• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Shivrajyabhiek Din 2025 06 June

Top Marathi News today Live : रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात पार

Marathi breaking live marathi headlines update Date : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 06, 2025 | 06:24 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking news live updates : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा ही सर्वांसाठी एक स्वर्गानुभूती आहे. 18 पगड जातीच्या मराठी लोकांच्या रक्ताने निर्माण झालेलं स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज हे मंचकावर विराजमान झाले. आज 351 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे. रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झाले आहेत. भगवा झेंडा हाती घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रायगड दुमदुमून गेला आहे.

The liveblog has ended.
  • 06 Jun 2025 06:03 PM (IST)

    06 Jun 2025 06:03 PM (IST)

    UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी!

    देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँकेच्या ग्राहकांना काही अडचणी येऊ शकतात या संदर्भात, बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बँकेने माहिती दिली आहे की 8 जून रोजी त्यांच्या UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) सेवेसह काही डिजिटल सेवा चार तासांसाठी बंद राहतील. भविष्यात ग्राहकांना चांगली सेवा मिळावी म्हणून सिस्टम अपग्रेड करण्यासाठी हे बंद केले जाईल. बँकेने ग्राहकांना त्यांचे महत्त्वाचे व्यवहार आधी किंवा नंतर करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये.

  • 06 Jun 2025 05:31 PM (IST)

    06 Jun 2025 05:31 PM (IST)

    रेपो रेट कपातीनंतर वधारतील ‘हे’ Bank, NBFC Stocks!

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने शुक्रवारी रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंट कपात जाहीर केली. यासह, रेपो रेट ५.५ टक्क्यांवर आला. २०२५ मध्ये तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करण्यात आली. गेल्या दोन वर्षात एकाच वेळी केलेली ही सर्वात मोठी दर कपात आहे. रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर, गृहकर्ज, वाहन कर्जे यांसारखी किरकोळ कर्जे स्वस्त होण्याची अपेक्षा आहे आणि EMI कमी होण्याची अपेक्षा आहे.

  • 06 Jun 2025 05:08 PM (IST)

    06 Jun 2025 05:08 PM (IST)

    ट्रक ड्रॉयव्हर्सची मज्जाच मज्जा ! Tata च्या ट्रक्समध्ये मिळणार 'ही' महत्वाची गोष्ट, प्रवास होणार आरामदायी

    टाटा मोटर्सने टाटाच्या ट्रक्समध्ये फॅक्टरी फिटेड एअर कंडिशनिंग सिस्टम लाँच केली आहे. यामुळे आता ट्रक ड्रायव्हर्सला वेगळे AC सिस्टम लावावे नाही लागणार. तसेच, त्यांच्या प्रवास देखील गारेगार होणार आहे. या AC सिस्टममध्ये Eco आणि Heavy मोड पाहायला मिळणार आहे.

  • 06 Jun 2025 04:59 PM (IST)

    06 Jun 2025 04:59 PM (IST)

    चिनाब पुलावरुन वंदे भारत धावणारी विहंगम दृश्ये

    चिनाब नदीवरील चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन पार पडले आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पुल असणाऱ्या चिनाबवरुन वंदे भारत एक्सप्रेस धावली आहे.

    🚨 Vande Bharat Train Crosses World's Highest Railway Bridge “Chenab Rail Bridge” On Jammu-Srinagar Route. 🇮🇳🚆 pic.twitter.com/xX0QBnK56v

    — Gems (@gemsofbabus_) June 6, 2025

  • 06 Jun 2025 04:53 PM (IST)

    06 Jun 2025 04:53 PM (IST)

    RBI च्या निर्णयांमुळे बाजारात तेजी

    आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवार (६ जून) रोजी सपाट पातळीवर उघडल्यानंतर भारतीय शेअर बाजार जोरदार वाढीसह बंद झाले. यासह, सलग तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात बाजारात वाढ झाली. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी करण्याच्या निर्णयामुळे शेअर बाजारात तेजी आली. आरबीआयने रेपो रेट ०.५०% ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ८१,४३४.२४ अंकांवर जवळजवळ स्थिर राहिला. तो उघडताच तो लाल रंगात घसरला.

  • 06 Jun 2025 04:50 PM (IST)

    06 Jun 2025 04:50 PM (IST)

    जम्मू-काश्मीमध्ये पंतप्रधानांनी फडकवला तिरंगा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर दौरा करुन चिनाब पुलाचे उद्घाटन केले आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पुल असणाऱ्या चिनाब पुलच्या उद्धाटनावेळी पंतप्रधानांनी हातात तिरंगा घेऊन फेरी मारली आहे.

    #WATCH | J&K: Prime Minister Narendra Modi waves the Tiranga as he inaugurates Chenab bridge - the world’s highest railway arch bridge.#KashmirOnTrack

    (Video: DD) pic.twitter.com/xfBnSRUQV5

    — ANI (@ANI) June 6, 2025

  • 06 Jun 2025 04:19 PM (IST)

    06 Jun 2025 04:19 PM (IST)

    ‘या’ आहेत RBI च्या रिपोर्टमधील महत्वाच्या तरतुदी

    जूनमध्ये झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.50% ने कमी करून 5.5% केला आहे. बदलत्या जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तसेच, स्थायी ठेव सुविधा (SDF) 5.25% पर्यंत कमी करण्यात आली आहे आणि सीमांत स्थायी सुविधा (MSF) आणि बँक दर 5.75% पर्यंत कमी करण्यात आला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, ही कपात आर्थिक वाढीला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.

  • 06 Jun 2025 04:18 PM (IST)

    06 Jun 2025 04:18 PM (IST)

    वेदांत ग्रुपच्या ‘या’ शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तुफानी वाढ

    वेदांत ग्रुपची उपकंपनी असलेल्या हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये आजही जोरदार वाढ झाली आहे. आज त्यांच्या शेअर्समध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर काल ते ६ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले होते. चांदीच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आणि वेदांत लिमिटेडने ५००० कोटी रुपयांचे निधी उभारल्याच्या बातमीनंतर त्यांच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे. वेदांतने याबद्दल एनएसई आणि बीएसईला माहिती दिली आहे. त्यानंतर गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी दिसून आली.

  • 06 Jun 2025 04:03 PM (IST)

    06 Jun 2025 04:03 PM (IST)

    कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण खिडक्या

    =

    गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के दिली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरु होणार आहे. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट कमी होणार आहे. अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानले आहेत.

  • 06 Jun 2025 03:22 PM (IST)

    06 Jun 2025 03:22 PM (IST)

    भारतीय संघाला झटका! विराट-रोहितनंतर 'या' खेळाडूचा क्रिकेटला राम राम.. 

    रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पूर्वीच टेस्ट क्रिकेटनधून निवृत्ती जाहीर केली आहे. तर आता  भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

    बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

  • 06 Jun 2025 03:21 PM (IST)

    06 Jun 2025 03:21 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम

    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत असून या महिन्यात पुन्हा पूर्ण वेतन देण्याइतका निधी सरकार कडून आलेला नाही. त्या मुळे त्यामुळे केवळ नक्त वेतन मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

  • 06 Jun 2025 03:11 PM (IST)

    06 Jun 2025 03:11 PM (IST)

    पुन्हा एकदा इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होणार ? भर पावसात गावकऱ्यांवर भितीचं सावट

    पळसदरी येथील  ठाकूरवाडीवर कधीही दरड कोसळतील अशा  स्थितीत आहेत.  याबाबत ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे.ते दगड हलवावेत यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एप्रिल2024 मध्ये तहसीलदार यांना अर्ज दिले होते. मात्र प्रशासन सहकार्य करीत नसल्याने वाडीवर कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड हलविण्यात आलेले नव्हते. सर्व दगड हलविण्यात वन जमिनीचा अडथळा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या पाहणी मध्ये स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेवटी तहसीलदार यांनी वन विभाग यांना ते दगड हटवण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर मौजे पळसदरी आदीवासीवाडी येथील टेकडीलगत पाहणी वन विभागाने केली आहे.

  • 06 Jun 2025 02:54 PM (IST)

    06 Jun 2025 02:54 PM (IST)

    बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी Virat Kohli च्या निकटवर्तीयासह चार जण अटकेत

    आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरी  प्रकरणी पोलिसांनी आरसीबीच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांसह ४ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. यातील एक जण हा विराट कोहलीच्या जवळचा असल्याचे बोलले  जात आहे.

  • 06 Jun 2025 02:24 PM (IST)

    06 Jun 2025 02:24 PM (IST)

    आदिशक्ती मुक्ताईची पालखी आषाढी वारीनिमित्त आज होणार प्रस्थान

    आदिशक्ती मुक्ताईची पालखी आषाढी वारीनिमित्त आज प्रस्थान होणार आहे. मुक्ताई मंदिरात मुक्ताईच्या पादुकांचा अभिषेक, विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडत आहेत. या पालखी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे उपस्थिती राहणार आहेत.

  • 06 Jun 2025 02:23 PM (IST)

    06 Jun 2025 02:23 PM (IST)

    रायगडवर मर्दानी खेळांना प्रोत्साहन

    किल्ले रायगड शिवराज्याभिषेक दिनी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. यावेळी गडावर मर्दानी खेळ सादर केले जात असून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रोत्साहन दिले.

    RAIGAD: किल्ले रायगड शिवराज्याभिषेक,मर्दानी खेळांना छ.युवराज संभाजी राजेंचे प्रोत्साहन#RaigadFort #ShivrajyabhishekSohla #MaharashtraNews pic.twitter.com/xVw45SA9YG

    — Navarashtra (@navarashtra) June 6, 2025

  • 06 Jun 2025 02:19 PM (IST)

    06 Jun 2025 02:19 PM (IST)

    रायगडाकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर अवजड वाहनांना बंदी

    शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हजारो लोक गडावर दाखल होत असतात यामुळे हा निर्णय होत आहे.

    RAIGAD : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर अवजड वाहनांना बंदी#Raigad #ShivRajyabhishek #RaigadFort #HeavyVehicleBan pic.twitter.com/P4AlzngY28

    — Navarashtra (@navarashtra) June 5, 2025

  • 06 Jun 2025 01:55 PM (IST)

    06 Jun 2025 01:55 PM (IST)

    दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं मत- संजय जामदार

    “ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे ही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. दोन पक्षांमध्ये सकारात्मक बोलणं चालू असेल तर ही गोष्ट चांगली आहे,” असं मनसेचे संजय जामदार म्हणाले.

  • 06 Jun 2025 01:01 PM (IST)

    06 Jun 2025 01:01 PM (IST)

    मिठी नदीतील गाळ काढण्याचा घोटाळा प्रकरणी चौकशी

    मिठी नदीतील गाळ काढण्याचा घोटाळा प्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापेमारी केली. आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचाराची कथित चौकशी ईडीचे अधिकारी करीत आहेत. नदीच्या स्वच्छता प्रकल्पाशी संबंधित कथित आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचारात झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी ईडी अधिकाऱ्यांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर टाकला छापा टाकला आहे

  • 06 Jun 2025 12:50 PM (IST)

    06 Jun 2025 12:50 PM (IST)

    प्रस्ताव आलाच नाही तर मान्य कसा करणार? - देशपांडे

    मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीची चिन्हे दिसून येत आहेत. मात्र शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला तर विचार करु. आता आम्ही ताक देखील फुंकून पिणार अशी भूमिका मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी घेतली आहे.

  • 06 Jun 2025 12:45 PM (IST)

    06 Jun 2025 12:45 PM (IST)

    राज्यातील ९०३ योजनांची मान्यता रद्द

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील ९०३ विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रगती न झालेल्या योजनांचा समावेश आहे. हा निर्णय मृद आणि जलसंधारण विभागामार्फत जाहीर करण्यात आला असून यामध्ये लघुपाटबंधारे योजना, कोअर पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती योजना अशा अनेक योजनांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून या योजनांची अंमलबजावणी रखडली होती.

  • 06 Jun 2025 12:36 PM (IST)

    06 Jun 2025 12:36 PM (IST)

    SwaRail App वरून रेल्वे तिकिट्स बुक होऊ शकतात का?

    हे अ‍ॅप फक्त अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांनाच वापरता येईल. अ‍ॅपच्या मदतीने ट्रेन तिकीट बुकिंग करता येते. पीएनआर स्टेटस तपासता येतो. या अ‍ॅपवर अनेक सेवा उपलब्ध असतील. तथापि, सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, ६ जून २०२५ रोजी हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, परंतु ते इन्स्टॉल करता येत नाही

  • 06 Jun 2025 12:13 PM (IST)

    06 Jun 2025 12:13 PM (IST)

    chenab bridge inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली चिनाब पुलाची पाहणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन करणार आहे. हा पुल जगातील सर्वात उंच रेल्वे पुल असणार आहे. पंतप्रधानांनी या पुलाची पाहणी केली आहे.

    #WATCH | J&K: Prime Minister Narendra Modi inspects Chenab Bridge. He will inaugurate the bridge shortly.

    Chenab Rail Bridge, situated at a height of 359 meters above the river, is the world's highest railway arch bridge. It is a 1,315-metre-long steel arch bridge engineered to… pic.twitter.com/IMf6tGOZH7

    — ANI (@ANI) June 6, 2025

  • 06 Jun 2025 11:32 AM (IST)

    06 Jun 2025 11:32 AM (IST)

    लाडक्या बहिणींनी पुन्हा घेतला सामाजिक न्याय मंत्रालयाचा निधी

    महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेवर राजकारण तापले आहे. मे महिन्याचा हप्ता अद्याप देण्यात आलेला नाही. दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या खात्याचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवला असल्याचा गंभीर आरोप केला.

  • 06 Jun 2025 11:28 AM (IST)

    06 Jun 2025 11:28 AM (IST)

    राज - उद्धव ठाकरेंची फोनवर चर्चा?

    आगामी स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • 06 Jun 2025 10:51 AM (IST)

    06 Jun 2025 10:51 AM (IST)

    राजगड किल्ल्यावर महिलेचा दुर्देवी मृत्यू

    पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या विवाहित महिलेचा बालेकिल्ल्यावरून पाय घसरल्याने १५० फुट दरीत कोसळून दुर्देवी मृत्यू झाला आहे.

  • 06 Jun 2025 10:40 AM (IST)

    06 Jun 2025 10:40 AM (IST)

    चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी गुन्हा दाखल

    बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी RCB संघ, DNA इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, KSCA प्रशासकीय समितीवर गुन्हा (क्रिमिनल नेग्लिजन्सी) दाखल करण्यात आला आहे.

  • 06 Jun 2025 10:38 AM (IST)

    06 Jun 2025 10:38 AM (IST)

    पंतप्रधान मोदी करणार चिनाब पुलाचे उद्धाटन

    जम्मू काश्मीरमधील सर्वांत उंच असणाऱ्या चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावरुन जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहे.

  • 06 Jun 2025 10:34 AM (IST)

    06 Jun 2025 10:34 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी दिल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी लिहिले आहे की, लोककल्याण व आत्मनिर्भरतेचे प्रतीक, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, प्रजाहितदक्षक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा! अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Marathi breaking news today live updates shivrajyabhiek din 2025 06 june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • daily news
  • Marathi News
  • Shivrajyabhishek

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी
2

World’s Most Unhappy Country : रडगाणं…दुःख अन् वेदना; जगातील ‘हे’ देश आहेत सर्वात जास्त दुःखी

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
3

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु
4

‘कोकण हार्टेड गर्ल’चा नवा प्रवास, अंकिता आणि कुणालचं प्रोडक्शन हाऊस सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश

अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश

व्हिडिओ

पुढे बघा
‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.