Maharashtra Breaking News
04 Nov 2025 02:00 PM (IST)
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. राज्यातील राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारीही सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जय पवार हे बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात.
04 Nov 2025 01:55 PM (IST)
भारताची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम्य सोहळा डोळे भरुन अनुभवत परंपरने घराण्यातून चालत आली. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल । श्रीज्ञानदेव तुकाराम ।। पंढरीनाथ भगवान की जय ।।। असा जयघोष करत येथील विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारात तसेच महाव्दारात उभे राहून दोन्ही हातांनी स्वतःचे कान पकडून वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून उड्या मारत सावळ्या परब्रम्हाकड क्षमा याचना करुन काही चुकले असेल तर माफी कर, पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्यासाठी बळ दे असे म्हणत त्याचा निरोप घेत होते.
04 Nov 2025 01:46 PM (IST)
भारताच्या संघाने 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन विश्वविजेता झाला आहे. आयसीसीने २०२५ च्या महिला विश्वचषकासाठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. या संघात जेतेपद जिंकणाऱ्या भारतीय महिला संघातील तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघातील तीन खेळाडूंनीही टॉप ११ मध्ये स्थान मिळवले आहे. इंग्लंडच्या नॅट सायव्हर ब्रंटची आयसीसीच्या स्पर्धेतील १२ वी खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
04 Nov 2025 01:35 PM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील बिहारमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काल बिहारच्या खडगिया जिल्ह्यात निवडणूक प्रचार केला. पण याच दरम्यान एक मोठी घटना घडली. देवेंद्र फडणवीस आणि चिराग पासवान प्रचारसभेदरम्यान मंचारवर दाखल झाले. पण खूर्चीत बसताना देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची अचानक तुटली. यामुळे मंचावर थोडावेळ गोंधळ उडाला. पण नंतर फडणवीस आणि चिराग पासवान यांनी अभिवादन करत सुरक्षित असल्याचे सांगितले.
04 Nov 2025 01:25 PM (IST)
विक्रमगड रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्त्यांवरील सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे गांभीर्याने पालन करणे या प्रमुख उद्देशांनी केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८८ (Motor Vehicles Act, 1988) मध्ये मोठे बदल केले असून, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, २०१९ लागू केला आहे. या नवीन कायद्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पूर्वीपेक्षा अनेक पटींनी अधिक दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे वाहनचालकांमध्ये अधिक जबाबदारीची भावना निर्माण होणे अपेक्षित आहे.
04 Nov 2025 01:15 PM (IST)
भारत सरकारने दुचाकी वाहनांवरील जीएसटी २८ % वरून १८ % पर्यंत कमी केला आहे. यामुळे बाईक आणि स्कूटर खरेदी करणे पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे. हिरो स्प्लेंडर प्लसची सध्याची एक्स-शोरूम किंमत ८०,१६६ रुपये आहे. जी जीएसटी कपातीनंतर अंदाजे ७३,९०३ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. टीव्हीएस स्टार सिटी प्लसची एक्स-शोरूम किंमत ७८,५८६ रुपये आहे. तर जीएसटी कपातीनंतर ही किंमत सुमारे ७०,७८६ रुपये असेल. या बाईकच्या इंजिन आणि वैशिष्ट्ये काय आहेत ? जाणून घेऊया…
04 Nov 2025 01:05 PM (IST)
कापिल (ता. कराड) गावातील बोगस मतदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी गेल्या 27 दिवसांपासून सुरु आहे. याच मागणीवरून प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कापिलचे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी शुक्रवारी (दि.7) बेमुदत उपोषणास सुरुवात करण्याचा इशारा दिला.
04 Nov 2025 01:00 PM (IST)
लग्नाचे आमिष दाखवून एका 23 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करुन लग्नास नकार देण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी मनोहर लिंबाजी चव्हाण (वय २८, रा. गंगाखेड, जि. परभणी) याला सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. तर त्याला 5 नोव्हेंबपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एस. जांबोटकर यांनी दिले. याप्रकरणात २३ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही अभियांत्रिकी शिक्षण घेत असून, ती गेल्या काही वर्षांपासून डेटा सायन्सच्या क्लाससाठी शहरात राहत होती.
04 Nov 2025 12:50 PM (IST)
पुणे ग्रामीण पोलीस दलाने दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. एक चिकन सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या गांजाची विक्री सुरु होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सलीम आदम शेख असे आहे.
04 Nov 2025 12:40 PM (IST)
अमरावती येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. चांदुररेल्वे पोलीस स्टेशनच्या कोठडीत रितेश मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ८ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे. न्यायालयीन चौकशी अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषी ठरलेल्या तत्कालीन ठाणेदार अजय अहिरकर यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
04 Nov 2025 12:26 PM (IST)
शिक्षकानेच अलपवयीन विद्यार्थिनीचा विनभंग केल्याचे समोर आले आहे. पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये हा प्रकार घडला आहे. एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावलं आणि मग मुलींचा विनयभंग करण्यात आला आल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चव्हाण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचा नाव आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथे घडली.
04 Nov 2025 12:00 PM (IST)
जुन्या चिरेखाणीतील साचलेल्या पाण्यात 5 जण बुडाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. तसेच बघ्याची देखील मोठी गर्दी झाली आहे.
Sindhudurg | जुन्या चिरेखाणीतील साचलेल्या पाण्यात 5 जण बुडाले#Sindhudurg #MaharashtraNews #DailyNewsUpdates pic.twitter.com/TJWuTrgorX
— Navarashtra (@navarashtra) November 4, 2025
04 Nov 2025 11:50 AM (IST)
02 नोव्हेंबर रोजी डीएमके (डॉन मुआंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, बँकॉक) ते जीएयू (गुवाहाटी, आसाम) येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या फ्लाईट एफडी-१२४ ने चेक-इन केलेल्या सामानाची तपासणी करताना, गुवाहाटी कस्टम विभागाच्या एलजीबीआयए युनिटच्या कस्टम अधिकाऱ्यांना ०३.११.२०२५ रोजी एक संशयास्पद वस्तू आढळली जी प्रतिबंधित असल्याचे मानले जात होते. प्राथमिक तपासणीनंतर, चेक-इन केलेल्या सामानातून अंदाजे ६.४६ किलोग्रॅम हिरव्या रंगाचा पदार्थ असलेले १२ पॅकेजेस जप्त करण्यात आले, जे हायड्रोपोनिक तण (गांजा/ड्रग्ज) असल्याचा संशय आहे. सामान बेवारस ठेवण्यात आले होते आणि जप्त केलेल्या मालाचे मालक सध्या फरार आहेत. ड्रग डिटेक्शन किट वापरून केलेल्या प्राथमिक चाचणीत गांजाची उपस्थिती दिसून आली. माल जप्त करण्यात आला आणि सदर मालाची एकूण किंमत ६.४६ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
04 Nov 2025 11:40 AM (IST)
आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यावर पलटवार केला आहे. थोरवे म्हणाले “सुनील तटकरे हे कुटील नियतीने डाव खेळत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत प्रत्यक्षात युती केली आहे.” तसेच “जर मला राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक तरी मतदान केल्याचे दाखवले, तर मी राजीनामा देईन,” असा ठाम दावा त्यांनी केला.
04 Nov 2025 11:31 AM (IST)
राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने दुपारी ४ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. ज्यात या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.
04 Nov 2025 11:15 AM (IST)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने 1400 कोटी मदत दिलेली आहे, राज्य सरकारने 31 हजार कोटी जाहीर केलेले आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी. कॉर्पोरेट संस्थांनी ही मदत घ्यावी. कोकणातील भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
04 Nov 2025 11:05 AM (IST)
भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र चळवळीमध्ये अग्रस्थानी असणारे वासुदेव बळवंत फडके यांचे नाव इतिहासामध्ये अजरामर झाले. त्यांचा जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला तर मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३ रोजी झाला. हे एक भारतीय क्रांतिकारक होते, ज्यांना 'भारतीय सशस्त्र बंडाचे जनक' म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे ते खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी धनिकांच्या घरातून लूट मिळवून क्रांतीसाठी वापरली आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध एक सशस्त्र चळवळ उभी केली.
04 Nov 2025 10:59 AM (IST)
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलीवूडमधील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांनी लग्नापर्यंत त्यांचे नाते गुप्त ठेवले. आता लग्नानंतर ते त्यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. हे जोडपे अनेकदा सुट्टीवर जातात आणि तिथून अनेक फोटो शेअर करतात. सोनाक्षी आणि झहीर अनेकदा त्यांच्या पालकांसोबत ट्रिपवर असते. सोनाक्षी नेहमीच तिच्या सासरच्या लोकांचे कौतुक करताना दिसते. आता अशातच अभिनेत्रीने स्वतःच्या सासरच्या कुटुंबाचे अनेक रहस्य उघड केले आहे.
04 Nov 2025 10:52 AM (IST)
लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या JioHotstar चे करोडो युजर्स आहेत. JioHotstar प्लॅटफॉर्मवर सिरीअल्सपासून अगदी चित्रपट आणि सिरीजपर्यंत सर्व काही पाहायला मिळते. यासाठी सबस्क्रिप्शनची गरज असते. JioHotstar त्यांच्या युजर्ससाठी सतत नवीन ऑफर्स घेऊन येत असते. ज्यामुळे युजर्सना JioHotstar चे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. आता देखील JioHotstar च्या सबस्क्रिप्शनबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, युजर्सना केवळ 1 रुपयांत सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करता येणार आहे.
04 Nov 2025 10:45 AM (IST)
अमनजोत कौर (अमनजोत कौर आजी हृदयविकाराचा झटका) यांचे वडील भूपिंदर सिंग यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, माझी आई भगवंती ही अमनजोतची ताकद आहे. जेव्हा ती रस्त्यावर आणि उद्यानात क्रिकेट खेळायची तेव्हा मी माझ्या सुतारकामाच्या दुकानात असेन, पण माझी आई घराबाहेर बसून किंवा तिचा सराव पाहण्यासाठी उद्यानात जायची. गेल्या महिन्यात, माझ्या आजीला हृदयविकाराचा झटका आला, पण आम्ही अमनजोतला सांगितले नाही. गेल्या काही दिवसांपासून आम्ही सतत रुग्णालयात जात होतो. या विश्वचषक विजयामुळे आम्हाला तणावाच्या काळात खूप दिलासा मिळाला आहे.
04 Nov 2025 10:33 AM (IST)
सोशल मिडियावर एक व्हिडिओ हरमनप्रीत कौरने शेअर केला आहे. यामध्ये ती कपमध्ये काहीतरी पिताना दिसत आहे. यावेळी व्हिडिओमध्ये ती काॅफी/चाय पिताना ती ट्राॅफी चेअर करताना दिसत आहे.
HARMANPREET KAUR cooking entire Pakistan 🤣❤️🔥. pic.twitter.com/XB1Io0toKp
— 𝐉𝐨𝐝 𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 (@jod_insane) November 3, 2025
04 Nov 2025 10:24 AM (IST)
बिहारनंतर, निवडणूक आयोग आता नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन सुधारणा (Special Intensive Revision (SIR) सुरू करत आहे. ती मंगळवार (४ नोव्हेंबर) पासून सुरू होईल. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनासह संपेल. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५१ कोटी मतदार आहेत.
04 Nov 2025 10:15 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याचाराची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
04 Nov 2025 10:11 AM (IST)
मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.दया डोंगरे यांनी ‘मायबाप’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
04 Nov 2025 10:07 AM (IST)
स्मार्टफोन खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते कॅमेरा. जर तुम्ही देखील स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने फोटोग्राफी करत असाल तर तुम्ही देखील मेगापिक्सेलचं नाव नक्कीच ऐकलं असेल. कारण फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन कॅमेऱ्याचा मेगापिक्सेल अत्यंत गरजेचा असतो. पण मेगापिक्सेल नक्की काय असतो आणि फोटोग्राफीसाठी मेगापिक्सेल किती गरजेचं आहे, याबाबत अनेकांना माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला मेगापिक्सेल नक्की काय असतं, याबाबत सविस्तरपणे सांगणार आहोत.
04 Nov 2025 09:59 AM (IST)
नवी दिल्ली : देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे काळा पैसा समोर आणणे हा होता. मात्र, नोटाबंदीनंतर 9 वर्षे झाली असली तरी काळा पैसा पुन्हा चलनात आला असल्याचे म्हटले जात आहे. हा काळा पैसा अजूनही रिअल इस्टेट क्षेत्रात पसरलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. जमीन/मालमत्तेसाठी केंद्रीकृत डेटाबेस तयार करण्याच्या सरकारी प्रयत्नांना अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. कारण ६२ टक्के मालमत्ता मालकांनी अद्याप त्यांच्या मालमत्ता आधारशी जोडलेल्या नाहीत.
04 Nov 2025 09:55 AM (IST)
हरमनप्रीतच्या सैन्याने रविवारी इतिहास रचला, जो पाहण्यासाठी संपूर्ण भारत टीव्हीसमोर चिकटून होता. गेल्या रविवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने आपला पहिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर विरोधी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २९९ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला केवळ २४६ धावांवरच हार मानावी लागली.
04 Nov 2025 09:50 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना AK47 ब्लू फ्लेम ड्रॅको आणि G18 अल्टिमेट अचीव्हर या दोन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी मिळणार आहे. याचं कारण म्हणजे फ्री फायर मॅक्स गेममध्ये नोव्हेंबर महिन्यासाठी Evo Access पास रिलीज करण्यात आला आहे. या पासच्या मदतीने प्लेअर्स गेममध्ये प्रीमियम गन स्किन एक्सेस करू शकतात. यासोबतच अनेक एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स देखील मिळवण्याची संधी मिळणार आहे, ज्यामध्ये मोफत पेट पॅक, कॅरेक्टर पॅक, स्पेशल चॅट बबल आणि फ्रेंड स्लॉट इत्यादींचा समावेश आहे. या पासच्या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊया.
04 Nov 2025 09:45 AM (IST)
नुकताच बॉलीवूड मधील किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा वाढदिवस साजरा झाला आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशीच त्यांना बिग बजेट चित्रपट किंगचे पोस्टर अनावरण झाले, आणि चाहत्यांना अभिनेत्याचा लूक खूप आवडला. शाहरुख खानच्या “किंग” चित्रपटाच्या पहिल्या लूकने केवळ चाहत्यांनाच उत्साहित केले नाही तर काही प्रेक्षकांनी त्याच्या लूकची तुलना हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिटच्या “एफ १” चित्रपटाशीही केली. दोन्ही स्टार्सचे फोटो ऑनलाइन शेअर केले जात आहेत, ज्यामुळे शाहरुख खानने हॉलिवूडमधून प्रेरणा घेतली आहे की तो केवळ योगायोग आहे यावर वाद सुरू झाला आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या व्हायरल होणाऱ्या फोटोवर आता प्रतिक्रिया दिली आहे.
04 Nov 2025 09:40 AM (IST)
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, नाकारत्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,८६५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ३४ अंकांनी कमी होता.
04 Nov 2025 09:35 AM (IST)
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रतिका रावलला दुखापतीमुळे उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत खेळता आले नाही, परंतु व्हीलचेअरवर असूनही, ती रविवारी रात्री नवी मुंबईत झालेल्या सेलिब्रेशनसाठी संघात सामील झाली. तथापि, नियमांनुसार अंतिम फेरीसाठी १५ सदस्यीय संघाचा भाग नसल्यामुळे प्रतीकाला विजेत्या संघाला देण्यात आलेले पदक मिळाले नाही. तथापि, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादवसह काही भारतीय खेळाडूंनी प्रतिकाच्या गळ्यात आपले पदक ठेवून या पराभवाची भरपाई करण्याचा प्रयत्न केला.
04 Nov 2025 09:35 AM (IST)
न्यू यॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक मंगळवारी (४ नोव्हेंबर) होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण अमेरिकेचे लक्ष लागले आहे. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे या निवडणुकीतील एक प्रबळ दावेदार मानले जात आहेत.मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना विरोध दर्शवला आहे. ममदानी महापौर झाल्यास न्यू यॉर्कला मिळणाऱ्या केंद्रीय निधीत कपात करण्याची धमकी त्यांनी दिली आहे. या वक्तव्यामुळे निवडणुकीचे राजकीय तापमान अधिक चढले आहे. महापौरपदासाठी आणखी दोन प्रमुख उमेदवार रिंगणात असून, तिघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. न्यू यॉर्ककरांना प्रगतिशील धोरणे की पारंपरिक नेतृत्व — यापैकी काय पसंत येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
04 Nov 2025 09:30 AM (IST)
भारतात 4 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,318 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,291 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,239 रुपये आहे. भारतात 4 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,12,910 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,180 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,390 रुपये आहे. भारतात 4 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 154.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,54,100 रुपये आहे. दिल्ली शहरात 4 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,040 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,330 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,520 रुपये आहे.
04 Nov 2025 09:28 AM (IST)
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते; मात्र त्यासाठी लागणारा खर्च अनेकांना परावृत्त करतो. अशा विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ब्रिटनमधील प्रसिद्ध शेफील्ड विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आकर्षक शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा आर्थिक बोजा कमी होणार आहे.
04 Nov 2025 09:25 AM (IST)
नागपूर : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी गुंतवणुकीवर बक्कळ नफा आणि सीबीआयच्या नावाने डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देऊन शहरातील दोन वृद्धांना जवळपास १ कोटी ४२ लाख रूपयांचा गंडा घातला. याप्रकरणाची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे.
04 Nov 2025 09:23 AM (IST)
केवळ पैसा कमवणेच नव्हे, तर तो योग्य ठिकाणी गुंतवणेही तितकेच आवश्यक आहे. नियमित आणि शहाणपणाची गुंतवणूक दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) — दरमहा फक्त २ हजार रुपयांची शिस्तबद्ध गुंतवणूक करून गुंतवणूकदार भविष्यात कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळवू शकतात.
04 Nov 2025 09:22 AM (IST)
नवी दिल्ली : देशातील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये निवडणूक होत आहे. विद्यार्थी संघटनेच्या २०२५-२६ च्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. विविध शाळांमध्ये केंद्रीय पॅनेलच्या चार पदांसाठी 20 उमेदवार आणि समुपदेशक पदासाठी १११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अध्यक्षपदासाठी सर्वाधिक उमेदवारांची संख्या सात आहे. मतमोजणी मंगळवारी रात्री 9 वाजता सुरू होईल आणि अंतिम निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.
04 Nov 2025 09:18 AM (IST)
बिहारनंतर, निवडणूक आयोग आता नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन सुधारणा (एसआयआर) सुरू करत आहे. ती मंगळवार (४ नोव्हेंबर) पासून सुरू होईल. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनासह संपेल. या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५१ कोटी मतदार आहेत.
04 Nov 2025 09:12 AM (IST)
हरमनप्रीतच्या सैन्याने रविवारी इतिहास रचला, जो पाहण्यासाठी संपूर्ण भारत टीव्हीसमोर चिकटून होता. गेल्या रविवारी भारतीय महिला क्रिकेट संघाने आपला पहिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर विरोधी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २९९ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला केवळ २४६ धावांवरच हार मानावी लागली.
04 Nov 2025 09:11 AM (IST)
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात एक हत्येची घटना समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृतदेह त्यांच्याच घरी आढळून आले होते. याप्रकरणाची तपास पोलीस तपास करत होते. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. यांची हत्या दुसरं तिसरं कोणी नाही तर त्यांच्याच पोराने हत्या केल्याचे समोर आले आहे. आईवडील आपल्याला घरखर्च देत नाहीत, घरात राहू देत नाहीत याच रागातून हत्या दोन्ही मुलांनी केली. या घटनेने रायगड जिल्हा हादरला आहे.
Marathi Breaking news live updates: देशात 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामागे काळा पैसा समोर आणणे हा होता. मात्र, नोटाबंदीनंतर 9 वर्षे झाली असली तरी काळा पैसा पुन्हा चलनात आला असल्याचे म्हटले जात आहे. हा काळा पैसा अजूनही रिअल इस्टेट क्षेत्रात पसरलेला असल्याचे सांगण्यात आले आहे. जमीन/मालमत्तेसाठी केंद्रीकृत डेटाबेस तयार करण्याच्या सरकारी प्रयत्नांना अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. कारण ६२ टक्के मालमत्ता मालकांनी अद्याप त्यांच्या मालमत्ता आधारशी जोडलेल्या नाहीत.
सविस्तर वृत्त- नोटाबंदीच्या 9 वर्षांनंतरही देशात काळा पैसा अजूनही काळाच?






