कल्याण : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. भाजप आमदार गणपत गायकवाड व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेकदा शिवसेना शिंदे गटाकडून भाजपाला डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती. गणपत गायकवाड यांनी अनेकदा आक्रमकपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देखील दिलं होतं. त्यामुळे कल्याण पूर्व मतदार संघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ नेत्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आजही धुसफूस कायम असल्याचे दिसून येतेय. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघात राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनात स्थानिक आमदार म्हणून मला डावलण्यात येत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना आमदार गायकवाड यांनी राज्य सरकारच्या निधीतून विकास कामाचे उद्घाटन होत असेल त्या ठिकाणी आमदारांचे नाव तिथे पाठीवर पाहिजे. मात्र जाणीवपूर्वक माझं नाव टाकलं जात नसल्याचा आरोप केला. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढे बोलताना ही खंत नेहमीच असणार अशा पद्धतीने राजकारण चालत नाही. राज्य शासनाचा निधी येतो त्यासाठी आमदारांचा पाठपुरावा असतो त्यावर आमदारांचा अधिकार असतो. पण तिथे खासदार सुद्धा उद्घाटनला येत नाहीत. खासदारांचे कार्यकर्ते जाऊन उद्घाटन करतात. संबंधित विभागाचे अधिकारी प्रेशर असल्याने त्या ठिकाणी उद्घाटनाला येत नाही असा उद्घाटन करत मतदारसंघात चालढकल सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेमध्ये वर्चस्व असल्याने डावलला जात असल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र पुढे बोलताना गणपत गायकवाड यांनी माझं वर्चस्व आजही होतं कालही होतं आणि पुढेही राहणार, जोपर्यंत लोक मला आमदार म्हणून निवडून देतात तिथपर्यंत माझं वर्चस्व राहणार. मी विकास काम थांबवली अशी लोकांची दिशाभूल केली जाते. मात्र निवडणुकीच्या वेळेला विकास काम कोणी थांबवली याचे उत्तर देईल. त्यामुळे लोकांना सुद्धा अंदाज येईल, विकास काम थांबवली असं मोठ्या नेत्यांनी बोललं पाहिजे कोणता एक माणूस उठून बोलत असेल तर त्याला मी उत्तर देणार नाही. मोठ्या नेत्यांनी बोलला तर नक्कीच उत्तर देईल असा इशारा अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला.
काल उद्धव ठाकरे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा होता. या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल सांगितलं होतं. या बाबत बोलताना आमदार गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंनी कोणतीही सभा घ्या, या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून येतील, कारण भाजपच्या युतीमध्ये जो कुणी उमेदवार असेल आणि पक्षश्रेष्ठी ज्यांना तिकीट देतील तोच उमेदवार या मतदारसंघात निवडून येणार असल्याचे प्रतिउत्तर ठाकरे यांना दिले.