Big Breaking ! आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण, नेमके घडले काय?
आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी पुण्यामधून येत आहे. पुण्यातील नऱ्हे परिसरातून अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात असेही बोलले जात आहे की त्यांच्या मुलाचे अपहरण सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून झाले आहे. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या धक्कादायक घटनेनंतर, पोलीस ऋषिराज सावंत याचा शोध घेत आहे.
तानाजी सावंत याचे चिरंजीव ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाले आहे, असा निनावी फोन कंट्रोल रूमला आला होता. यानंतर सिंहगड पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली आहे. या निनावी फोनमधून अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तर हा प्रॅन्क कॉल सुद्धा असू शकतो, असे देखील बोलले जात आहे. तर ऋषिराज सावंत परदेशात असल्याची माहिती सावंतांच्या कार्यालयातून मिळाली आहे.