संग्रहित फोटो
पुणे : गाडीची छेडछाड करून चोरी करत असताना चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्याला नागरिकाने पकडले. तर त्याचे तीन साथीदार पसार झाले. रविवारी हा प्रकार येरवडा येथील आंबेडकर सोसायटी परिरातील दशमेश मोटर्स येथे घडला. यावेळी आरोपीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नागरिकाने बचाव करताना त्यांच्या हातातील रॉड आरोपीला लागला. त्यात तो जखमी झाला. याप्रकरणी ऋषीकेश सुरेश येवले (वय २३, रा. डोंगरगणी, ता. पाटोदा, जि. बीड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. तर त्याचे तीन साथीदार पसास झाले. याबाबत डोंगरसिंग चमकावर सिंग (वय २५, रा. अर्जुन मार्ग, खडकी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या ऑफीससमोर विक्रीसाठी कार उभ्या असतात. मध्यरात्री दोनच्या सुमारास येवले हा गाडीसोबत छेडछाड करून चोरी करताना दिसला. त्याचा पाठलाग करून त्याला तक्रारदारांनी हटकले. तेव्हा चोरटे पळाले. त्यांनी पाठलाग सुरू केला. येवले याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने हाताने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तक्रारदारांनी बचाव करताना त्यांच्या हातातील रॉड येवले याला लागला. यात तो जखमी झाला. मात्र त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात सराफी दुकानातून लूट; पिस्तुलाचा धाक दाखवला अन्…
नवी पेठेतील बंगला फोडला
पुण्यात चोेरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नवी पेठेत चोरट्यांनी बंगला फोडून चोरट्यांनी ४ लाख ८६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समीर सुधाकर देशमुख (वय ४६, रा. आनंद बंगला, लक्ष्मीकृपा सोसायटी, नवी पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, देशमुख कुटुंबीय मंगळवारी रात्री बाणेर येथील नातेवाईकांकडे गेले होते. ते राहण्यास नवी पेठेतील रामबाग कॉलनीत आहेत. बुधवारी सकाळी देशमुख कुटुंबीय नातेवाईकांकडून परतले. तेव्हा दरवाज्याचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून ४ लाख ८६ हजारांचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक खाडे करत आहेत.