जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनील शेळके जनता दरबार पार पडला (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : “जनतेशी थेट संवाद आणि त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण हेच खरे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. आमदार सुनील शेळके यांचा जनता दरबार उपक्रम पार पडवा आहे. यासाठी मतदारसंघातील नागरिकांच्या भरघोस उपस्थिती लावल्यामुळे हा यशस्वी उपक्रम ठरला आहे.
वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात आमदार सुनील शेळके यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारात आमदार सुनील शेळके यांनी विविध समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे सविस्तर ऐकून घेतले. मागील साडेपाच वर्षांप्रमाणे दर सोमवारी होणाऱ्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रलंबित शासकीय कामे, शैक्षणिक व आरोग्य विषयक अडचणी, योजनांचा लाभ, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा यासंबंधी अनेक तक्रारी व सूचना नागरिकांनी मांडल्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, पंढरीनाथ ढोरे, नारायण ठाकर, नारायण भालेराव, भरत येवले, सुहास गरुड, चंद्रकांत दाभाडे आणि किशोर सातकर हे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेत कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत. त्या ऐकून घेऊन तत्काळ निर्णय घेणे आणि प्रशासनाला कामासाठी भाग पाडणे, हीच खरी जबाबदारी आहे. जनता दरबार उपक्रमातून लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळते, त्यातूनच परिवर्तनाची दिशा ठरते.”
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वडगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्यामुळे जनता दरबाराला पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार शेळके यांच्या कार्यपद्धतीमुळे मावळ तालुक्यात लोकांमध्ये विश्वास व समाधान व्यक्त होत आहे.
अज्ञात व्यक्तींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
वडगाव मावळमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तुमच्या पतीचा खून झाला आहे. तसेच तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे, असे सांगून एका महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील जाधववाडी, नवलाख उंबरे येथे घडली. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 26) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी या आपल्या घरी होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर अज्ञात आरोपीने फोन केला. फिर्यादी यांचे पती पंडित रामचंद्र जाधव यांचा खून झाला असून तुमच्या आणि तुमच्या मुलाच्याही जीवाला धोका आहे, असे म्हणत फिर्यादी महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच फिर्यादीस व फिर्यादीच्या कुटुंबीयांना धोका असल्याचे धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.