Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: ‘मी कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा निराधार, त्यात कोणतेही तथ्य नाही’; आदित्य ठाकरेंचे विधान

Marathi Breaking Live Updates : ग्रामीण ते ग्लोबल, देश-विदेश, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2026 | 07:07 PM
Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाऊ शकते. येत्या 19 जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, या सर्व वृत्तावर आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण देत मी कार्याध्यक्ष होणार असल्याच्या अफवा असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी २००३ मध्ये उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने कार्याध्यक्षपद देण्यात आले होते, त्याच धर्तीवर आदित्य यांची नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. यासाठी लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही वर्षांत आदित्य यांनी संघटनात्मक पातळीपासून ते निवडणूक व्यवस्थापनापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे त्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवी उभारी मिळेल आणि नव्या पिढीचे नेतृत्व पुढे येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

The liveblog has ended.
  • 16 Apr 2026 07:07 PM (IST)

    16 Apr 2026 07:07 PM (IST)

    MI vs PBKS Live: पीच रिपोर्टनुसार मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? श्रेयसने टॉस जिंकत…

    Tata IPL 2026 MI Vs PBKS Live Updates: थोड्याच वेळात मुंबई इंडियन्स अन् पंजाब किंग्जमध्ये (MI vs PBKS) आयपीएलचा सामना सुरू होणार आहे. 7.30 वाजता सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. हार्दिक पंड्या मुंबईचे नेतृत्व करत असून, त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 16 Apr 2026 06:57 PM (IST)

    16 Apr 2026 06:57 PM (IST)

    Women Reservation Bill: “विधेयकाला विरोध म्हणजे निवडणुकीत….”; संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना थेट इशारा

    Women Reservation Bill News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी लोकसभेत ‘महिला आरक्षण विधेयका’संदर्भात संबोधित केले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, आदर्श परिस्थितीनुसार जेव्हा ही संकल्पना २५ ते ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा पुढे आली होती तेव्हाच तिची अंमलबजावणी व्हायला हवी होती. तसे झाले असते, तर आजवर आपण या संकल्पनेला बऱ्याच अंशी परिपक्वतेच्या टप्प्यावर पोहोचवले असते. गरजेनुसार, वेळोवेळी आवश्यक त्या सुधारणाही यात करण्यात आल्या असत्या आणि खरोखरच, हाच तर लोकशाहीचा खरा सौंदर्यविशेष आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, “या विधेयकाला एकमताने मंजुरी मिळावी, अशी माझी इच्छा आहे.”

  • 16 Apr 2026 06:52 PM (IST)

    16 Apr 2026 06:52 PM (IST)

    कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, मजुरांचा मोठा तुटवडा; बाजारभावाचाही फटका

    पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढती उष्णता, मजुरांची टंचाई, वाढलेले मजुरी दर आणि बाजारपेठेत मिळणारा कवडीमोल भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक व मानसिक तणावाखाली आले आहेत. यासोबतच अवकाळी पावसाचे संकटही शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. तालुक्यात सर्वत्र कांदा काढणीची लगबग सुरू असली तरी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

  • 16 Apr 2026 06:47 PM (IST)

    16 Apr 2026 06:47 PM (IST)

    Nari Shanki Vandan : “देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक; CM देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले मत

    Women Reservation Bill : मुंबई : संसदेमध्ये महिला आरक्षणावर विधेयक सादर केले जात असून यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावर चर्चा करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन झाले होते पण त्यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ठोस इच्छाशक्ती दाखवली, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.

  • 16 Apr 2026 06:42 PM (IST)

    16 Apr 2026 06:42 PM (IST)

    कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट, मजुरांचा मोठा तुटवडा; बाजारभावाचाही फटका

    पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढती उष्णता, मजुरांची टंचाई, वाढलेले मजुरी दर आणि बाजारपेठेत मिळणारा कवडीमोल भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक व मानसिक तणावाखाली आले आहेत. यासोबतच अवकाळी पावसाचे संकटही शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. तालुक्यात सर्वत्र कांदा काढणीची लगबग सुरू असली तरी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

  • 16 Apr 2026 06:37 PM (IST)

    16 Apr 2026 06:37 PM (IST)

    Child SIM Card : लहान मुलांच्या मोबाईल वापरावर मोठा निर्णय; ‘या’ देशात सुरक्षित इंटरनेटसाठी मिळणार स्वतंत्र SIM Card

    Child SIM Card: आजच्या डिजिटल युगात सगळी माहिती फक्त एका क्लिकवर मिळते. पण याचा जसा फायदा आहे तसाच तोटा देखील आहे. खास करुन लहान मुलं जेव्हा इंटरनेट वापरतात तेव्हा पालकांना याची खूप भिती खूप असते. याचपार्श्वभूमीवर आता खास मुलांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुलं इंटरनेट हाताळताना कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊ नये यासाठी लहान मुलांना सुरक्षित सीम कार्ड दिलं जावं असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. फक्त सुरक्षित इंटरनेट नाही तर त्याचबरोबर काही फिचर्स देखील दिले जाणार आहेत.

  • 16 Apr 2026 06:32 PM (IST)

    16 Apr 2026 06:32 PM (IST)

    MI Vs PBKS Playing 11: पंजाबचे ‘वाघ’ मुंबई पलटणला पाणी पाजणार; रोहित शर्माच्या अनुपस्थितीत…

    Tata IPL 2026 MI vs PBKS Live Updates: मुंबई पलटण सध्या पराभवाच्या प्रवाहात वाहते आहे. आज संध्याकाळी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मॅच (MI vs PBKS) होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.  हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे तर श्रेयस अय्यर पंजाबचे नेतृत्व करत आहे.आज दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड आणि प्लेइंग 11 जाणून घेऊयात.

  • 16 Apr 2026 06:23 PM (IST)

    16 Apr 2026 06:23 PM (IST)

    Khanwadi School Case: चुकीची माहिती पसरवणे पडले महागात; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

    Pune News : पुणे : पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा’ प्रकरणी अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. शाळेसंदर्भात गैरवर्तन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत, जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रेणी-३ गोविंद हरिभाऊ लाखे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

  • 16 Apr 2026 06:16 PM (IST)

    16 Apr 2026 06:16 PM (IST)

    संसदेत हायव्होल्टेज ड्रामा! निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंचा नाव घेताच अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे संतापल्या

    Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात झालेल्या वादानंतर सभागृहातील वातावरण कमालीचे तापले. निशिकांत दुबेंनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करताच सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

  • 16 Apr 2026 06:03 PM (IST)

    16 Apr 2026 06:03 PM (IST)

    अबब! CSK च्या गोटात उडाली खळबळ; ‘हा’ प्रमुख खेळाडू IPL मधून बाहेर; कारण काय?

    Chennai Super Kings: आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. आज आयपीएलचा 24 वा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सलग 2 सामने जिंकून गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. पहिले तीन सामने चेन्नईने गमावले होते. त्यानंतर चेन्नईच्या संघाला सूर गवसला आहे. मात्र आता संघासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. चेन्नईचा प्रमुख गोलंदाज खलील अहमद हा खेळाडू पूर्ण स्पर्धेतून आउट झाला आहे. त्याबाबत माहिती जाणून घेऊयात.

  • 16 Apr 2026 05:53 PM (IST)

    16 Apr 2026 05:53 PM (IST)

    Love Jihad नंतर आता Lenskart मध्ये टिकली-टिळा लावण्यावर बंदी

    टाटांची आयटी कंपनी टीसीएसच्या नाशिक कार्यालयातील धर्मांतर आणि लव्ह जिहादवरून निर्माण झालेला वाद इतका वाढला की कंपनीला कार्यालय बंद करण्यास भाग पडले. कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर, टीसीएसने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास पाठवले आहे. नाशिक कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे. एका कॉर्पोरेट कंपनीमधील धर्मांतराच्या या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. हे प्रकरण अजून शमले नसतानाच, आयकेअर कंपनी लेन्सकार्टमध्ये एक नवीन वाद निर्माण झाला आहे. पियुष बन्सल यांच्या लेन्सकार्ट कंपनीतील कथित ‘ड्रेस कोड’वरून वाद निर्माण होत आहे.

     

  • 16 Apr 2026 05:24 PM (IST)

    16 Apr 2026 05:24 PM (IST)

    सातारा नगरपरिषदेला कूपर कॉर्पोरेशनचा सीएसआरमधून ट्रॅक्टर

    शहरातील स्वच्छता आणि हरित विकासकामांना गती देण्यासाठी कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि., सातारा यांनी आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत सातारा नगरपरिषदेला ट्रॅक्टर प्रदान केला. या ट्रॅक्टरच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कंपनीचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर फरोख कूपर व डायरेक्टर जाल कूपर यांच्या हस्ते नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष अॅड. डी. जी. बनकर यांच्याकडे ट्रॅक्टरची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रॅक्टरचे पूजन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

  • 16 Apr 2026 05:09 PM (IST)

    16 Apr 2026 05:09 PM (IST)

    RCB Vs LSG सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’वरून राडा,

    काल एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध एलएसजी (RCB Vs LSG) सामना झाला. या सामन्यात आरसीबीने एलएसजीवर दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला (Akash Chopra) आहे. मात्र या सामन्यामध्ये आता एक नव्या वादाला तोंड फुटले आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

    सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

  • 16 Apr 2026 04:50 PM (IST)

    16 Apr 2026 04:50 PM (IST)

    अनैतिक संबंधातून बुलढाण्यात तरुणाची खून करून आरोपी फरार

    बुलढाणा शहरातील जयस्वाल चौकात मंगळवारी रात्री उशिरा सागर उर्फ पप्पू जाधव वय वर्ष 38 याचा चाकूने खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना घडली याप्रकारे बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोनू जाधव राहणार भीलवाडा यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती सागर जाधव हा देखील या मिरवणुकीत सहभागी झाला होता मिरवणूक आटोपल्या नंतर रात्री साडे अकराच्या सुमारास घरी परतत असताना बाजारातील जयस्वाल चौक परिसरात त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला आरोपीने पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याने सागर गंभीर जखमी झाला सागरला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवि राठोड हे करीत आहेत.

  • 16 Apr 2026 04:45 PM (IST)

    16 Apr 2026 04:45 PM (IST)

    सिंधुदुर्गातील सर्वात मोठे एसटी स्टँड ‘विमानतळाच्या धर्तीवर’ उभारणार

    बरीच वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी एसटी बस स्थानकाचे काम बीओटी तत्त्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन महिन्यात आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे एसटी स्टँड असल्याने ते विमानतळाच्या धर्तीवर अद्ययावत असे असणार आहे. पुढील दोन वर्षात हे सावंतवाडी एसटी स्टँड उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी एसटी बसस्थानक परिसराची पाहणी केली.

  • 16 Apr 2026 04:40 PM (IST)

    16 Apr 2026 04:40 PM (IST)

    पवना प्रदूषणावर भोंडवे यांचे उपोषण मागे; महापौर रवी लांडगे यांची ठोस कारवाईची हमी

    पिंपरी-चिंचवडमधील पवना नदी प्रदूषणाचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रावेत-किवळे परिसरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनी सुरू केलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे.रावेत आणि किवळे परिसरातील अनेक सोसायट्यांचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाल्यांद्वारे पवना नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण गंभीर स्वरूप धारण करत आहे. या विरोधात लक्ष वेधण्यासाठी तुकाराम भोंडवे यांनी उपोषण सुरू केले होते. महापालिका प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत परिसरातील 6 प्रमुख प्रदूषित नाल्यांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, या नाल्यांतील सांडपाणी जवळील एसटीपी प्रकल्पात वळवून नाले प्रदूषणमुक्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.याशिवाय, प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नाल्यात सोडणाऱ्या सोसायटींवर कडक कारवाई करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.

  • 16 Apr 2026 04:35 PM (IST)

    16 Apr 2026 04:35 PM (IST)

    पंतप्रधान मोदींचा मास्टरस्ट्रोक; महिलांसाठी येणार नवा ऐतिहासिक कायदा! 

    देशाच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये दिल्ली येथे 26 तारखेला विशेष आदी उशीर घेतले जाणार असून महिलांविषयी नवीन कायदे या संसदेच्या सभागृहामध्ये मांडले जाणारा असून महिलांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी नवीन कायदे बनवले जाणार असून यामुळे महिलांना नवचेतना देणारा हा कायदा होणार असून राजकारण आणि विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा काम करण्याची संधी मिळणार असून. विकसित भारताच्या वाटचालीनुसार देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिलांसाठी नवीन कायदे करून त्यांना एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा दिली असे मत लातूर भाजपाच्या प्रवक्त्या प्रेरणादायी होनराव यांनी नवराष्ट्र शी बातचीत करताना व्यक्त केली.

  • 16 Apr 2026 04:30 PM (IST)

    16 Apr 2026 04:30 PM (IST)

    आता जनावरांचाही होणार थाट! मान्याचीवाडीत सुरू झाले हायटेक 'ब्युटी पार्लर'

    सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचाय महाराष्ट्रासह देशभरातून तब्बल ८२ पुरस्कार मिळवलेलं हे गाव. आता पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे चर्चेत आलं आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने लोकसभागातून महाराष्ट्रा पहिल्यांदाच जनावरांसाठी ‘ब्युटी पार्लर’ म्हणजेच अत्याधुनिक स्नानगृह सुरू केलं आहे. गावातील पाळीव जनावरांमुळे नदी-ओढ्यांमध्ये होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा अभिनव प्रयोग राबवण्यात आलाय. या स्नानगृहात शॉवर, स्वच्छ पाणी, घनकचराr व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे, आंघोळीनंतर निघणारं पाणी प्रक्रिया करून परसबागेसाठी वापरलं जातं…यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारत असताना पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळतेय. मान्याचीवाडीचा हा उपक्रम सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे

  • 16 Apr 2026 04:25 PM (IST)

    16 Apr 2026 04:25 PM (IST)

    सावंतवाडी एसटी बसस्थानक अद्ययावत करणार

    बरीच वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी एसटी बस स्थानकाचे काम बीओटी तत्त्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन महिन्यात आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे एसटी स्टँड असल्याने ते विमानतळाच्या धर्तीवर अद्ययावत असे असणार आहे. पुढील दोन वर्षात हे सावंतवाडी एसटी स्टँड उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी एसटी बसस्थानक परिसराची पाहणी केली.

  • 16 Apr 2026 04:20 PM (IST)

    16 Apr 2026 04:20 PM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्याला उन्हाचा तडाखा; जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज

    राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातही तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून, उन्हाच्या तीव्रतेने जिल्ह्याभरातील जनजीवन अक्षरशः होरपळून निघाले आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा रुग्णालयात विशेष 'उष्माघात कक्ष' स्थापन करण्यात आला आहे. आरोग्य प्रशासनाचे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाठक यांनी नागरिकांना वाढत्या उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. "उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका," असे त्यांनी सांगितले.उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हा रुग्णालयातील उष्माघात कक्षात आवश्यक औषधसाठा आणि उपचार सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

  • 16 Apr 2026 04:15 PM (IST)

    16 Apr 2026 04:15 PM (IST)

    डोंबिवलीतील भाजी मंडईवर मोठी कारवाई, 114 दुकानं सील

    डोंबिवली पूर्व स्टेशनबाहेरील उरसेकर वाडी परिसरातील मधुबन सिनेमासमोरील भाजी मार्केटच्या गळ्यावर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त भरत पवार, प्रसाद ठाकूर आणि मालमत्ता कर विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत एकूण ११४ दुकाने सील केली.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा मूळतः भाजी मार्केटसाठी वाटप करण्यात आली होती, परंतु अनेक व्यापाऱ्यांनी ओट्यावर कायमस्वरूपी दुकाने बांधून शटर लावले होते, जे नियमांच्या विरुद्ध आहे. या अनियमिततेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

  • 16 Apr 2026 04:10 PM (IST)

    16 Apr 2026 04:10 PM (IST)

    केडीएमच्या घंटा गाडीने व्यावसायिकाच्या घराला दिली धडक

    कल्याणच्या वडवली परिसरात केडीएमच्या कचरा गाडीने एका व्यावसायिकाच्या घराला जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही मात्र घराचा नुकसान झाला आहे. घर मालक नरेंद्र तरे यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे. केडीएमचा कचरा गाडीचा चालक मद्यधुंद होता.गाडीवर कोणत्याही प्रकारची नंबरप्लेट नव्हती या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • 16 Apr 2026 04:01 PM (IST)

    16 Apr 2026 04:01 PM (IST)

    RTE प्रवेशात गोंधळ! पालकांच्या लांब रांगा

    वसई विरार शहरात आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली असून चूळणे येथील जिल्हा परिषद शाळेत अर्जांची पडताळणी सुरू आहे. मात्र, टोकन वितरण न झाल्यामुळे पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रवेश केंद्राबाहेर सकाळपासूनच पालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नियोजनाच्या अभावामुळे पालकांना त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष देत तातडीने योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

  • 16 Apr 2026 03:50 PM (IST)

    16 Apr 2026 03:50 PM (IST)

    शिरूर लोकसभा मतदारसंघातून ‘गायब’ खासदार मिसळ पार्टीत?

    रांजणी /रमेश जाधव : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघातून गायब असल्याची चर्चा रंगत असतानाच ते ‘मिसळ पार्टी’त दिसल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खमंग पण तितकीच संतप्त चर्चा रंगली आहे. अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून खासदारांनी ‘मिसळीचा आस्वाद’ घेतल्याची टीका होत असून, “हीच का जनतेप्रती जबाबदारी?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

  • 16 Apr 2026 03:40 PM (IST)

    16 Apr 2026 03:40 PM (IST)

    Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर!

    छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढतच आहे. मंगळवारी (१४) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४१, ४ अंश सेल्शियसची नोंद झाली आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने शहरवासीयांनी काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. प्रशासनानेदेखील उष्माघात रुग्णांसाठी आवश्यक तयारी केली असून, महापालिका, घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयसह जिल्हाभरातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यातच अवकाळी पावसाचाही अंदाज व्यक्त झाला असून, प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 16 Apr 2026 03:20 PM (IST)

    16 Apr 2026 03:20 PM (IST)

    Samsung Galaxy Z Flip 4 वर जबरदस्त सूट! 95 हजारांचा फोन आता फक्त 38 हजारात

    जर तुम्ही प्रीमियम फ्लिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या ऑनलाइन मार्केटमध्ये Samsung च्या लोकप्रिय Galaxy Z Flip 4 या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात असून, हा फोन लॉन्च किमतीपेक्षा तब्बल हजारो रुपयांनी स्वस्त मिळत आहे. Amazon वरील या खास ऑफरमुळे ग्राहकांना प्रीमियम फीचर्स असलेला फ्लिप फोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

  • 16 Apr 2026 03:15 PM (IST)

    16 Apr 2026 03:15 PM (IST)

    काय सांगता! मोर आणि किंग कोब्रा दोघेही आले आमने-सामने

    सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकार व्हायरल होत असतात. इथे कधी धक्कादायक दृष्ये शेअर केली जातात, कधी हास्यास्पद तर कधी आश्चर्यकारक दृष्ये शेअर होतात. इथे फक्त माणसांचेच नाही तर प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ शेअर होतात. असाच एक व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक मोर आणि किंग कोब्रा आमने-सामने आल्याचे दिसले. दोन्हीही जंगलातील लोकप्रिय प्राणी आहेत पण त्यांचा स्वभाव मात्र एकसारखा नाही. मोर दिसायला सुंदर, मनमोहक दिसतो. पावासाळ्यातच जेव्हा तो नाचतो तेव्हा ते दृष्य पाहण्यासारखे ठरते. याउलट किंग कोब्रा हा जंगलातील एक धोकादायक प्राणी आहे त्याला पाहताच प्राण्यांचीच काय तर माणसांचीही पळता भुई एक होते. आता किंग कोब्राची अनेक प्राण्यांसोबतची लढाई तुम्ही पाहिली असेल पण एका मोरासमोर किंग कोब्रा काय करतो हे पाहणं मात्र मनोंरजक वळण घेते. चला दोन्ही प्राणी समोरसमोर आल्यानंतर नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

  • 16 Apr 2026 03:15 PM (IST)

    16 Apr 2026 03:15 PM (IST)

    Russia-Ukraine War: 700 ड्रोन, क्षेपणास्त्रांनी रशियाचा महाभयंकर प्रहार

    Russia Ukraine War latest Kyiv attack : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War Update) यांच्यातील संघर्षाने आतापर्यंतचे सर्वात भीषण आणि अघोरी स्वरूप धारण केले आहे. बुधवारी रात्री रशियाने युक्रेनची राजधानी कीव आणि आजूबाजूच्या शहरांवर जो हवाई हल्ला केला, तो केवळ लष्करी कारवाई नसून मानवतेचा थरकाप उडवणारा विनाश होता. ७०० ड्रोन आणि डझनभर घातक क्षेपणास्त्रांच्या वर्षावामुळे कीवमधील इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या असून, रशियाच्या या ‘मिसाईल पावसा’ने पुन्हा एकदा जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे.

  • 16 Apr 2026 03:06 PM (IST)

    16 Apr 2026 03:06 PM (IST)

    8th Pay Commission: 18000 ची बेसिक सॅलरी होणार 69,000?

    सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना येत्या काही वर्षांत त्यांच्या पगारात आणि लाभांमध्ये मोठे बदल दिसू शकतात. कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. त्यात किमान वेतनात अनेक पटींनी वाढ करण्याची आणि निवृत्तीवेतनापासून ते रजेपर्यंत सर्वच बाबींमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

  • 16 Apr 2026 02:40 PM (IST)

    16 Apr 2026 02:40 PM (IST)

    लोकसभा गाजणार! सत्ताधाऱ्यांकडून अमित शाह तर विरोधकांकडून प्रियांका गांधी भिडणार

    संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून महिलांच्या आरक्षणावर विधेयक मांडण्यात येणार आहे. महिला आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय या विशेष अधिवेशनमध्ये घेण्यात येणार आहे.यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या विधेयकांकडे लागले आहे. यामध्ये तीन विधेयक मांडण्यात आली आहेत.(Parliament News) यामध्ये संसदेच्या जागा ५४३ वरून ८५०, मतदारसंघांची पुनर्रचना विधेयक तसेच नारी शक्ती वंदन विधेयक मांडण्यात येणार आहे. यामुळे पुढील तीन दिवस संसदेमध्ये जोरदार राजकीय वाद-विवाद होणार आहे.

  • 16 Apr 2026 02:25 PM (IST)

    16 Apr 2026 02:25 PM (IST)

    ‘ते’ न उघडलेलंच बरं! सोन्याचा हव्यास अन् जीवाशी खेळ… अभिनेता संदीप पाठक आणि ‘घबाडकुंड’

    अभिनेता संदीप पाठक हा मराठी चित्रपटसृष्टीतील वेगळ्या धाटणीचे कलाकार म्हणून ओळखले जातो. तो नेहमीच चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठकचं नाव आवर्जून घेतलं जातं. विनोदी असो किंवा गंभीर भूमिका, त्या दोन्ही प्रकारांमध्ये तो तितक्याच ताकदीने अभिनय करतो. त्यामुळे त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.त्याच्या विविध भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्याचा अभिनय नेहमीच आवडतो आणि तो कायम चर्चेत राहतो

  • 16 Apr 2026 02:20 PM (IST)

    16 Apr 2026 02:20 PM (IST)

    जागतिक तेल बाजारात भूकंप? इराणच्या तेल खरेदीवरून अमेरिका आणि चीनमध्ये जुंपली, वाचा सविस्तर अपडेट

    जागतिक राजकारणात सध्या एका मोठ्या आर्थिक युद्धाची ठिणगी पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी आपले सर्वात शक्तिशाली अस्त्र बाहेर काढले आहे. अमेरिकेने आता थेट चीनला लक्ष्य करत, इराणकडून तेल खरेदी न करण्याचा कडक इशारा दिला आहे. चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असल्याने, या निर्णयाचा परिणाम केवळ या दोन देशांवरच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

  • 16 Apr 2026 02:15 PM (IST)

    16 Apr 2026 02:15 PM (IST)

    महिला आरक्षणाच्या आडून सत्ताधाऱ्यांची राजकीय चाल? ‘हे’ मुद्दे चर्चेत

    संसदेमध्ये महिलांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात असून ही मोदी सरकार काळातील एक महत्त्वाची बाब असणार आहे. केंद्र सरकार २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी संसद आणि राज्य विधानसभांमध्ये ३३% महिला आरक्षण लागू करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहे. (Parliament Of India) आजपासून (दि.16) सुरू झालेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात, सरकारने नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणारी तीन विधेयके सादर केली.

  • 16 Apr 2026 02:10 PM (IST)

    16 Apr 2026 02:10 PM (IST)

    बेंगळुरू हादरलं! जन्मदात्या मुलानेच अर्धांगवायूग्रस्त आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं; आईचा त्रास बघवत…

    बेंगलोर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या ७५ वर्षांच्या वृद्ध आणि अर्धांगवायू ग्रस्त असलेल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून त्याने कबुलीत असा जबाब दिला की ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 16 Apr 2026 02:00 PM (IST)

    16 Apr 2026 02:00 PM (IST)

    हाफिज सईदचा ‘उजवा हात’ लाहोरमध्ये रक्ताच्या थारोळ्यात

    पाकिस्तानच्या लाहोरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताविरुद्ध सतत विष ओकणारा आणि लश्कर-ए-तोयबाचा (LeT) संस्थापक सदस्य अमीर हमजा (Amir Hamza) याला अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. लाहोरमधील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हमजावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमजाचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादी गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • 16 Apr 2026 01:55 PM (IST)

    16 Apr 2026 01:55 PM (IST)

    ”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा

    मिरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातील राजकारणात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहत त्यांनी एका युट्युब चॅनल वर केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. या पत्रात पूर्वेश सरनाईक यांनी मेहता यांच्या “प्रताप सरनाईक मेरे ड्रायव्हर होते” या वक्तव्याचा उल्लेख करत, ते अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे असल्याचे म्हटले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र त्यामध्ये सभ्यता आणि मर्यादा पाळणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

  • 16 Apr 2026 01:50 PM (IST)

    16 Apr 2026 01:50 PM (IST)

    बेंगळुरू हादरलं! जन्मदात्या मुलानेच अर्धांगवायूग्रस्त आईला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं

    बेंगलोर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ४२ वर्षीय व्यक्तीने आपल्या ७५ वर्षांच्या वृद्ध आणि अर्धांगवायू ग्रस्त असलेल्या आईला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून त्याने कबुलीत असा जबाब दिला की ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 16 Apr 2026 01:45 PM (IST)

    16 Apr 2026 01:45 PM (IST)

    सोन्याचा हव्यास अन् जीवाशी खेळ… अभिनेता संदीप पाठक आणि ‘घबाडकुंड’

    अभिनेता संदीप पाठक हा मराठी चित्रपटसृष्टीतील वेगळ्या धाटणीचे कलाकार म्हणून ओळखले जातो. तो नेहमीच चाकोरीबाहेरील विषयांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेता संदीप पाठकचं नाव आवर्जून घेतलं जातं. विनोदी असो किंवा गंभीर भूमिका, त्या दोन्ही प्रकारांमध्ये तो तितक्याच ताकदीने अभिनय करतो. त्यामुळे त्याने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.त्याच्या विविध भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्याचा अभिनय नेहमीच आवडतो आणि तो कायम चर्चेत राहतो

  • 16 Apr 2026 01:40 PM (IST)

    16 Apr 2026 01:40 PM (IST)

    ‘कैसा हराया’ फेम AIMIM ची नगरसेविका सहर शेख नॉटरिचेबल; वडीलही गायब

    केवळ ठाण्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा राजकीय स्फोट झाला आहे. महाराष्ट्रातील ठाणे-मुंब्रा येथे प्रसिद्ध झालेल्या आणि ‘कैसा हराया’ या सोशल मीडियावरील टीकेमुळे चर्चेत आलेल्या नगरसेविका सहार शेख आता त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून वादात सापडल्या आहेत. सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी सहार शेख यांच्यावर त्यांचे वडील युनूस इक्बाल शेख यांच्याकडून बनावट ओबीसी जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला आहे. यामुळे एआयएमआयएमच्या नगरसेविका सहर शेख मोठ्या वादात सापडल्या आहेत. तर दुसरीकडे शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आल्यानंतर आता सहर शेख नॅाट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 16 Apr 2026 01:35 PM (IST)

    16 Apr 2026 01:35 PM (IST)

    सातारा जिल्हापरिषद सभेकडे सर्वांच्याच नजरा; सभा शांततेत होणार की वादळी होणार?

    सातारा जिल्हा परिषदेच्याअध्यक्ष-उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीच्या नाट्यानंतर शुक्रवारी दुपारी २ वाजता पहिली विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. ही सभा वादळी होणार का? विरोधकांची भूमिका काय राहणार? याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात उत्सुकता आहे. या सभेत विविध स मित्यांसाठी सदस्यांच्या निवडी होणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा होणार आहे. सभेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना या सभेसाठी आपल्या विभागाचा लेखाजोखा घेऊनच बसावे लागणार आहे.

  • 16 Apr 2026 01:25 PM (IST)

    16 Apr 2026 01:25 PM (IST)

    अमित शाह यांचे अखिलेश यादव यांना सडेतोड प्रत्युत्तर

    महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर आज (16 एप्रिल) संसदेत महत्त्वाची चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ३ वाजता लोकसभेत या विधेयकावर बोलणार आहेत. गृहमंत्री अमित शाह महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेला प्रतिसाद देतील. लोकसभेत १६ आणि १७ एप्रिल रोजी या विषयावर चर्चा होईल, त्यानंतर मतदान होईल. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेसाठी एकूण १८ तासांचा वेळ देण्यात आला आहे.

  • 16 Apr 2026 01:15 PM (IST)

    16 Apr 2026 01:15 PM (IST)

    ‘एक सैनिक = 1 अब्ज डॉलर्स’, मोजतबा खामेनीचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई गर्जले

    जागतिक राजकारणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक ठिणगी पडली आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव (US-Israel Iran War) आता केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता थेट ‘खंडणी’ आणि ‘ओलीस’ ठेवण्याच्या धमकीपर्यंत पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचे लष्करी सल्लागार मोहसेन रझाई यांनी अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे की, जर अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केला, तर इराण हजारो अमेरिकन सैनिकांना पकडून त्यांच्या बदल्यात अब्जावधी डॉलर्सची खंडणी वसूल करेल.

  • 16 Apr 2026 01:09 PM (IST)

    16 Apr 2026 01:09 PM (IST)

    Meta ने आणले स्मार्ट ग्लासेस; फोटो अन् व्हिडिओही आता काढता येणार

    सध्या अनेक टेक्नॉलॉजी समोर येत आहे. त्यातच मेटाने आपला नवीन एआय-सक्षम स्मार्ट ग्लासेस, ‘रे-बॅन मेटा ऑप्टिक्स स्टाईल्स’ लाँच केला आहे. हे स्मार्ट ग्लासेस कंपनीचे, चष्म्याच्या नंबरवर वापरण्यासाठी डिझाइन केलेले पहिले ऑप्टिकल स्टाईल्स आहेत. हे ग्लासेस एस्सिलॉरलक्सोटिकाच्या पार्टनरशिपमध्ये आणला गेला आहे. हे ग्लासेस आरामदायी आणि गरजेनुसार बदल करता येतील अशाप्रकारे डिझाईन केलेले आहेत.

  • 16 Apr 2026 01:02 PM (IST)

    16 Apr 2026 01:02 PM (IST)

    पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार

    वाकी बुद्रुक येथील भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत बनावट दस्तऐवज तयार करून ६ कोटी ५३ लाख ९२ हजार ४२ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सन २०१३-१४ ते २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये पतसंस्थेच्या वाकी बुद्रुक येथील कार्यालयात घडली. या प्रकरणी सुनील मथुरा काळे (५५, धनकवडी, पुणे) यांनी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामदास हिरामण कड, तुकाराम पिराजी टोपे, किसन सोपान गारगोटे, बाळासाहेब पंडित गारगोटे, रवींद्र नामदेव गारगोटे, अनिल गोविंद टोपे यांसह एकूण ३६ संचालक आणि इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 16 Apr 2026 12:45 PM (IST)

    16 Apr 2026 12:45 PM (IST)

    सिमेंटच्या गट्टूने प्रहार करत तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न

    नेहरुनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नेहरुनगर येथील पवार पेट्रोल पंपाशेजारील बालाजी ट्रेडर्ससमोर घडली. या प्रकरणी दानिश आरिफ शेख (१८, नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहाबाज उर्फ टिपू शहा (३०, नेहरुनगर, पिंपरी), इर्रशाद शहा (३२, भोसरी), सूरज उर्फ आसिफ शेख (२१, नेहरुनगर, पिंपरी) आणि रामा दुर्गाअप्पा चौधरी (२५, नेहरुनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 16 Apr 2026 12:30 PM (IST)

    16 Apr 2026 12:30 PM (IST)

    पुणे जिल्हा सायबर भामट्यांच्या निशाण्यावर

    विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्हा आता सायबर गुन्हेगारांच्या रडारवर आला आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण या तिन्ही पोलीस दलांच्या हद्दीत सायबर चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सुमारे १,७७५ कोटी रुपयांची लूट केली आहे. २०२६ च्या पहिल्या साडेतीन महिन्यांतच 'शेअर बाजार' आणि 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली शेकडो कोटी रुपये लुटले गेले आहेत.

  • 16 Apr 2026 12:12 PM (IST)

    16 Apr 2026 12:12 PM (IST)

    जनता महायुतीला माफ करणार नाही; हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा

    महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत आहे. राजकीय आशिर्वादामुळेच ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • 16 Apr 2026 12:00 PM (IST)

    16 Apr 2026 12:00 PM (IST)

    अथणी-रयत शुगर्सचा वाढीव क्षमतेने हंगाम यशस्वी; ‘इतके’ कोटी शेतकऱ्यांची खात्यात जमा

    शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाचे (Sugarcane News) बिल थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करून विश्वासार्हतेची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले. उगवलेल्या सोन्यासारख्या पिकाचे योग्य भाव मिळाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

  • 16 Apr 2026 11:55 AM (IST)

    16 Apr 2026 11:55 AM (IST)

    ‘धैर्यहीन नेत्या!’ ट्रम्प आणि मेलोनींची ‘केमिस्ट्री’ बिघडली; इटलीच्या ‘या’ एका निर्णयाने अमेरिका संतापली

    जागतिक राजकारणातील सर्वात चर्चेत असलेली डोनाल्ड ट्रम्प आणि जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांची मैत्री आता संपुष्टात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. इराणविरुद्धच्या युद्धात इटलीने अमेरिकेला (America) साथ देण्यास नकार दिल्याने हे दोन्ही नेते आता एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. एकेकाळी एकमेकांचे कट्टर समर्थक असलेले हे नेते आता एकमेकांवर वैयक्तिक टीका करत आहेत, ज्यामुळे पाश्चात्य देशांच्या युतीमध्ये मोठी फूट पडली आहे.

  • 16 Apr 2026 11:50 AM (IST)

    16 Apr 2026 11:50 AM (IST)

    स्पर्धा परीक्षांच्या २०० पुस्तकांचे वाटप! पोलिस अधिकारी पाटील यांचा पुढाकार

    “वाचाल तर वाचाल” हा संदेश B. R. Ambedkar यांनी दिला असून, त्याचे महत्त्व आजच्या तरुण पिढीसाठी अधिक अधोरेखित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ या संकल्पनेतून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०० पुस्तकांचे मोफत वाटप केले. सुमारे २८ हजार रुपयांच्या या पुस्तकांचे वितरण भीमजयंतीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले.

Web Title: Marathi top news marathi breaking live updates international news live updates national news crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Marathi Breaking
  • Navarashtra Live Updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.