कोरेगाव : कोरेगाव शहरात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कोरेगाव शहराला दोन-तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. कोरेगाव शहराला पाणीपुरवठा करणारा कृष्णा नदीवरील पाणी योजनेचा जॅकवेल आणि फुटवाल उघडा पडला आहे. कोरेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जिहे- काटापुर पाणी योजनेपासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कृष्णा नदीवरील तासगाव येथील बंधाऱ्यातून राजकीय नेत्यांनी खटाव आणि माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी उचलले ,आणि खटाव आणि माण तालुक्यातील बंधारे तलाव भरून घेतले. त्यामुळे कोरेगाव शहरासाठी असणाऱ्या जिहे- कटापूर पाणी योजनेचे जॅकवेल आणि फोटोवान कोरडे पडले. परिणामतः कोरेगाव शहराला होणारा पाणीपुरवठा कमी कमी होऊ लागला, आणि कोरेगाव शहरांमध्ये विविध भागांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली.
त्यातच कोरेगाव शहरांमध्ये मुख्याधिकारी यांनी विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. त्या भ्रष्टाचाराला कोरेगाव शहरातील सत्ताधारी नगरसेवकांनी साथ दिली. यामुळे कोरेगाव शहरातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. कोरेगाव शहरात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आणि कोरेगाव नगरपंचायतीमध्ये अधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कोरेगाव तहसील कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या माध्यमातून आंदोलन सुरू झाले.
कोरेगाव शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईला आणि कोरेगाव शहरात अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधारी नगरसेवकांनी संगणमताने केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून कोरेगाव शहरातील नागरिकांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्या आंदोलनाचा भाग म्हणूनच कोरेगाव शहरातील भ्रष्टाचार भ्रष्टाचारी अधिकारी आणि भ्रष्टाचारी सत्ताधारी नगरसेवक यांच्या विरोधात कोरेगाव शहरातील नागरिकांनी विशेषता महिलांनी हंडा मोर्चा काढला.
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय कोरेगाव येथून नागरिकांच्या हंडा मोर्चाला सुरुवात झाली. सर्वप्रथम कोरेगाव शहरातील भीषण पाणीटंचाईची आणि कोरेगाव शहरातील नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैर व्यवहाराची माहिती कोरेगावचे तहसीलदार यांना देण्यात आली. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहरातील महिलांचा आणि ग्रामस्थांचा हंडा मोर्चा कोरेगाव येथील प्रांत कार्यालयात गेला. प्रांताधिकारी यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आणि कोरेगाव नगरपंचायतीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचबरोबर कोरेगाव शहरात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईची सविस्तर माहिती दिली.
कोरेगाव प्रांत कार्यालया मधून कापड पेठ, साखळी पूल, हुतात्मा स्मारक, मेन रोड ,आझाद चौक, बाजारपेठ मार्गे महिलांचा आणि ग्रामस्थांचा हंडा मोर्चा कोरेगाव नगरपंचायतीच्या कार्यालयावर येऊन धडकला.
नागरिकांच्या हंडा मोर्चाला आणि महिलांच्या रोशाला कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे सामोरे गेल्या. त्यांच्या समोरच आपापले हांडे वाजवून आणि निषेधाच्या घोषणा देऊन उपस्थित महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला संताप व्यक्त केला. निवेदनाचा स्वीकार करून मुख्याधिकारी आपल्या दालनात गेल्या आणि मोर्चेकरी महिला ग्रामस्थ आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा विनिमय केला.
कोरेगाव तहसील कार्यालय येथून निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या महिला वर्गाने आणि ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी खटाव आणि माण तालुक्याला पळवणाऱ्या राजकीय नेत्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच कोरेगाव नगरपंचायतीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्या निषेदाच्या घोषणाही या मोर्चामध्ये दिल्या.