कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९ प्रवाशांना अटक (Photo Credit- X)
Varanasi Air India Express News: वाराणसीहून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानातील प्रवाशांनी चक्क कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. हे पाहून विमानात बसलेले सर्व प्रवासी हादरले. परंतु, वैमानिकाला (पायलट) विमानाचे अपहरण होत असल्याचा संशय आल्याने त्याने प्रसंगावधान राखत कॉकपिटचे दार उघडले नाही आणि विमानाचे वाराणसीमध्ये सुरक्षित लँडिंग केले.
बंगळूरुहून वाराणसीला येणाऱ्या विमानात ही घटना घडली. जेव्हा काही प्रवाशांनी कॉकपिटचे दार उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वैमानिकाला तात्काळ विमानाचे अपहरण (हायजॅक) होत असल्याचा संशय आला. त्याने कोणतीही घाई न करता, अत्यंत सावधगिरीने विमान वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले.
🚨 वाराणसी ब्रेकिंग 🚨
बेंगलुरु से वाराणसी आ रही Air India Express फ्लाइट IX1087 में हड़कंप!
✈️ 9 पैसेंजर के ग्रुप ने दबाया कॉकपिट सिक्योरिटी कोड बटन
👨✈️ पायलट ने तुरंत ATC को दी सूचना
🔍 सुरक्षा एजेंसियां सतर्क, DCP गोमती जांच में जुटे
🛕 सभी 9 यात्री काशी विश्वनाथ दर्शन के लिए… pic.twitter.com/GqNE2JYCnb— Awanish M Vidyarthi (@awanishvidyarth) September 22, 2025
विमानाचे लँडिंग होताच, सीआयएसएफ (CISF) च्या जवानांनी त्या प्रवाशासह त्याच्या सोबत असलेल्या एकूण ८ जणांना ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी वेगळ्या खोलीत नेले. या घटनेमुळे विमानतळावर एकच खळबब उडाली होती.
पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व प्रवासी बेंगळूरुचे रहिवासी असून, वाराणसीमध्ये दर्शनासाठी आले होते. चौकशीदरम्यान त्यांनी दिलेले कारण अधिकच धक्कादायक होते. त्यांनी सांगितले की, त्यांना टॉयलेटला जायचे होते, पण चुकून ते कॉकपिटजवळ पोहोचले आणि कॉकपिटचे दार टॉयलेटचे दार समजून उघडण्याचा प्रयत्न केला.
या घटनेवेळी विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने सोशल मीडियावर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याने म्हटले की, ही घटना घडली तेव्हा विमानात बसलेले सर्व लोक घाबरले होते, कारण अशा प्रकारची कृती केवळ त्या प्रवाशासाठीच नाही तर सर्वांच्या सुरक्षेसाठी धोकादायक होती.
सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ कारवाई केली. आरोपी प्रवाशाचे वर्तन उड्डाणादरम्यानही थोडे विचित्र होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा घटना विमान सुरक्षेसाठी मोठा धोका असून, यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे विमानन सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मानले जात आहे.
An Air India Express spokesperson says, “We are aware of media reports regarding an incident on one of our flights to Varanasi, where a passenger approached the cockpit entry area while looking for the lavatory. We reaffirm that robust safety and security protocols are in place…
— ANI (@ANI) September 22, 2025
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यांनी या घटनेबाबत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, “वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानात एका प्रवाशाने शौचालय शोधत असताना कॉकपिट प्रवेश क्षेत्रात प्रवेश केल्याच्या घटनेबद्दल माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांची आम्हाला माहिती आहे. आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, विमानातील सर्व कडक सुरक्षा आणि सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आले होते आणि त्यात कोणतीही तडजोड झाली नाही. विमान उतरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना या घटनेची तात्काळ माहिती देण्यात आली होती आणि सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.”