संग्रहित फोटो
सतेज पाटील म्हणाले, जर कोणी जास्तच नाराज झाला असल्यास त्याला विधानसभेला उमेदवारी देतो, पण महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तरी कोणी रुसू नका, नाराज होऊ नका, पाटील यांनी अशा पद्धतीने आवाहन करताच इच्छुकांमध्ये एकच हशा पिकला. पाटील म्हणाले, थांबायला सांगितल्यानंतर तुम्हाला काहीतरी शब्द द्यावा लागणार आहे. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नका, सगळेजण त्या उमेदवाराच्या पाठीशी राहा असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना पाटील यांनी सांगितले की, तुमच्यातीलच इच्छुक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार आहे. मला उमेदवारी द्या म्हणून भेटा पण कुणाला उमेदवारी देऊ नका म्हणून सांगायला भेटू नका, असे ते म्हणाले. त्यामुळे इच्छुकांची समजूत काढताना नेत्यांची दमछाक होताना दिसत आहे.
महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल
सतेज पाटील म्हणाले, केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना गेल्या तीन वर्षात राज्य सरकारला कोल्हापूरसाठी ठोस असं काहीच करता आलेलं नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसकडून आघाडी करण्यासाठी चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की, राज्य पातळीवर काही चर्चा सुरू आहेत, स्थानिक पातळीवर काही लोकांच्या अड्जस्टमेंट झाल्या आहेत.






