IST)

    28 Feb 2025 06:07 PM (IST)

    सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांन विरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा

    सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांन विरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची युवा पँथरने मागणी केली आहे.  कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सर बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा. या मागणीसाठी सोलापुरातील युवा पँथर संघटनेची सेन्सर बोर्ड विरोधात निदर्शने करण्यात आली. चल हल्ला बोल' चित्रपटात नामदेव ढसाळ यांची कविता अश्लील असल्याचे सांगत कविता काढण्यास सुचवलेल्या सेन्सर बोर्ड विरोधात युवा पँथर आक्रमक झाले आहे. सोलापुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात कोण नामदेव ढसाळ याची माहिती देणारे पोस्टर्स दाखवत घोषणाबाजी केली आहे. नामदेव ढसाळ यांची जाणीवपूर्वक अवहेलना सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • 28 Feb 2025 05:41 PM (IST)

    28 Feb 2025 05:41 PM (IST)

    स्वारगेट अत्याचार प्रकरणाविरोधात कॉंग्रेस आक्रमक

    स्वारगेट बस स्थानकात अत्याचार  प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून अटक करण्यात आली.या आरोपीला लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून काही वेळात आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.यादरम्यान लष्कर पोलीस स्टेशनबाहेर युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी केले. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्री,पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

  • 28 Feb 2025 04:56 PM (IST)

    28 Feb 2025 04:56 PM (IST)

    योगेश कदम यांना का मंत्रिमंडळात ठेवावं? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

    पुण्यातील अत्याचार घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले आहेत. ते म्हणाले की, "महाराष्ट्रतल्या राजकरणाला सध्या लकवा मारला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेतला पाहिजे.  योगेश कदम यांना का मंत्रिमंडळात ठेवावं? हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारावा कदम यांची मंत्रीमंडळातून हक्कालपट्टी करावी," अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

  • 28 Feb 2025 04:40 PM (IST)

    28 Feb 2025 04:40 PM (IST)

    सातारा शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा

    सातारा शहरात ठीक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत असून या कचऱ्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास होत असून सदरचा कचरा तात्काळ उचलावा आणि सातारा शहरात स्वच्छ व्हावे यासाठी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिकाराजे भोसले या आक्रमक झाले असून त्यांनी याबद्दल सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून तात्काळ सातारा शहरातील कचरा हटवावा आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहेत.

  • 28 Feb 2025 04:34 PM (IST)

    28 Feb 2025 04:34 PM (IST)

    ठाकरेंच्या नेत्याची शेतकऱ्याला जबर मारहाण

    जुन्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉडचे चटके देत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली आहे. या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख नवनाथ सुदाम दौड आणि त्यांचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौड या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 28 Feb 2025 04:19 PM (IST)

    28 Feb 2025 04:19 PM (IST)

    अजित पवार यांनी घेतले गुरुद्वारा दर्शन

    महाराष्ट्र राज्याचे अजित पवार यांनी आज नांदेड येथे गुरुद्वारा दर्शन घेतले असून यावेळी गुरुद्वाराच्या वतीने हरदास करण्यात आली आहे व त्यानंतर अजित पवार यांचा गुरुद्वारा प्रथेच्या परंपरेने स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत विक्रम काळे सतीश चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • 28 Feb 2025 03:28 PM (IST)

    28 Feb 2025 03:28 PM (IST)

    साई संस्थानला आता परकीय चलन स्वीकारता येणार

    शिर्डी येथील साई संस्थानला आता परकीय चलन स्वीकारता येणार आहे. केंद्र सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे परदेशी नागरिक आणि परदेशातील भारतीय नागरिक यांना देणगी देणे सोपे होणार आहे.

  • 28 Feb 2025 02:57 PM (IST)

    28 Feb 2025 02:57 PM (IST)

    जिजाऊंच्या महाराष्ट्रात अशी विकृत माणसं जन्माला येतात हे दुर्दैव - शिवेंद्रराजे भोसले

    "समाजात अशा पद्धतीचे विकृती वाढत चालली आहे , या विकृतीवर कठोर शासन होणे गरजेचे आहे. याच्या आधीचे प्रकार झाले त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते आणि कारवाई देखील झाली होती. आता घडलेला प्रकार देखील अतिशय निंदनीय आहे
    पुणे असो किंवा कुठलेही शहर असो असे प्रकार घडता कामा नये. हा छत्रपती शिवरायांचा , जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे घडले. ज्या महाराष्ट्रात जिजाऊंचे नाव घेतले जाते त्या महाराष्ट्रात अशी विकृत माणसं जन्माला येतात हे दुर्दैव आहे. आरोपीची ओळख पटलेली आहे पुणे पोलीस लवकरात लवकर या आरोपीला अटक करतील अशी माझी खात्री आहे," असे मत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

  • 28 Feb 2025 02:15 PM (IST)

    28 Feb 2025 02:15 PM (IST)

    17 हजार मराठी शाळा बंद होण्याची शक्यता

    मराठी भाषेतील शाळांवर गदा येत आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्यामुळे शाळा बंद होत आहे. राज्यातील 17 हजार मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे.

  • 28 Feb 2025 01:48 PM (IST)

    28 Feb 2025 01:48 PM (IST)

    पुण्यात आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

    पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यावरून दमात धरणाऱ्या तसेच त्यांना वेठीस धरून आपली तुंबडी भरणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यावर खडक पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यकर्त्याला पोलीस आयुक्तालयात सहज प्रवेश मिळत होता. पण, नव्या आयुक्तांनाही तो अशाच पद्धतीने आरटीआय कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता म्हणून भेटण्यास गेल्यानंतर आयुक्तांनी त्यालाच चांगला दम भरला होता. नंतर त्यांची वेठीस धरण्याची धार कमी झाली होती. याप्रकरणी खडक पोलिसांत ललित सत्यवान ससाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर यापुर्वी खडकी, चतुश्रृंगी आणि फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दोन गुन्हे खुनाच्या प्रयत्नाचे आणि आर्म ॲक्टचे आहेत. प्रसाद प्रकाश शेलार (३७, रा. घोरपडे पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे.

  • 28 Feb 2025 01:28 PM (IST)

    28 Feb 2025 01:28 PM (IST)

    मी अत्याचार केले नाहीत हे सहमतीने संंबंध - आरोपी दत्ता गाडे

    पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला रात्री दीड वाजता पोलिसांनी अटक केली आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. यावेळी  "माझं चुकलं, मी पापी आहे, असं म्हणत तो रडत असल्याचं पुढे आलं आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले," असा दावाही त्याने पोलिसांसमोर केला आहे.

  • 28 Feb 2025 12:54 PM (IST)

    28 Feb 2025 12:54 PM (IST)

    10 वाजता उठून बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलण्यासाठी आम्ही बांधील नाही - अजित पवार

    महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड येथे आले असून नांदेड विमानतळावरती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी ही राज्य सरकारची भूमिका असून पोलीस प्रशासनामार्फत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होत आहे. संजय राऊत यांचे नाव न घेता सकाळी पोपटा वाणी दहा वाजता उठून बडबड करणाऱ्या व्यक्तीबद्दल आम्ही बोलण्यासाठी बांधील नाहीत असे देखील ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या गुड्यांनी भाजपसाठी काम केले होत असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं त्यावर भाजप साठी कोणत्या गुंड्यांनी काम केले आहे त्याचा तपास पोलीस यंत्रणा करेल असे देखील त्यावेळी अजित पवार म्हणाले.

  • 28 Feb 2025 12:30 PM (IST)

    28 Feb 2025 12:30 PM (IST)

    अलिबागमध्ये भर समुद्रात बोटीला आग

    अलिबागमध्ये भर समुद्रात बोटीला आग लागल्याची घटना घडली . या बोटीत 15 ते 20 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.

  • 28 Feb 2025 12:18 PM (IST)

    28 Feb 2025 12:18 PM (IST)

    नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे - चंद्रशेखर बावनकुळे

    "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पेशल टास्क फोर्स तयार केले होते. अशा नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे संपूर्ण पुरावे या प्रकरणाच असतात त्यासाठी पोलीस कारवाई करत आहे. अशा घटनांवर पॉलिटिकल बोलणं टाळायलं पाहिजेय कुठल्याही घटनेत पोलीस समाज आणि सर्वे लोक, अंतिम शिक्षेपर्यंत गेला पाहिजे. ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे," असे मत भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

  • 28 Feb 2025 11:42 AM (IST)

    28 Feb 2025 11:42 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट?

    महाराष्ट्राच्या मुंबई वाहतूक पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकीचा मेसेज व्हॉट्सअॅपवर मिळाला. धमकीची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर पोलिस तपासाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने आपले नाव मलिक शाहबाज हुमायून राजा देव असे सांगितले आहे. संदेश पाठवणारी व्यक्ती भारतातील आहे की बाहेरून आहे याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिस तपास करत आहेत.

  • 28 Feb 2025 11:31 AM (IST)

    28 Feb 2025 11:31 AM (IST)

    कोल्हापूर राजाराम कारखानाच्या बॉयलरला आग

    कोल्हापूरमध्ये भीषण आग लागली आहे. कोल्हापूरातील राजाराम कारखानाच्या बॉयलरला आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहे.

  • 28 Feb 2025 11:12 AM (IST)

    28 Feb 2025 11:12 AM (IST)

    भायखळ्यामध्ये सॅटसेट 27 या इमारतीला आग

    मुंबईमधील भायखळामध्ये आगीची घटना घडली आहे. सॅटसेट 27 या इमारतीमध्ये आगीची घटना घडली असून अग्निशमन दल आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • 28 Feb 2025 10:38 AM (IST)

    28 Feb 2025 10:38 AM (IST)

    महामार्गाची अवस्था खराब असेल तर टोल वसुली कसली?

    महामार्गाची अवस्था वाईट असेल तर त्यावर टोल वसुली करणे हा प्रवाशांवर अन्याय आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात हे म्हटले आहे. रस्त्याची अवस्था वाईट असेल तर त्यावर टोल कर वसूल करणे म्हणजे प्रवाशांवर अन्याय आहे. ज्याचा परिणाम देशभर दिसून येतो. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ता खराब अवस्थेत असल्याने टोल कर ८० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे आदेश दिले.

  • 28 Feb 2025 10:37 AM (IST)

    28 Feb 2025 10:37 AM (IST)

    महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका

    महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज बैठक होमार आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या या बैठकीला खासदार, आमदारांची उपस्थित राहणार आहेत. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पक्ष संघटनेच्या संदर्भात चर्चा होणार आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज 11.30 वाजता मातोश्रीवर बैठक होईल. यामध्ये उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • 28 Feb 2025 10:34 AM (IST)

    28 Feb 2025 10:34 AM (IST)

    पुण्यानंतर कोल्हापुरातही अत्याचाराची घटना

    पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता कोल्हापुरातही अत्याचाराची घटना समोर आली आहे. लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी विश्वजीत जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates add main events date 28 february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • Swargate Police Station

संबंधित बातम्या

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी
1

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
2

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
3

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
4

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिवाळीत मोदी सरकार GST कमी करणार? काय असेल Maruti Alto, Swift, Dzire आणि WagonR ची नवी किंमत?

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.