
Top Marathi News Today Live:
08 Dec 2025 10:51 AM (IST)
जानेवारी २०२६ मध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची खरेदी जवळजवळ चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. पुढील महिन्यात रशियन पुरवठा दररोज ६००,००० बॅरलपर्यंत घसरू शकतो असा अंदाज आहे. ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा काही महिन्यांपूर्वी भारत दररोज २.१ दशलक्ष बॅरल आयात करत होता, जे एकूण आयातीच्या अंदाजे ४५% आहे. रशियन तेलावरील अमेरिकेचे निर्बंध आणि ट्रम्प प्रशासनाच्या कठोर वक्तृत्वामुळे भारतीय कंपन्या अडचणीत आल्या आहेत.
08 Dec 2025 10:43 AM (IST)
पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक निखिल रणदिवे हे गेल्या ५ डिसेंबर पासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. निखिल रणदिवे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून निखिल रणदिवे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. निखिल रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीस दलाकडून त्यांना शोधण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. पोलिसांनी पाच पथके तयार केली आहे. निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यात त्यांनी गंभीर आरोप केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या लेकीच्या वाढदिवसाला भावनिक स्टेटस देखील ठेवले होते.
08 Dec 2025 10:34 AM (IST)
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून( 8 डिसेंबर) नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. यंदाच्या अधिवेशनात प्रथमच दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेत विरोधी पक्षनेता निवडीचा कोणताही उल्लेख नाही. दरम्यान, विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेसाठी शिवसेना (ठाकरे गट) कडून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावाचे पत्र सादर करण्यात आले आहे. (Maharashtra Winter Session Nagpur 2025)
08 Dec 2025 10:27 AM (IST)
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ, मिम्स पाहून आपण खळखळून हसतो, तर काही असे संताजनक व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ किळसवाणे असतात, तर काही व्हिडिओ सेंकदात तुमचे मन जिंकतात. स्टंट, डान्स, जुगाड, भांडण, लग्नातील समारंभाचे व्हिडिओ, खाद्यपदार्थांचे, खवय्यांचे अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात.
08 Dec 2025 10:19 AM (IST)
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रविवारी घोषणा केली की चिन्नास्वामी स्टेडियम भविष्यातही आयपीएल सामने आयोजित करत राहील. ४ जून रोजी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत शंका असताना ही घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली असताना ही चेंगराचेंगरी झाली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर, शिवकुमार म्हणाले की, भविष्यात एक नवीन, मोठे स्टेडियम देखील बांधले जाईल.
08 Dec 2025 10:11 AM (IST)
जगातील सर्वात कडक ऑनलाइन देखरेख प्रणालीपैकी एक म्हणून ओळखली जाणारी चीनची (China) डिजिटल सेन्सॉरशिप व्यवस्था (Digital Censorship System) आता त्यांच्यासाठी एक मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. तैवानच्या मेनलँड अफेयर्स कौन्सिल (MAC) ने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालात धक्कादायक दावा केला आहे की, चीन सरकार त्यांच्या नागरिकांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर देखरेख करत आहे, पण हीच कृती आता त्यांच्यावर उलटत आहे.
08 Dec 2025 10:03 AM (IST)
वडिलांसाठी वाढदिवसाची पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, ‘”टू माय डार्लिंग पप्पा. आपला करार, आपलं नातं सगळ्यात मजबूत आहे. आपण हे नातं प्रत्येक जन्मात, प्रत्येक जगात आणि त्याही पलीकडे कायम सोबत आहे. पप्पा आपण नेहमीच एकत्र आहोत. स्वर्ग असो किंवा पृथ्वी, आपण एक आहोत.” “आत्ता मी तुम्हाला आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी अत्यंत प्रेमाने, जपून आणि अमूल्यपणे माझ्या हृदयात, खूप खोल, कायमस्वरूपी जपून ठेवलं आहे. त्या जादुई, अमूल्य आठवणी… जीवनातील शिकवण, मार्गदर्शन, तुमचं प्रेम, तुमची प्रतिष्ठा आणि तुम्ही मला मुलगी म्हणून दिलेली ताकद, याची जागा कुणीही घेऊ शकत नाही.”
08 Dec 2025 09:59 AM (IST)
Russia Ukraine War News Marathi : वॉशिंग्टन : फेब्रुवारी 2022 पासून सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) आता तीन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र हे युद्ध दिवसेंदिवस भयंकर होत चालले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण सर्व प्रयत्ननांवर दोन्ही देशाच्या एकमेकांवरील हल्ले आणि आरोपांमुळे पाणी फिरले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चा रंगली आहे.
08 Dec 2025 09:55 AM (IST)
India Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळे आज ८ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. गिफ्ट निफ्टी २६,३२२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ११ अंकांनी कमी होता.
08 Dec 2025 09:50 AM (IST)
Stambheshwar Mahadev Temple : भारत हा प्राचीन मंदिरांचा आणि गूढ कथांचा देश आहे. या मंदिरांपैकी, गुजरातच्या किनाऱ्यावर असलेले स्तंभेश्वर महादेव मंदिर (Stambheshwar Mahadev Temple) हे त्याच्या अविश्वसनीय वैशिष्ट्यामुळे संपूर्ण जगात ओळखले जाते. हे मंदिर गुजरातमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असून, याची निर्मिती ७ व्या शतकाच्या आसपास झाली होती. असे मानले जाते की, या मंदिराचे शिवलिंग दिवसातून दोन वेळा समुद्राच्या पाण्यात बुडते आणि पुन्हा आपोआप दर्शनासाठी उपलब्ध होते! या अद्भुत घटनेमुळेच या मंदिराला ‘समुद्रात बुडणारे शिवमंदिर’ म्हणून ओळखले जाते. भक्त या घटनेला भगवान महादेवाचा ‘जलप्रलय’ किंवा समुद्राद्वारे होणारा ‘स्वयंचलित अभिषेक’ मानतात. विज्ञान आणि श्रद्धेचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो.
08 Dec 2025 09:45 AM (IST)
धुळे: धुळे व नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिरपूर तालुक्यातील जामन्या पाणी गावाच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या संपूर्ण कारवाईत वनविभागाच्या हद्दीतील तब्बल 122 गुंठे जागेतील अंदाजे 2 हजार 125 किलो गांजाची झाडे नष्ट करून तब्ब्ल १ कोटी ६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. तर गांजाची लागवड करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
08 Dec 2025 09:40 AM (IST)
राज्यातील आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडणार आहेत. मुंढे नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त असताना अधिकृत नियुक्ती नसतानाही "स्मार्ट सिटी प्रकल्प"चा प्रभार स्वतःकडे घेऊन नियमबाह्य कामकाज केले, असा भाजपाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना निलंबित करण्याची मागणी विधिमंडळ अधिवेशनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
08 Dec 2025 09:40 AM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील इंग्लडची फलंदाजी दुसऱ्या डावामध्ये फेल ठरली. ऑस्ट्रेलियाने रविवारी इंग्लंडचा आठ विकेट्सने पराभव करून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
08 Dec 2025 09:35 AM (IST)
युरोपियन संघाने (EU) आपल्या डिजिटल सेवा कायदा (Digital Services Act – DSA) अंतर्गत X वर 120 दशलक्ष युरो (सुमारे १,२५६ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. EU आयोगाच्या तपासानुसार, X च्या ‘ब्लू टिक’ (Blue Tick) प्रणालीची रचना भ्रामक (deceptive) होती — ज्यामुळे सामान्य वापरकर्त्यांना खरे आणि Verified अकाउंट्समध्ये फरक पटत नाही. त्याचप्रमाणे, X ने जाहिरातींच्या डेटाबेसमध्ये अपेक्षित पारदर्शकता राखली नाही आणि संशोधकांना सार्वजनिक डेटावर प्रवेश देण्यास अडचणी निर्माण केल्या.
08 Dec 2025 09:35 AM (IST)
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे, या मालिकेचे दोन सामने खेळवले जात आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ८ विकेट्सने पराभव करत शानदार कामगिरी केली. गाब्बा येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्टमध्ये इंग्लिश फलंदाज कांगारू गोलंदाजांसमोर अजिबात नव्हते आणि दोन्ही डावांमध्ये संघाची फलंदाजीची कामगिरी लाजिरवाणी होती.
08 Dec 2025 09:30 AM (IST)
रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित स्पाय थ्रिलर ‘धुरंधर’ प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करून या चित्रपटाने रणवीरच्या करिअरमधील सर्वात मोठा ओपनर ठरण्याचा विक्रम केला. तसेच, वर्षातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ओपनर ठरत ‘सैय्यारा’ला मागे टाकण्यातही त्याने यश मिळवले.
दुसऱ्या दिवशीही महसूल टिकवून ठेवत, तिसऱ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर “आग लावली” असा प्रतिसाद मिळाला. ‘धुरंधर’कडून प्रेक्षक आणि उद्योगातील मोठ्या अपेक्षा होत्या, ज्यांची पूर्तता चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये केली आहे.
08 Dec 2025 09:20 AM (IST)
गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे इंडिगो एअरलाइन्सने मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आणि त्यांचा तीव्र संताप व्यक्त झाला. मात्र, आता सेवा हळूहळू पूर्ववत होत असून काल 1,500 पेक्षा जास्त उड्डाणे सुरु झाली.
आज इंडिगोने 1,650 फ्लाईट्सचे नियोजन केले असून, तरीही जवळपास 650 उड्डाणे रद्दच राहणार आहेत. दररोज सरासरी 2,300 उड्डाणे करणाऱ्या इंडिगोची काल वेळेवर उड्डाणांची कामगिरी फक्त 30 टक्के होती, तर आज ती 75 टक्क्यांपर्यंत सुधारली आहे. कंपनीने सांगितले की, 138 पैकी 137 ठिकाणी फ्लाईट्स ऑपरेशन्स कार्यरत आहेत. तसेच 15 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व बुकिंगसाठी रद्दीकरण आणि पुनर्नियोजनावर पूर्ण शुल्क माफी दिली जाणार आहे.
08 Dec 2025 09:15 AM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विवाहसोहळा रद्द केल्याची माहिती दिली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर स्मृती आणि पलाश यांच्या नावाने विविध प्रतिक्रिया उमटत असून, अनेक मीम्स, पोस्ट्स आणि कमेंट्स व्हायरल होत आहेत. लग्न का मोडले याबाबत नेटकऱ्यांनी विविध तर्क-वितर्क लढवण्यासही सुरुवात केली आहे.
08 Dec 2025 09:10 AM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवार ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. अवघ्या सात दिवसांचे (८ ते १४ डिसेंबर) अधिवेशन असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि प्रलंबित प्रश्नांमुळे हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (७ डिसेंबर) सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव उघड झाला आहे. विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर आरोप करत, शासन लोकशाही मुल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. तर सरकारकडून या टीकेवर अद्याप औपचारिक प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
08 Dec 2025 09:05 AM (IST)
‘बिग बॉस 19’ च्या ग्रँड फायनलमध्ये आज अखेर विजेत्याचे नाव जाहीर झाले आहे! गौरव खन्नाने या सीझनच्या स्पर्धेत आपली पकड मजबूत ठेवली आणि त्याने इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. फरहाना भट्टने गौरवला कमालीची टक्कर दिली. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात अनेक रोमांचक आणि भावनिक क्षण पाहायला मिळाले. सलमान खानच्या “बिग बॉस १९” च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांचा समावेश होता. हे सर्व प्रेक्षकांच्या मनावर ठराविक छाप सोडून गेले आहेत. ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक परफॉर्मन्स झाले.
08 Dec 2025 09:02 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 8 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,014 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,929 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,760 रुपये आहे. भारतात 8 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,19,290 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,140 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 97,600 रुपये आहे. भारतात 8 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 189.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,89,900 रुपये आहे.
Marathi Breaking news live updates- पुणे पोलीस दलातील अंतर्गत वादामुळे एक पोलीस कर्मचारी बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे हे ५ डिसेंबरपासून बेपत्ता असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी व्यापक चोखंदळ मोहीम सुरू केली आहे.
निखिल रणदिवे यांच्या कुटुंबीयांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पोलीस विभागाने तत्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांच्या शोधासाठी पाच विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणदिवे यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्रास दिला जात होता आणि याच मानसिक ताणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलातील अंतर्गत राजकारण, कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर होत असलेली पिळवणूक आणि अधिकारांचा गैरवापर या मुद्द्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.