नागपूर : शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) गुरुवारी दोन दिवसीय नागपूर दौऱ्यासाठी (Nagpur tour) उपराजधानीत पोहचले. विमानतळावर माध्यमांशी राऊत यांनी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार गेले असले तरी शिवसैनिक आजही सोबत आहेत. कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व जागच्या जागी आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती म्हणजे भास आहे, हे सर्व तात्पुरता आहे. शिवसेना अशा परिस्थितीतून अनेक वेळा बाहेर पडली आहे. गेले ५६ वर्ष अनेक संकटे, अनेक वादळे पाहिली आहे. शिवसेना विदर्भात काम करत आहे हळूहळू चित्र स्पष्ट होईल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांनी मला नागपुरात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी पाठवले आहे. सर्व कार्यकर्ते जागच्या जागी आहे. त्यामुळे चिंता नसावी असेही संजय राऊत म्हणाले. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपालाने त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे बेकायदेशीर आहे. १९ तारखेला मंत्र्यांना शपथ देणे, हे ही बेकादेशीर राहील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यपाल कुठे आहेत आता त्यांच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्राला गरज आहे, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.
फडणविसांना टोला
मी आता उपमुख्यमंत्र्याच्या शहरात आलो आहे. कालपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. मी पक्ष आणि संघटनेच्या कामासाठी आलो आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावर ते म्हणाले, विरोधासाठी विरोध केला जातो, नवीन सरकारचा मागच्या सरकारचे निर्णय बदलत आहे. फक्त दोघांचं कॅबिनेट काम करताना दिसते. दिवस बदलतात, महाराष्ट्रात अद्याप सरकार अस्तित्वात नाही. मंत्रिमंडळाचा शपथविधी का होत नाही हा प्रश्न आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
विमानतळावर गर्दी, रविभवनात भेटी
राऊत यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या संख्येत शिवसैनिकांनी गर्दी केली होती. संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी (Contact Head Dushyant Chaturvedi), महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे (Metropolitan Chief Pramod Manmode), उपजिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले (Upazila Chief Devendra Godbole) यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अनेक ग्रामीण व शहर कार्याकरिणीचे पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी पोहचले नसल्याने चर्चेला उधान आले होते. दरम्यान शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आल्याने बंडाचा कोणताही परिणाम नागपुरात दिसत नसल्याचा उल्लेख केला. गर्दी पाहून बंड विसरून जा असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. विमानतळावरून थेट रविभवनात पोहचत शिवसैनिकांच्या भेटी घेतल्या. शुक्रवारी रविभवन येथे शहर व ग्रामीण कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची भटीसह बैठक घेणार आहेत. शहर व जिल्हा कार्यकारिणीमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र हे बदल मुंबईतून होतील अशी चर्चा रंगली आहे.