उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (फोटो- सोशल मीडिया)
पुन्हा एकदा मालवणमध्ये फडकवला शिवसेनेचा झेंडा
मालवण, कुडाळमध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम
कोकणात महायुतीने जिंकल्या सर्वाधिक जागा
संजय वालावलकर/मालवण: शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांची एकसंध शिवसेना असताना मालवण शहर आणि तालुका हा नेहमीच शिवसेनेच्याच पाठीशी राहिला होता. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता झालेल्या नगरपरिषदेच्या या निवडणुकीमध्ये महायुती तुटल्यामुळे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात स्वतंत्र लढती झाल्या. पैशाचा पाऊस पडूनही मालवणवासीय मतदारांनी आपला कौल शतप्रतिशत शिवसेनेलाच असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
तालुक्यात शिवसेनेचे संघटन झाले अधिक मजबूत
बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेचे संघटन अजूनही लोकांच्या मनामध्ये भिनली असल्यामुळे उद्धव शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना नसली तरी मालवण शिवसेनेचेच राहिले असल्याचा शिक्कामोर्तब नगर परिषदेच्या निवडणुकीवरून दाखवून दिले आहे. ग्रामीण भागातही मालवण आणि कुडाळ या दोन्ही तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे, कोकण म्हटले की शिवसेना है समीकरण आहे. मध्यंतरीच्या काळात शिवसेना दुभंगल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिदे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी राज्यात आणि कोकणात शिवसेना जोमाने वाढविण्यासाठी प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव झाला.
लढणाऱ्या स्वबळावर भाजपला मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीत भाजपात असलेले निलेश राणे यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदे
याच्याकडून तिकीट मिळविले आणि विजयश्रीही खेचून आणली. निलेश राणे यांनी कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघात कुडाळ नगरपरिषद आपल्या ताब्यात ठेवली, त्याच दरम्यान नुकत्याच झालेल्या मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा त्यानी शत
प्रतिशत शिवसेना मालवणमध्ये असल्याचे व ताकद पणाला लावत शिंदे शिवसेनेला प्रमाणात बळ देत मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकवला, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने १० जागासह नगराध्यक्ष पदावर कब्जा मिळवत
निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
Maharashtra Politics: कोकणातील चौदा पालिकांवर ‘महिला राज’; ‘या’ जागांवर मिळवला विजय
निवडणुकीपूर्वी भाजपने पत्रकार परिषद घेऊन शिंदे शिवसेनेला केवळ चार जागांची ऑफर दिली होती. शिदे शिवसेना मालवणात शून्य आहे, असे वक्तव्य करत भाजपने त्यांना डिववले होते. हा अपमान जिव्हारी लागलेल्या आमदार नीलेश राणे वानी सर्वे २० जागांवर वर्चस्व मिळविण्याचा निर्धार केला. आजच्या निकालाने राणे यांनी भाजपध्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसून आले, नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या तिरंगी लहतीत शिदि शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी बाजी मारली, त्या मालवणव्या १६ व्या माराध्यक्ष बनल्या आहेत, ठाकरे शिवसेनेच्या पूजा करलकर दुसऱ्या स्थानी, तर भाजपाच्या शिल्पा खीत तिसन्या स्थानी राहिल्याचे दिसून आले. भाजपला रामराम करत शिंदे शिवसेनेत गेलेल्या ममता वराडकर यांना मतदारांनी कौल दिला.






