चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार (फोटो- सोशल मिडिया)
सांगली: राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक महत्वाचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. संपूर्ण राज्यभरातून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडचिट्ठी देत आहेत. मुंबई, कोकण, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्र परिसरात देखील उद्धव ठाकरेना धक्का बसण्याचा अंदाज आहे. सांगली लोकसभेत उभेअसणारे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे ठाकरेना रामराम ठोकण्याची शक्यता आहे.
येत्या सोमवारी सांगली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना हा पक्षप्रेवश थांबवून दाखवावा असे आव्हान दिले आहे. सांगली लोकसभेची निवडणूक चांगलीच चर्चेची राहिली. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या विशाल पाटील यांची गोची झाली.
मात्र विशाल पाटील हे अप्सकः निवडणूक लढले आणि विजयी झाले. त्यामुळे अंतर्गत वादामुळे सांगली लोकसभेत ठाकरे गटाचा म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. दरम्यान ज्या चंद्र्हार पाटलांची ठाकरे गटाने महाविकास आघाडीत काँग्रेसशी वितुष्ठ घेतले तेच पाटील आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान आता हा पक्ष प्रवेश थांबवून दाखवावा असे आव्हान संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.
चंद्रहार पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे सांगली लोकसभेचे उमेदवार होते. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरीचे विजेते आहेत. मागच्या महिन्यात चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. हि भेट कुडाळ येथे झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी मंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती.
हकालपट्टी होताच बडगुजर उद्धव ठाकरेंवर कडाडले
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik)उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी स्वत: नाराज असल्याचे सांगितले होते. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकऱणी बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे ठाकरे गटाने सांगितले आहे. आता यावर सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sudhakar Badgujar: “… तर मी हा गुन्हा केलाय? हकालपट्टी होताच बडगुजर उद्धव ठाकरेंवर कडाडले
ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी कैवल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षामध्ये नाराज असल्यावर ती नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा असल्यास तो मी केला आहे. त्या गुन्ह्याच्या शिक्षेचे रूपांतर हकालपट्टीमध्ये झाले तर त्यावर मी काय उत्तर देणार? मी पक्षाविरुद्ध कोणतेही वक्तव्य केलेले संघटनात्मक बदल झाले त्यावर मी भाष्य केले. नाराजी व्यक्त करणे याची शिक्षा गुन्हा असेल तर मी केला आहे.”