आजच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
22 Sep 2025 01:15 PM (IST)
उत्तर प्रदेश एटीएसकडून २७ ऑगस्टच्या तपासात उत्तर प्रदेशातून रक्कम ही फिलिस्तीन या देशात पाठवली जात असल्याचे तपासात समोर आले. ३ लाख रुपये पाठवल्याचा संशय एटीएसला होता. यूपी एटीएस तपास करत आली असता भिवंडीतील तीन जणांवर पाळत ठेवली आणि संशयित दहशतवादी म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे. मोहम्मद अयान मोहम्मद हुसेन (२२ वर्ष ) सहारा अपार्टमेंट तहेरा मॅरेज हॉल जवळ, अबू सुफियान ताजम्मूल अन्सारी, (वय २२) जैद नेटियार अब्दुल कादिर (वय २२) रा. वेताळ पाडा भिवंडी या तीन जणांना ताब्यात घेतल आहे. महत्वाचे म्हणजे या तीन जणांवर दहशतवादी कारवाईमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे.
22 Sep 2025 01:15 PM (IST)
आजपासून सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेकांनी देवीचं दर्शन घेत आपल्या दिवसाची सुरुवात केली आहे. तसेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता कपिल होनराव. ज्याला प्रेक्षकांचं भरभरून मिळालं. त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याची वर्णी थेट रितेश देशमुखच्या सिनेमात लागली आहे. अभिनेता ‘राजा शिवाजी’ या रितेशच्या आगामी चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याचा नवरात्री मधील पहिलाच दिवस आनंद ठरला आहे आणि त्याने त्याच्या चाहत्यांना देखील खुश केलं आहे. सिनेमाच्या क्लॅपबोर्डसोबतचे फोटो शेअर करत खास नोटही लिहिली.
22 Sep 2025 01:05 PM (IST)
जागतिक तंत्रज्ञान कंपनी असलेल्या HCLटेक च्या कंपनी सामाजिक जबाबदारीचा अजेंडा चालवणाऱ्या HCLफाऊंडेशन ने भारतात आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन 2025 (International Coastal Cleanup Day 2025) साजरा करण्यासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या सहा भारतीय राज्यांमध्ये सागरी किनारा स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.या उपक्रमामुळे स्थानिक समुदाय, HCLटेक कर्मचारी आणि भागीदार संस्थांना एकत्रित करण्यात आले, ज्यामुळे सुमारे XXX किलोग्रॅम सागरी कचरा XXX पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी काढून टाकला, ज्यामुळे भारताच्या किनारी आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण करण्यासाठी HCLफाउंडेशनची वचनबद्धता पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली.
22 Sep 2025 01:01 PM (IST)
आज नवीन जीएसटी दर लागू झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दैनंदिन वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. सरकारने १२% आणि १८% स्लॅब काढून टाकले आहेत. या जीएसटी दर कपातीमुळे सोन्याच्या किमतीही कमी होतील का? सोन्याच्या विक्रमी किमतींपासून जनतेला दिलासा मिळेल का? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात रेंगाळत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेऊया.
22 Sep 2025 01:00 PM (IST)
मुंबईतल्या कांदिवली पश्चिम भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराच्यापुजाऱ्यानेच मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. एवढेच नाही तर तरुणीच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली तेव्हा आरोपी पुजाऱ्याने देवासमोरच दोर लावत फास घेतला आणि आत्महत्या केली. ही घटना आहे कांदिवली पश्चिम भागातील लालजीपाडा परिसरात तारकेश्वर महादेव मंदिर आहे.
22 Sep 2025 12:50 PM (IST)
बीडच्या परळीमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पोरानेच आपल्या जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. राहते घर नावावर करायला नकार दिल्याने मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुनंदा ज्ञानोबा कांगणे असे मृत आईचे नाव असून आरोपीचे नाव चंद्रकांत कांगणे याला परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना परळी तालुक्यातील भोजनाकवाडी गावात घडली आहे.
22 Sep 2025 12:40 PM (IST)
राज्य सरकारच्या विरोधात ओबीसीची मोट बांधण्यासाठी राज्यभरात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सभा घेत आहेत. सभा घेवून आव्हान देण्याचा प्रयत्न होत असताना काल त्यांची जालन्यातील नीलमनगर भागात गाडी पेटवण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला आहे. या घटनेने जालन्यात खळबळ उडाली आहे. नवनाथ वाघमारे हे लक्ष्मण हाके यांच्यासोबत राज्यभरात दौरा करत आहेत आणि हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहेत.
22 Sep 2025 12:30 PM (IST)
मीरा भाईंदर पश्चिमेला डंपरखाली येऊन झेपटो डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात भाईंदर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर हा अपघात घडला. मृतक हा झेपटो या ऑनलाईन डिलिव्हरी सेवेसाठी काम करत होता.
22 Sep 2025 12:23 PM (IST)
नालासोपाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे.क्षुल्लक वादातून एका नायजेरियन नागरिकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नालासोपारा पूर्वेचा प्रगतीनगरमध्ये ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव लकी इकेचकव उईजे (32)असे आहे.
22 Sep 2025 11:56 AM (IST)
भारतीयांना संबंधोति करताना राजनाथ सिंह यांनी म्हटले की, ‘भारतीय म्हणून आपली ओळख तुम्ही विसरु नका. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आपण असतो तरी आप्यात भारतीयपणा ठेवा, हा आपला स्वाभिवक स्वभाव आहे. भारतीय म्हणून जबाबदाऱ्या इतरांपक्षे वेगळ्या आहेत.’ यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पाळा आणि मोरोक्कोशी निष्ठावान राहा असे आवाहन त्यांनी तेथील भारतीयांना केले. हेच भारताचे खरे यश असेल असे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
22 Sep 2025 11:47 AM (IST)
बिग बॉसशी संबंधित बातम्या शेअर करणाऱ्या प्लॅटफॉर्म बिग बॉस २४x७ ने पोस्ट केले आहे की मृदुल तिवारी, आवेज दरबार, अशनूर कौर, नीलम गिरी, गौरव खन्ना आणि प्रणीत मोरे यांना या आठवड्यात नामांकन मिळाले आहे. प्रणीतला हा सलग दुसरा घराबाहेर काढण्याचा धोका आहे. मृदुल आणि गौरव यांना त्यांच्या सततच्या सुस्त वृत्ती आणि कामगिरीच्या अभावासाठी आव्हान देण्यात आले असले तरी, अशनूर कौरचा धूर्त खेळ घरातील सदस्यांना पसंत पडला नाही.
22 Sep 2025 11:42 AM (IST)
पाकिस्तानात पुन्हा एकदा निरपराध जनतेच्या रक्ताने शोककळा पसरली आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मते दारा गावात पाकिस्तानी सैन्याने स्वतःच्या नागरिकांवर हवाई हल्ला करत ३० हून अधिक नागरिकांचा बळी घेतला. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश असल्याने ही घटना आणखी हृदयद्रावक ठरली आहे. स्थानिक आमदार इक्बाल आफ्रिदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला. त्यांनी आपल्या फेसबुकवर लिहिले, “वाडी तिरह अकाखेल येथे झालेल्या बॉम्बफेकीत निरपराध महिला व लहान मुलांचा बळी गेला. हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध आहे. कितीही निषेध केला तरी तो कमीच आहे.”
22 Sep 2025 11:33 AM (IST)
भारतात आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून जीएसटी 2.0 हा एक नवीन कर स्लॅब लागू केला जात आहे. 3 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत 5% आणि 18% असे दोन जीएसटी दर लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. 12% आणि 28% दर जीएसटी यादीतून काढून टाकण्यात आले आहेत. याऐवजी 40% हा तिसरा जीएसटी दर लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा कर लक्जरी वस्तूंवर जोडला जाणार आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू टॅक्स फ्री करण्यात आल्या आहेत.
22 Sep 2025 11:24 AM (IST)
आशिया कप पाहण्यासाठी आम्ही तिसऱ्या किंवा चौथ्यांदा आलो आहोत, पण आज आमचे स्वप्न पूर्ण झाले. आम्ही भारत-पाकिस्तान सामना आणि अभिषेकचा उत्कृष्ट कामगिरी पाहिला.” ती (अभिषेक शर्माची बहीण) पुढे म्हणाली, “तो सामनावीर ठरला, आपण आणखी काय मागू शकतो? पण आता आपण त्याच्या शतकाची वाट पाहत आहोत. मला खात्री आहे की लवकरच तो शतकही करेल. त्याच्यासाठी आकाशच मर्यादा आहे.”
22 Sep 2025 11:15 AM (IST)
जागतिक राजकारणात प्रत्येक हालचालीला अर्थ असतो. खासकरून समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले पाऊल तर एखाद्या राष्ट्राच्या शक्तीचे थेट द्योतक ठरते. भारताने नुकतेच असेच एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारतीय नौदलाचे सर्वात प्रगत स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी एक आयएनएस त्रिकंद ( INS Trikand) रविवारी( दि.21 सप्टेंबर 2025 ) सायप्रसच्या लिमासोल बंदरात दाखल झाले. वरकरणी हे एक नियमित दौऱ्याचे कारण असले तरी यामागील राजकीय संदेश मात्र अत्यंत ठळक आहे.
22 Sep 2025 11:07 AM (IST)
नवरात्रीचा पहिला दिवस देशासाठी आनंददायी ठरला. सोमवार (२२ सप्टेंबर) पासून नवीन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होत आहे. अनेक जीवनावश्यक वस्तू आता करमुक्त असतील, तर काहींवर फक्त ५ टक्के कर आकारला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, जीएसटी २.० मुळे काही वस्तूंच्या किमतीही वाढतील. त्यांच्या किमती इतक्या जास्त असतील की सामान्य माणसाला कोणताही दिलासा मिळणार नाही.
22 Sep 2025 10:57 AM (IST)
सामन्यानंतर पत्रकार परिषद सुरू होती. एका पत्रकाराने त्यांना विचारले की यावेळी पाकिस्तानचा संघ अधिक स्पर्धात्मक आहे का? सूर्याचे उत्तर मजेदार होते. पाकिस्तान संघाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधत तो म्हणाला, “मला वाटते की तुम्ही प्रतिस्पर्ध्याबद्दल प्रश्न विचारणे थांबवावे. जेव्हा दोन्ही संघ १५-२० सामने खेळतात आणि एक संघ ८-७ ने आघाडीवर असतो तेव्हा स्पर्धा असते आणि त्याला चांगले क्रिकेट किंवा स्पर्धा म्हणतात. पण जेव्हा निकाल एकतर्फी असतात तेव्हा ते फक्त चांगले क्रिकेट असते.
22 Sep 2025 10:51 AM (IST)
सूरज चव्हाणला त्याच्या आयुष्यातील जोडीदार कधी भेटणार याकडे सर्वांचं लक्ष होते. अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच सुरज आता लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजची बिग बॉसच्या घरातील त्याची बहिण म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने स्वतःच ही लग्नाची माहिती शेअर केली आहे.
22 Sep 2025 10:42 AM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा शुल्कात वाढ केल्यानंतर भारतीय आयटी कंपन्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्वांचा विचार करता आज २२ सप्टेंबर रोजी सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,३२० च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ९१ अंकांनी कमी होता.
22 Sep 2025 10:37 AM (IST)
न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रादरम्यान आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दोन्ही देशांतील व्यापारी तणाव, शुल्कवाढ, तसेच व्हिसा धोरणांवरून वाढलेला असंतोष याच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
22 Sep 2025 10:33 AM (IST)
मुंबई शहर दोन घटनांनी हादरली आहे. नालासोपारा येथे एका नायजेरियन युवकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर मीरा भाईंदर येथे एका डिलिव्हरी बॉयचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनेने मुंबई हादरली आहे. या दोन्ही घटनेचा संबंधित पोलिसांकडून तपास सुरु आहे.
22 Sep 2025 10:26 AM (IST)
बॅटलरॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये बाय ट्रबल रिंग ईव्हेंट एक्सक्लूसिवली सुरु झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना गेममध्ये डूडल ट्रबल बंडल मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या हा ईव्हेंट काही ठरावीक प्लेअर्सना अॅक्सेस करता येत आहे. सर्व प्लेअर्ससाठी हा ईव्हेंट दोन दिवसांनी सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील गेममध्ये हा ईव्हेंट दिसत नसेल तर चिंता करू नका कारण दोन दिवसांनी तुमच्यासाठी देखील हा ईव्हेंट सुरु होणार आहे.
22 Sep 2025 10:22 AM (IST)
राजकारण आणि व्यावसायिक क्षेत्र यांच्यातील वाद आणि सहकार्य हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्यातील नातेही याला अपवाद नव्हते. कधी हातात हात घालून पुढे जाणारे हे दोघे, तर कधी धोरणांवरून थेट भिडणारे. मात्र, २१ सप्टेंबर रोजीची एक घटना पुन्हा एकदा या दोन्ही प्रभावी व्यक्तींना एकत्र आणताना दिसली.
22 Sep 2025 10:17 AM (IST)
नेपाळच्या राजकारणात गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, सोशल मीडियावरील बंदी, आणि Gen-Z पिढीच्या जोरदार निषेधानंतर माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे सरकार कोसळले. या पार्श्वभूमीवर १२ सप्टेंबर रोजी सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत काम करणार आहे. आता, कार्की यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत ५ नवीन चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिले आहे. बातमी सविस्तर वाचा...
22 Sep 2025 10:11 AM (IST)
‘जॉली एलएलबी ३’ कमाईच्या बाबतीत हळूहळू पण स्थिरपणे प्रगती करत आहे. तिसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अक्षय-अर्शदच्या विनोदी चित्रपटाने आतापर्यंत ५३.५० कोटींची कमाई करून ३ दिवसांत हाफ सेन्चुरी पूर्ण केली आहे. अरशद-अक्षयच्या ‘जॉली एलएलबी ३’ ने पहिल्या दिवशी १२.७५ कोटींची कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने वेग घेतला आणि जबरदस्त कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारीही या सुपरहिट फ्रँचायझीने कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
22 Sep 2025 10:05 AM (IST)
सामन्यानंतर प्रसारकांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात अभिषेक शर्माने एक खळबळजनक खुलासा केला, तो म्हणाला की सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू त्याला शिवीगाळ करत होते. खरंतर, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आले की तू इतका शांत दिसतोस, पण फलंदाजी करताना तुला काय होते? या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेक म्हणाला की पाकिस्तानी खेळाडू मैदानावर काही गोष्टी बोलत होते ज्या त्यांनी बोलायला नको होत्या.
गेल्या काही महिन्यांत भारत-अमेरिका संबंधांमध्ये थोडीशी दरी निर्माण झाली आहे. दोन्ही देशांतील व्यापारी तणाव, शुल्कवाढ, तसेच व्हिसा धोरणांवरून वाढलेला असंतोष याच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील वाढलेली मतभेदांची दरी भरून काढण्याचा हा एक टप्पा असेल. वाचा अधिक सविस्तर बातमी