शरद पवार, छगन भुजबळ एकाच मंचावर, हास्यसंवाद, चर्चा अन् बरचं काही
मुंबई: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी महाविकास आघाडीतील वातावरण अगदी ढवळून निघालं आहे. त्यातच आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली. यावळी मतदार यादीतील घोटाळा, वाढलेली मते , ईव्हीएममधील अफरातफर, पराभूत उमेदवारांचे निकालयासंदर्भात शरद पवार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघवी यांच्यासोबत कायदेशीर बाबींवर चर्चा कऱण्यात आली. त्यानंतर येत्या एक-दोन दिवसांत हे पराभूत उमेदवार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात,अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे रमेश बागवे, हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप वार्पे, खडकवासल्याचे सचिन दोडके, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट,यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर आज रात्रीदेखील शरद पवार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.तसेच, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनुसिंघवी यांच्यासोबतही बैठक होण्याची शक्यता आहे.
२०२४ मध्ये जगभरात ‘या’ गंभीर रोगांनी केला होता कहर, जाणून घ्या कोणते आहेत गंभीर
दरम्यान, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. माळशिरसमधील मारकटवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मॉक पोल घेण्याचा निर्णय घेतला होता. पण ऐनवेळी पोलिसांनी गावात जमावबंदी लागू करत हे म़ॉकपोल होऊ दिले नाही. त्यानंतर उत्तमराव जानकरांनी आमदराकीचा राजीनामा देयाची तयारीही दशर्वली होती.
त्यानंतर, राज्यभऱातील अनेक गावांमधून ईव्हीएमबाबत संशय व्यक्त होऊ लागला. ईव्हीएमबाबत राज्यात संशयाचं वार घोंगावत असतानाच शरद पवार यांनीदेखील थेट मारकटवाडीत सभा घेतली. ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांची मतेही जाणून घेतली. त्यावर लाखाचा फरक पडत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण यानंतर होणारी निवडणूक बॅलेट पेपवर घेतली पाहिजे, अशी मागणीही जानकरांनी यावेळी केली.
बॅटरी चोरायला गेला अन् जाळ्यात अडकला, नागरिकाने पाठलाग करुन पकडलं
दुसरीकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्राच राजकारण आणि आगामी दिशा, संघटनाक्मक बदलांबाबत चर्चा झाली. पण राज्यात सगळ्यांच्या मनात शंका, संशय आहे. भाजपला एवढी मते कशी मिळू शकता. अनेक गावांमध्ये संशयाचे वातावरण आहे, त्यांना बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आहे. अशी मागणी करत आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात जायचं की नाही, यावर अद्याप निर्णय झालेला नाही, पण ईव्हीएमवर शंका असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला काय अडचण आहे. असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.