कल्याण : शिवजयंतीनिमित्त (Shivjayanti 2023) शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून डोंबिवली (Dombivali) शहर शाखेसमोर साकारण्यात आलेला देखावा सध्या डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. ‘350 वर्षानंतर ..पुन्हा तोच योग’ या आशयाच्या या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं आहे.
कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते,आहेत आणि राहतील.… https://t.co/2sEAaL9eyL pic.twitter.com/c4f36FQipJ
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 10, 2023
हा देखावा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून हा देखावा सध्या डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरला आहे. या देखाव्याबाबत मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil Tweet) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे.
शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा! असा खोचक सल्ला दिलाय. राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते,आहेत आणि राहतील.… ”
या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग केलं आहे. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना करणं चूक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून अधोरेखित केलं आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.